आता आधार, पॅनसारखे महत्वाचे डॉक्युमेंट्स हरविण्याचे टेन्शन नाही, फॉलो करावी लागेल ‘ही’ सोप्पी पद्धत

नवी दिल्ली: डिजीलॉकर अॅप हे अतिशय महत्त्वाचे असून यात तुम्ही तुमचे कागदपत्रे एकाच ठिकाणी सहज ठेवू शकता. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने (MeitY) प्लॅटफॉर्म विकसित केलेली क्लाउड सेवा आहे. डिजीलॉकरचा वापर सर्व सरकारी दस्तऐवजांच्या डिजिटल आवृत्त्या संग्रहित करण्यासाठी केला जाऊ शकतो. अशा प्रकारे तुम्ही तुमचे सर्व दस्तऐवज नेहमी तुमच्या फोनमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा ते दाखवू शकता. डिजीलॉकर प्रत्येक वापरकर्त्याला १ GB क्लाउड स्पेस देतो. DigiLocker मध्ये फाइल अपलोड करण्याची प्रक्रिया वेबसाइट आणि अॅप दोन्हीवर सारखीच असते. डिजीलॉकर कसे वापरायचे किंवा डिजीलॉकरवर फाइल्स कशा अपलोड करायच्या हे अनेकांना माहीत नाही. तुम्हालाही जाणून घ्यायचे असेल, तर डिजीलॉकर ऑपरेट करण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे.

वाचा: स्वस्तात घरी आणा मोठा स्मार्ट टीव्ही, ‘ही’ कंपनी देतेय १२ हजारांपर्यंत डिस्काउंट, पाहा डिटेल्स

प्लॅटफॉर्मवर अपलोड केलेल्या सर्व फायलींवर १० MB ची कमाल मर्यादा आहे. गेल्या काही वर्षांत हे प्लॅटफॉर्म युजर्समध्ये खूप लोकप्रिय झाले आहे. अधिकृत वेबसाइटनुसार, DigiLocker चे ९२.२८ दशलक्ष नोंदणीकृत युजर्स आणि ४.७५ अब्ज दस्तऐवज स्टोअर्स आहेत. DigiLocker साठी साइन अप कसे करावे
हे जर तुम्हाला माहित नसेल तर काळजी करण्याची आवश्यकता नाही. तुमच्याकडे आधीपासूनच डिजिलॉकर खाते असल्यास तुम्ही पुढील विभागात जाऊ शकता. नसल्यास, तुम्ही वेबसाइटद्वारे लिंकवर क्लिक करून किंवा Play Store आणि Apple App Store वर उपलब्ध मोबाइल अॅप वापरून DigiLocker वापरू शकता. वेबसाइट किंवा अॅपच्या होमपेजवर गेल्यावर तुम्हाला या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

हेही वाचा :  खूनी खेळणं! १७ महिन्याच्या निरागस चिमुकल्याचा खेळताना दुर्दैवी मृत्यू

सर्वप्रथम पेजच्या वरच्या उजव्या कोपर्यात ‘साइन अप’ चिन्हावर क्लिक करा. खाते निर्मिती पृष्ठावर पुनर्निर्देशित केल्यानंतर, हे तपशील जसे की पूर्ण नाव, जन्मतारीख, मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी इत्यादी प्रविष्ट करा. तुम्हाला ६ अंकी सिक्युरिटी पिन देखील टाकावा लागेल. ते पूर्ण झाल्यावर, ‘सबमिट’ दाबा. यानंतर तुमच्या फोनवर एक OTP येईल. OTP प्रविष्ट करा आणि सबमिट वर क्लिक करा आता आपल्याला युजरनेम प्रविष्ट करणे आवश्यक आहे. हे पूर्ण झाल्यावर, सबमिट वर क्लिक करा. नंतर तुम्हाला साइन इन करण्यासाठी तुमचा मोबाइल नंबर किंवा आधार कार्ड क्रमांक आणि ६ अंकी सुरक्षा पिन कोड आवश्यक आहे. फायली अपलोड करण्यासाठी, फक्त डिजिलॉकरला अॅप आवृत्तीमध्ये तुमच्या फाइल्समध्ये प्रवेश देण्याचे कन्फर्म करा. डिजिलॉकरवर सहजपणे फाइल अपलोड करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा.

डिजीलॉकरमध्ये फाइल्स कशा अपलोड करायच्या?

एकदा प्लॅटफॉर्मवर साइन इन केल्यावर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी एक आयकॉन दिसेल. ते अॅपच्या वरती डावीकडे आहे. यावर क्लिक करा. आता पुढील स्क्रीनवर ‘अपलोड’ चे आयकॉन दिसेल. यावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला डिजिलॉकरवर ज्या फाइल्स अपलोड करायच्या आहेत त्या निवडा आणि ‘ओपन’ वर क्लिक करून त्या जोडा हे केल्यानंतर तुमचे काम होईल. आता तुमच्याकडे इंटरनेट आहे तोपर्यंत तुम्ही कधीही पाहू शकता.

हेही वाचा :  Sanjay Raut On Pune Lok Sabha: पुण्यावरुन महाविकास आघाडीत बिघाडी? राऊतांचा अजित पवारांना टोला! म्हणाले, "जागांचा आकडा वाढविण्याचा हट्ट..."

वाचा: अनलिमिटेड कॉलिंगसाठी बेस्ट आहेत हे ९ प्रीपेड प्लान, सर्वात स्वस्त ४९ रुपयाचा, ५६ GB पर्यंत डेटासह अनेक फायदे

वाचा: सिम कार्ड खरेदी करतांना ‘या’ गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास व्हाल Sim Card Fraud चे शिकार

वाचा: Nokia Go Earbuds 2+ आणि Nokia Go Earbuds 2 Pro लाँच, पाहा डिव्हाइसेसमध्ये काय आहे खास

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘आरक्षण मर्यादा वाढवून आरक्षण नकोच’ ओबीसीतूनच आरक्षणावर जरांगे ठाम

Maratha Reservation : मराठा आरक्षणाला कायदेशीर मजबुती देण्यासाठी राज्य सरकारकडून क्युरेटीव्ह पीटीशन दाखल करण्यात आलीय. …

दिल्लीचे ‘कटपुतली’ म्हणणाऱ्या विरोधकांना एकनाथ शिंदेंचं उत्तर, म्हणाले ‘यांना नाक खाजवायला…’

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला गुरुवारपासून सुरुवात होत असून त्याआधीच सत्ताधारी आणि विरोधकांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एकमेकांवर …