नुकतंच नवीन घरी ‘शिफ्ट’ झाला असाल तर, ‘असा’ अपडेट करा आधार कार्डमध्ये पत्ता, पाहा संपूर्ण प्रोसेस

नवी दिल्ली:Aadhar Card हे सर्व भारतीय नागरिकांसाठी आवश्यक कागदपत्र आहे हे वेगळे सांगायची गरज नाही . भारत सरकारने देशातील प्रत्येक नागरिकाला आधार कार्ड असणे अनिवार्य केले आहे. आधार कार्ड युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) द्वारे जारी केले जाते. आधार कार्डमध्ये व्यक्तीचे नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता यासंबंधीचा तपशील असतो आणि म्हणूनच हे कार्ड योग्य आणि अपडेट असणे अत्यंत आवश्यक आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमचे घर बदलले असेल तर, ताबडतोब आधार कार्डवरील पत्ता बदलणे देखील आवश्यक आहे. अन्यथा अनेक गोष्टींमध्ये समस्या उद्भवू शकतात. यासाठी तुम्हाला सोप्पी प्रोसिजर फॉलो करावी लागेल. या स्टेप्ससह तुमचे काम खूपच कमी वेळात होईल.

वाचा: रणरणत्या उन्हातही मिळणार गारवा, बजेटमध्ये घरी न्या नवीन AC-फ्रिजसह ‘हे’ गॅझेट, मिळतोय ४६ % पर्यंत ऑफ, पाहा डील्स

Aadhaar Card मध्ये पत्ता बदलण्याची प्रक्रियाही ऑनलाइन सुरू झाली आहे. UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुम्ही अगदी सहज पत्ता बदलू शकता. जाणून घेऊया तुम्ही आधार कार्डमध्ये पत्ता कसा अपडेट करू शकता. यासाठी तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रक्रिया फॉलो करावी लागेल. यासाठी सर्व प्रथम UIDAI वेबसाइट uidai.gov.in वर जा. यानंतर माय आधार विभागात जा. येथे तुम्हाला Update Your Aadhaar कॉलम दिसेल. ज्यामध्ये तुम्हाला Update Demographics Data Online वर क्लिक करावे लागेल. यानंतर UIDAI चे Self Service Update Portal (SSUP) ssup.uidai.gov.in तुमच्या समोर उघडेल. येथे तुम्हाला Proceed to Update Aadhaar पर्यायावर क्लिक करावे लागेल.

हेही वाचा :  स्मार्टफोनवरुन सहज बदलू शकता Aadhaar वरील चुकीची जन्मतारीख, मिनिटात पूर्ण होईल काम

आता तुम्हाला आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकण्यास सांगितले जाईल. यानंतर तुमच्या Registered Mobile नंबरवर OTP येईल. OTP टाका आणि सबमिट करा. OTP टाकल्यानंतर तुम्हाला Update Demographics Data वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला Address वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर Proceed वर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमचा जुना पत्ता दिसेल आणि खाली काही वैयक्तिक माहिती भरावी लागेल आणि वैध कागदपत्रे देखील अपलोड करावी लागतील. पत्ता पुन्हा एकदा तपासा आणि त्यानंतर Final सबमिट करा. यानंतर, तुम्हाला अपडेट रिक्वेस्ट नंबर म्हणजेच URN मिळेल, ज्याच्या मदतीने तुम्ही UIDAI वेबसाइटवर स्टेटस तपासू शकता.

वाचा: एकदाच रिचार्ज करा आणि वर्षभराचे टेन्शन विसरा, पाहा ‘हे’ स्वस्त वार्षिक प्लान्स, दिवसाचा खर्च ८ रुपयांपर्यंत

वाचा: स्लो चार्ज होणाऱ्या स्मार्टफोनची बॅटरी लाईफ अशी वाढवा, बदला ‘या’ सेटिंग्स, पाहा डिटेल्स

वाचा: बेस्टच ! OnePlus चे युजर्सना गिफ्ट, लाँच आधी OnePlus 10 Pro मिळविण्याची संधी, करावे लागेल ‘हे’ काम

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …