Mutual Fund मध्ये SIP कोणत्या चुका टाळाव्यात? तीन मुद्द्यांमध्ये सर्व उत्तरं

Mutual Fund Investment Tips: सध्या सगळीकडेच मंदीचे (global recession) वातावरण पाहायला मिळते आहे. जागतिक स्तरावर अर्थकारणात अनेक बदल आणि घडामोडी होत असतात. त्यामुळे कमावणारी व्यक्ती म्हणून आपल्याला अशा बदलांकडे लक्ष्य द्यावे लागते. परंतु योग्य पद्धतीनं गुंतवणूक करणे (investment) आणि त्यातून चांगला परतावा (returns) मिळवणे हेही महत्त्वाचे ठरते. समोर येणाऱ्या माहितीनुसार, जागतिक अर्थकारणाची अवस्था सध्या फार खराब असून येत्या पुढल्या वर्षी म्हणजेच 2023 ला जागतिक मंदीला आपल्या सर्वांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आर्थिक परिस्थिती कमकुवत होण्याची शक्यता आहे. या कठीण काळात अशा कंपन्यांच्या शेअर्समध्ये (shares), म्यूच्युअल फंड (mutual fund) गुंतवणूक करणं म्हत्त्वाचं ठरेल ज्यातून या महागाईच्या काळातही आपल्याला चांगल्यातला चांगला परतावा मिळेल. म्यूच्युअल फंड हा एक चांगला पर्याय म्हणता येईल. ज्यातून तुम्हाला जोखीमही (risk) कमीत कमी प्रमाणात असेल अशा काही गोष्टींची खातरजमा करत गुंतवणूकीसाठी तुम्ही म्यूच्युअल फंडचा वापर करून घेऊ शकता.  त्यासाठी आता तुम्ही दीर्घ काळातील गुंतवणूकीचा(long term investment) विचार करू शकता ज्यात तुम्हाला जोखीमही कमी मिळेल. तेव्हा अशा गुंतवणूकीचा विचार करायचा असेल तर SIP सारखा दूसरा पर्याय नाही. 

हेही वाचा :  SIP Investments vs Mercedes: SIP मुळे luxury car ची विक्री घटली?

तज्ञ काय सांगतात 

सध्या लॉन्ग टर्म इन्व्सेमेंट म्हणजेच दीर्घकालीन गुंतवणूकीचा पर्याय तुम्ही गुंतवणूकीसाठी घेऊ शकता. तज्ञांच्या मते, आता जोखीम कमी करून परतावा वाढविण्याची गुंतवणूकदारांना गरज आहे. शेअर बाजारात आपल्याला रिटर्न्स कसे मिळतील हे पुर्णत: शेअर बाजाराच्या स्थितीवर आधारित आहे. परंतु जर तुम्ही दीर्घ कालीन गुंतवणूक केलीत तर तुम्हाला त्याच्या चांगला फायदा होऊ शकतो. 

दीर्घकालीन गुंतवणूक किती वर्षांसाठी करावी?

तज्ञांच्या मते, दीर्घकालीन गुंतवणूक ही कमीत कमी 3 वर्षांची असावी. जर मिडकॅप म्यूच्युअल फंडमध्ये 5 वर्षे तरी गुंतवणूक करू शकता आणि जर स्मॉल कॅपमध्ये करणार असाल तर कमीत कमी 7-8 वर्ष तरी गुंतवणूक करावी. यामुळे तुम्हाला SIP कम्पांउंडिगचा फायदा होईल. लार्जकॅप फंडप्रमाणे तुम्ही फ्लेक्सीकॅप फंडमध्ये गुंतवणूक करू शकता.

पाहा कुठल्या म्यूच्युअल फंड मध्ये करू शकता गुंतवणूक – 

पराग पारिख फ्लेक्सी कॅप फंड (Parag Parikh Flexi Cap Fund) – फ्लेक्सीकॅप
फंड साईज – 27700 करोड 
NAV – 52 रूपये 
SIP – 1000 रूपये 
रिटर्न्स – 24 %

हेही वाचा :  Share Market : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, यांना 'हे' काम 24 तासांत लागेल करावे

कोटक इमर्जिंग इक्विटी फंड (Kotak Emerging Equity Fund ) – मिडकॅप 
फंड साईज – 22550 करोड 
NAV – 85.43 रूपये 
SIP – 1000 रूपये/ 5000 रूपये
रिटर्न्स – 26 %/70 % (5.11 लाख रूपये पाच वर्षात, SIP 5000 रूपये)

एक्सिस स्मॉलकॅप फंड (Axis small Cap Fund) 
फंड साईज – 11 हजार करोड
NAV – 72 रूपये 
SIP – 100 रूपये / 5000 रूपये 
रिटर्न्स – 28.6 % / 87 % (5.6 लाख रूपये पाच वर्षात, SIP 5000 रूपये)

स्मॉल कॅप, लार्जकॅप, फ्लेक्सीकॅप, मीडकॅप म्हणजे काय? Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

भारतीयांची स्वप्नपूर्ती! ढगांवर तरंगणाऱ्या चिनाब पुलावर रेल्वेची यशस्वी ट्रायल; रेल्वे मंत्र्यांनी शेअर केला व्हिडिओ

Chenab Railway Bridge : कोट्यवधी देशवासीयांचं स्वप्न आता साकार होणार आहे. जगातील सर्वात उंच ब्रिज …

महाराष्ट्रात अजब शिक्षक भरती; कन्नड भाषेच्या शाळेत 274 मराठी शिक्षकांची नियुक्ती

Sangali News : कन्नड आणि उर्दु शाळांमध्ये चक्क मराठी माध्यमिक शिक्षकांचे नियुक्ती करण्याचा अजब कारभार …