मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या 299 परीक्षेच्या तारखा जाहीर

Mumbai University Exam : मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. शैक्षणिक वर्ष 2023-24च्या उन्हाळी सत्राच्या 299 परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. उन्हाळी सत्राच्या या परीक्षा मार्चपासून सुरुवात होत आहेत. या उन्हाळी सत्र  परीक्षेला 2 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी बसणार आहेत. या परीक्षेच्या तारखेसोबतच सत्र 6 च्या परीक्षेचे वेळापत्रकही संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहेत. यातील 2023-24 या शैक्षणिक वर्षाच्या तृतीय वर्ष बीकॉम सत्र 6 ची परीक्षा 22 मार्च तर तृतीय वर्ष  बीए व बीएस्सी सत्र 6 च्या परीक्षा 3 एप्रिल, बीए एमएमसी  सत्र 6ची परीक्षा 16 एप्रिल आणि बीकॉम स्वयंअर्थसहाय्य अभ्यासक्रमाच्या  सत्र 6 च्या परीक्षा 15 एप्रिल रोजी सुरू होणार आहेत.

299 परीक्षेच्या तारखा जाहीर 

विद्यापीठ दरवर्षी चार विद्याशाखेच्या 450 पेक्षा जास्त परीक्षा घेत असते. विद्यापीठाने 2023-24 च्या उन्हाळी सत्राच्या मानव्य विद्याशाखेच्या एकूण 69 परीक्षा, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या 57 परीक्षा, विज्ञान व  तंत्रज्ञान विद्याशाखेच्या  75 परीक्षा व आंतर विद्याशाखेच्या 98 अशा एकूण 899 परीक्षेच्या तारखा विद्यापीठाने जाहीर केल्या आहेत. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील. 

हेही वाचा :  हौसिंग प्रोजेक्टवेळी पैसे बुडवणाऱ्या बिल्डरना 'रेरा'चा दणका, 30 कोटी दंडाची वसूली

सत्र 6 च्या परीक्षेचे वेळापत्रक 

परीक्षेच्या तारखेसोबतच पदवी परीक्षेच्या सत्र ६ च्या सर्व परीक्षांचे वेळापत्रक संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात आले आहे. इतर परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात करण्यात येईल.

2 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी 

या उन्हाळी सत्राच्या परीक्षेमध्ये 2 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. यातील 1 लाख 76 हजार विद्यार्थ्यांना जानेवारी महिन्यातच आसन क्रमांक देण्यात आलेले आहेत. तसेच परीक्षेची प्रवेशपत्रे देखील तयार झाली असून लवकरच ती  महाविद्यालयाच्या लॉगिनमध्ये देण्यात येतील. 

परीक्षा विभागातील परीक्षा व निकाल विभागाचे उपकुलसचिव नरेंद्र खलाणे व त्यांच्या विभागाने आणि त्या त्या विद्याशाखेच्या अधिष्ठात्यांनी या परीक्षांच्या तारखांचे वेळापत्रक तयार केले असून ते तयार करताना त्या त्या विद्याशाखांचे 90 दिवसांचे सत्र, सुट्ट्या व इतर विविध व्यावसायिक परीक्षा याचाही विचार करून या तारखांचे वेळापत्रक तयार केले आहे.

महत्वाच्या परीक्षांच्या तारखा 

बीकॉम सत्र 6 : 22 मार्च 2024
बीए सत्र ६ : 3 एप्रिल 2024
बीएस्सी सत्र ६ : 3 एप्रिल 2024
बीएस्सी – कॉम्प्युटर सायन्स, आयटी आणि बायोटेक. सत्र 6 : 19 एप्रिल 2024
बीए एमएमसी सत्र 6 : 16 एप्रिल 

बीकॉम फिनांशियल मार्केटस, बीकॉम बँकिंग अँड इन्शुरन्स, बीकॉम अकाऊंटिंग अँड फायनान्स, बीकॉम इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट, बीकॉम फिनांशियल मॅनेजमेंट,बीकॉम ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सत्र आणि बीएमएस सत्र 6 : 15 एप्रिल 2024

हेही वाचा :  Maratha Reservation : मनस्ताप! मराठा सर्वेक्षणामध्ये पहिल्याच दिवशी अडथळे; आता नोंदी ठेवायच्या तरी कशा?

विद्याशाखानिहाय परीक्षा 

मानव्य विद्याशाखा व विधी शाखा : 69
वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा : 57
विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा : 75
आंतर विद्याशाखा : 98

उन्हाळी सत्राच्या परीक्षा नियोजित वेळेवर घेणे, वेळेत मुल्यांकन करून, निर्धारित वेळेत निकाल जाहिर करणे याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती मुंबई विद्यापीठ परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी दिली.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

अंधश्रद्धेचा कळस! अपघातात व्यक्तीचा मृत्यू, 20 वर्षांनी नातेवाईकांची रुग्णालयच्या गेटवर पूजा, कारण काय तर..

Superstition : देश 21 व्या शतकात वावरत आहे, पण अजूनही अंधश्रद्धा मूळापासून नष्ट करण्यात आपण …

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …