तुमच्या Aadhaar Card चा कधीच गैरवापर होणार नाही, फॉलो करा सोपी टिप्स, राहा सेफ

नवी दिल्ली: Aadhaar Card Holders: आधार कार्ड भारतातील सरकारी योजनांसाठी आधार कार्ड आवश्यक आहे. यासोबतच नवीन सिम घेणे, बँक खाते आणि मालमत्ता खरेदी करण्यासारख्या अनेक कामासाठी आधार कार्ड खूप महत्त्वाचे आहे. पण, आधार कार्डच्या वाढत्या उपयुक्ततेसोबतच त्याचा गैरवापरही सुरू झाला असून त्यामुळे आधार कार्डधारकाची सुरक्षा धोक्यात आली आहे. आधार डेटा सुरक्षित करण्यासाठी आधार कार्ड जारी करणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने व्हर्च्युअल आय आणि आधार कार्ड लॉक-अनलॉक सेवा सुरू केली आहे. ज्याच्या मदतीने आधार कार्डचा होणारा गैर वापर टाळता येऊ शकतो.

वाचा: जुना स्मार्टफोन एक्स्चेंज करताना ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष, होणार फायदा, मिळेल चांगली किंमत

व्हर्च्युअल आधार आयडी :

व्हर्च्युअल आयडी हा पर्यायी आधार क्रमांक आहे. हा एक १६ अंकी व्हर्च्युअल आयडी आहे, जो आधार क्रमांकावरून तयार होतो. आधार कार्डच्या ऐवजी त्याचा वापर करता येतो. आधार व्हर्च्युअल आयडी आधार क्रमांकावरून तयार केला जाऊ शकतो. परंतु, आधार ID क्रमांकावरून आधार क्रमांक ट्रेस केला जाऊ जाऊ शकत नाही. VID आधार कार्डधारक व्हर्च्युअल आयडी कितीही वेळा जनरेट केला जाऊ शकतो.

हेही वाचा :  Russia Ukraine War : रशियाविरोधात आता जगाने थोपटले दंड

वाचा: फोनवर बोलताना तुमचा कॉल रेकॉर्ड तर होत नाहीये? असे करा माहित, ही ट्रिक येईल कामी

आधार व्हर्च्युअल आयडी ऑनलाइन कसा तयार करायचा ?

सर्वप्रथम UIDAI ची अधिकृत वेबसाइट http://uidai.gov.in/ उघडा. येथे तुम्हाला आधार सेवा विभागातील ‘व्हर्च्युअल आयडी (व्हीआयडी) जनरेटर’ वर क्लिक करावे लागेल. येथे तुम्ही VID जनरेशन पेजवर पोहोचाल. नंतर नवीन VID किंवा जुन्या VID चा पर्याय निवडावा लागेल. आता तुमचा १२ अंकी आधार क्रमांक टाका. सुरक्षा कोड सबमिट करा आणि “ओटीपी पाठवा” बटणावर क्लिक करा. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP एंटर करा आणि ‘Verify & Proceed’ बटणावर क्लिक करा. तुम्हाला तुमचा 16 अंकी व्हर्च्युअल आयडी पुढील पेजवर दिसेल. यासोबतच हा आयडी तुम्हाला मेसेजवर पाठवला जाईल.

आधार लॉक सेवा:

UIDAI प्रत्येक कार्ड धारकाला आधार लॉक करण्याची सुविधा देखील प्रदान करते. याद्वारे युजर्स त्यांचे बायोमेट्रिक तपशील आधार डेटाबेसमध्ये लॉक आणि अनलॉक करू शकतात. यासाठी प्रथम UIDAI ची अधिकृत वेबसाइट उघडा. येथे My Aadhaar वर क्लिक करा आणि लॉगिन करा. तुम्ही सुरक्षित बायोमेट्रिक पर्यायावर टॅप करू शकता. येथे तुम्हाला बायोमेट्रिक तपशील लॉक आणि अनलॉक करण्याचा पर्याय मिळेल. अशा प्रकारे तुम्ही तुमचा आधार तपशील लॉक करू शकता. त्याच वेळी, आवश्यक असल्यास, आपण त्यांना अनलॉक करू शकता.

हेही वाचा :  Smartphone Tips : फोन रिपेअरिंगसाठी सर्व्हिस सेंटरमध्ये देताय? घ्या ही खबरदारी

वाचा: धमाकेदार ऑफर ! २५००० रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतोय Nothing Phone 1

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले ‘आता पुढील शिक्षण…’

Shrirang Barane Passed SSC Exam : शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, माणूस आयुष्यभर विद्यार्थी दशेतच …