अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट एंगेजमेंट पार्टीला बॉलिवूडच्या कलाकारांची हजेरी, ग्लॅमरस लुक पाहून थक्क व्हाल

सध्या मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरी जल्लोषाचे वातावरण आहे.नुकतीच त्यांची मुलगी ईशा अंबानी तिच्या दोन मुलांसह भारतात परतली तर दुसरीकडे त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांची मैत्रीण राधिका मर्चंटसोबत २९ डिसेंबरला एंगेजमेंट झाली. ज्यानंतर मुकेश आणि नीता यांनी त्यांचा मुलगा आणि भावी सुनेचे स्वागत करण्यासाठी मुंबईतील त्यांच्या घरी अँटिलिया येथे एका भव्य पार्टीचे आयोजन केले होते. अनेक बॉलिवूड स्टार्संनी या पार्टीला हजेरी लावली. शाहरुख खान, आलिया भट्ट, रणबीर कपूर, सलमान खान, रणवीर सिंग यांसारख्या सेलिब्रिटींनी पार्टीला उपस्थिती लावली. यावेळी त्याचा ग्लॅमरस लुक पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. अंबानींच्या रॉयल कार्यक्रमाला साजेल असाच यांचा लुक होता. (फोटो सौजन्य : योगेन शाह)

​राजस्थानमधील श्रीनाथजी मंदिरात झाला ‘रोका’ सोहळा

मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांची गुरुवारी एंगेजमेंट झाली. या जोडप्याने राजस्थानमधील श्रीनाथजी मंदिराला भेट दिली जिथे त्यांचा ‘रोका’ सोहळा पार पडला होता. याचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. अनंत आणि राधिकाचे लग्न कधी होणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

हेही वाचा :  हनुवटीखाली लटकतेय चरबी? डबल चिन वर साचलेली चरबी काढण्यासाठी डीसीए

राधिका मर्चंट ही उद्योगपती वीरेन मर्चंट यांची कन्या आहे, एका फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे सीईओ आहेत. अनंत आणि राधिका एकमेकांना काही वर्षांपासून ओळखत आहेत आणि आजच्या समारंभामुळे त्यांच्या औपचारिक नातेसंबंधाचा एक नवीन प्रवास सुरू झाला आहे आणि येत्या काही महिन्यांत लग्न होईल.

​रणवीर सिंगची भन्नाट स्टाइल

दीपिका पदुकोण कामानिमित्त बाहेर असल्याने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या एंगेजमेंट पार्टीत रणवीर सिंग एकटाच पोहोचला. यावेळी अभिनेत्याने काळ्या रंगाचा टर्टलनेक टी-शर्ट आणि त्याला जुळणारी पॅन्ट घातली होती. नेकलेस, काळी टोपी आणि रंगीत चष्म्या परिधान करत त्याने त्याचा लुक पूर्ण केला. (वाचा :- महिनाभरानंतर ईशा अंबानी मुलांसह भारतात परतली, सिंपल आरामदायी कपड्यांची किंमत ऐकून अवाक व्हाल)

रॉयल एन्ट्री

​पिंक साडीत जान्हवीचा जलवा

यावेळी जान्हवीने पारदर्शक अशी पिंक रंगाची साडी परिधान केली होती. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.यावेळी तिने गोलनेकलाईन असणारा ब्लाऊज परिधान केला होता. तिच्या या निखळ रुपाला पाहून सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळून राहिल्या. (वाचा :- पिंक ड्रेसमध्ये काजोलच्या मुलीचा न्यासा देवगनचा ग्लॅमरस लुक, चाहते झाले हैराण म्हणले न्यासा किंवा जान्हवी 2.0)

हेही वाचा :  तुम्ही आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? राज ठाकरेंनी एका वाक्यात दिलं उत्तर, म्हणाले "लवकरच महाराष्ट्रात..."

​झहीर खान आणि सागरिकाचा लुक

अंबानी आणि राधिका मर्चंटच्या एंगेजमेंट पार्टीत क्रिकेटर झहीर खान पत्नी आणि अभिनेत्री सागरिका घाटगेसोबत दिसला होता. लांब सुंदर कुर्त्यात सागरिका खूपच सुंदर दिसत होती. तर तिचा पती झहीर निळ्या कुर्त्यात दिसला. त्याचवेळी, एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये गायक मिका सिंग एका गाण्यावर परफॉर्म करताना दिसत आहे. तो अनंत अंबानींसोबत डान्स करताना दिसला. (वाचा :- ऑफशोल्डर टॉपमध्ये प्राजक्ताचा जलवा, पण चाहते म्हणतात अरे… कोठे नेऊन ठेवली आहे आमची गुटगुटीत प्राजू)

आलिया भट्टचा लुक

अनंत आणि राधिकाच्या एंगेजमेंट पार्टीत सलमान खान फॉर्मल लूकमध्ये दिसला. त्याचवेळी शाहरुख खानही या पार्टीचा एक भाग झाला. याशिवाय आलिया भट्ट तिचा पती आणि अभिनेता रणबीर कपूरसोबत पोहोचली. आलियाने मिंट हिरवा शरारा घातला होता तर रणबीर काळ्या कुर्ता सेटमध्ये हॅन्डसम दिसत होता. (वाचा :- थंडीत मौनी रॉयने वाढवले इंटरनेटचे तापमान, चैनने बनवलेला ड्रेस परिधान करुन चाहत्यांच्या हृदयावर केले थेट वार)

​नीता अंबानींच्या चेहऱ्यावरील आनंद

मुलाच्या या आनंद सोहळ्यात नीता अंबानी यांच्या चेहऱ्यावरील आनंद दिसून येत होता.यावेळी त्यांनी ग्रीन रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता. तर मुकेश अंबानींनी व्हाईट कुर्त्यावर ब्राऊन रंगाचे जॅकेट परिधान करुन त्यांचा लुक पूर्ण केला. (वाचा :- चक्क ओव्हरसाईज स्वेटशर्टमध्ये मलायकाचा ग्लॅमरस लुक, विंटरलुक पाहून चाहत्यांना भरली हुडहुडी)

हेही वाचा :  आलिया भट्टच्या घरातून फोटो लीक; पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने दिली माहिती



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …