हनुवटीखाली लटकतेय चरबी? डबल चिन वर साचलेली चरबी काढण्यासाठी डीसीए

गोबरे गाल छान दिसतात पण फक्त लहान मुलांनाच. प्रौढांना मात्र असे गुबगुबीत गाल छान दिसत नाहीत. तुमचे गाल खूप गोबरे असले, विशेषत: जबड्यांवर जास्त चरबी असली तर त्याला ‘डबल चिन’ म्हणतात. ‘डबल चिन’ असली तर अवघडल्यासारखे होते! त्याने तुमच्या व्यक्तिमत्वावर परिणाम होतो. वयोमानपरत्वे तुमच्या चेहऱ्यावर वजन चढू लागते आणि त्याची ‘डबल चिन’मध्ये भर पडते. चुकीचा आहार आणि अनुवांशिकतासुद्धा यासाठी कारणीभूत असते.

गाल आणि मान याभोवती जमणारी चरबी कमी करण्यासाठी डिऑक्सिकॉलिक अ‍ॅसिडचे (डीसीए) इंजक्शन देणे ही दीर्घकाळापासून चालत आलेली आणि परिणामकारक नॉन-सर्जिकल थेरपी आहे. याबाबत अधिक माहिती दिली आहे, द एस्थेटिक क्लिनिक्सचे संचालक डॉ. देबराज शोम आणि प्रसिद्ध त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. रिंकी कपूर यांनी. जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStock)

​डिऑक्सिकोलिक अ‍ॅसिड (डीसीए) काय आहे?​

​डिऑक्सिकोलिक अ‍ॅसिड (डीसीए) काय आहे?​

गाल आणि मान याभोवती जमणारी चरबी कमी करण्यासाठी डिऑक्सिकॉलिक अ‍ॅसिडचे (डीसीए) इंजक्शन देणे ही दीर्घकाळापासून चालत आलेली आणि परिणामकारक नॉन-सर्जिकल थेरपी आहे. पण बहुतेक भारतीयांना हे उपचार परवडत नाहीत. याचे कारण म्हणजे किबेला (अमेरिका) आणि बेलकायरा (कॅनडा) ही डीसीए फॉर्म्युलेशन्स महाग आहेतच, त्याचप्रमाणे ती सध्या भारतात उपलब्ध नाहीत. कारण त्यांना भारतीय अन्न व औषध प्रशासनाची मंजुरी मिळालेली नाही. म्हणून किबेला (अमेरिका) आणि बेलकायरा (कॅनडा) ही डीसीए फॉर्म्युलेशन्स ही बहुतेक भारतीय रुग्णांच्या आवाक्याबाहेरील आहेत.

हेही वाचा :  फक्त 30 दिवसांत इम्युनिटी, मानसिक शांती मिळेल व शरीरातील सर्व आजार होतील दूर

डॉक्टर्सने केले संशोधन

डॉक्टर्सने केले संशोधन

भारतात सर्रास उपलब्ध असलेले डिऑक्सिकोलिक अ‍ॅसिड (डीसीए) हे भारतीयांच्या मान आणि चेहऱ्याच्या खालील भागात साचणाऱ्या चरबीवरील परिणामकारक उपाय आहे. अशा प्रकारची चरबी हे वय वाढल्याचे सामान्यपणे दिसणारे लक्षण आहे. हे संशोधन द एस्थेटिक क्लिनिक्सचे डॉ. देबराज शोम आणि डॉ. रिंकी कपूर यांनी केले. काखेभोवती, कंबरेभोवती, पाठीवर आणि बिकिनी लाईनवरील चरबी कमी करण्यासाठी डीसीएचा परिणाम कितपत होतो, हे जाणून घेण्यासाठी क्लिनिकल चाचण्या केल्या गेल्या.

​डीसीएचा कसा वापर करण्यात येतो?​

​डीसीएचा कसा वापर करण्यात येतो?​

या नव्या अभ्यासामुळे तुम्हाला निश्चित मदत होईल असे डॉक्टरांनी सांगितले. या संदर्भात द एस्थेटिक क्लिनिक्सचे संचालक डॉ. देबराज शोम आणि प्रसिद्ध त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. रिंकी कपूर यांनी २०-६३ या वयोगटातील ५० भारतीय पेशंटचा अभ्यास केला. मान आणि चेहऱ्याच्या खालील एक तृतीयांश भागावर साचलेली चरबी काढण्यासाठी जेनेरिक डीसीए हे तुलनेने स्वस्त आहे आणि सगळीकडे उपलब्ध आहे. त्यामुळे तुमच्या गालावरील चरबीवर उपाययोजना करता येईल. या अभ्यासातून मिळालेले निष्कर्ष मार्च २०१९ मध्ये अमेरिकेतून प्रकाशित होणाऱ्या ‘जर्नल ऑफ ड्रग्स इन डरमॅटोलॉजी’ या प्रतिष्ठीत डरमॅटोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झाले.

​थेरपीचा परिणाम​

​थेरपीचा परिणाम​

‘डबल चिन’मुळे चिंतेत असलेल्या भारतीय रुग्णांवर जेनेरिक डीसीएचा परिणाम होऊन चेहऱ्यावरील चरबी कमी होते या गृहितकावर या अभ्यासाने शास्त्रोक्त शिक्कामोर्तब झाले आहे. संशोधकांनुसार या रिज्युव्हिनेशन थेरपीचे परिणाम वैध, दीर्घकाळ टिकणारे आणि विविध रुग्णांमध्ये दिसून आले.

हेही वाचा :  ‘कल्याणची चुलबुली’ शिवालीचा बेधडक मॉडर्न पैठणी ड्रेस लुक, पारंपरिकतेसह आधुनिकतेचा मेळ

(वाचा – PCOS समस्येतून बाहेर यायचे असेल तर हे पदार्थ खावे, आयुर्वेदातील नियम ठरतील फायदेशीर)

​डॉक्टरांनी दिले स्पष्टीकरण ​

​डॉक्टरांनी दिले स्पष्टीकरण ​

प्रसिद्ध कॉस्मेटिक सर्जन डॉ. देबराज शोम यांनी अधोरेखित केले आणि ते म्हणाले, “कोकेशिअन्सपेक्षा (गोऱ्या) लोकांपेक्षा भारतीय वेगळ्या पद्धतीने वृद्ध होतात. वयाची पन्नाशी पार केल्यानंतर चेहरा आणि मानच्या खालच्या भागावर वृद्धापकाळाचा परिमाण दिसून येतो. चरबी साचू लागल्यामुळे हे भाग जड होतात, चेहरा आणि मान यातील सीमारेषा धुसर होते आणि हे दोन्ही अवयव एकच भासू लागतात.

(वाचा – सावधान! इअरफोनचा वापर देतोय बहिरेपणाला आमंत्रण, कानातील पेशी होतील मृत)

​डीसीए इंजक्शनमध्ये जोखीम कमी​

​डीसीए इंजक्शनमध्ये जोखीम कमी​

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पन्नाशीनंतरच्या वयोगटात ‘डबल चिन’चा प्रॉब्लेम अधिक जाणवतो. लोकांचा तरूण लुक जातो आणि ते अधिक जाड दिसू लागतात. चेहऱ्याचा खालचा भाग आणि मानेभोवती साचलेली चरबी कमी करण्यासाठी अनेक जण नेक लिफ्ट सर्जरी किंवा नेक लायपोसक्शन शस्त्रक्रिया करून घेतात.

पण डीसीए इंजक्शनमध्ये जोखीम कमी असते आणि सारखेच परिणाम मिळतात. संशोधनातून दिसून आले की, भारतात उपलब्ध असलेल्या जेनेरिक डीसीएमुळे ‘डबल चिन’ची परिणामकारकपणे हाताळता येऊ शकते.

(वाचा – Eye Care: कॉन्टॅक्ट लेन्सेसची चांगली स्वच्छता ठेवण्यासाठी टिप्स)

​रूग्णाच्या मानसिकतेवर परिणाम​

​रूग्णाच्या मानसिकतेवर परिणाम​

डॉ. रिंकी कपूर म्हणाल्या, “हनुवटीखालील चरबीमुळे व्यक्तिमत्व अनाकर्षक दिसते आणि त्याचा रुग्णाच्या मानसिकतेवरही परिणाम होऊ शकतो. ही समस्या भारतात मोठ्या प्रमाणावर आढळून येते. चेहऱ्याचा खालचा भाग आणि मानेवर साठलेली चरबी काढण्यासाठी जेनेरिक डीसीए वापरूनही चांगले परिणाम दिसून येतात आणि हे उपचार एक दशांश खर्चात होतात. त्यामुळे हे उपचार भारतीयांना परवडण्याजोगे आणि सहज उपलब्ध होणारे असतात.

हेही वाचा :  लेकीने तयार केलेल्या साडीत ६३ वर्षांच्या नीना गुप्तांचा रूबाब

​हॉस्पिटलायझेशनची गरज नाही​

​हॉस्पिटलायझेशनची गरज नाही​

डीसीए शस्त्रक्रिया ओपीडी असते आणि त्यासाठी हॉस्पिटलायझेशन आवश्यक नसते. जे भारतीय सर्जन रुग्णांच्या ‘डबल चिन’वर जेनेरिक डीसीएने उपचार करत आहेत त्यांच्यासाठी आवश्यक असलेली वैज्ञानिक वैधता प्राप्त झाली आहे आणि त्यांच्या मनातील सर्व संशय दूर झाले आहेत.

​वजन राखणे गरजेचे​

​वजन राखणे गरजेचे​

फेस आणि नेक लिफ्टसारख्या चेहऱ्याच्या सौंदर्याशी संबंधित शस्त्रक्रियांचे प्रमाण सर्वाधिक असते. पण त्यातून गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते आणि रिकव्हरीसाठी म्हणजे उपचारांचा पूर्ण परिणाम दिसणाऱ्यांसाठी लागणारा वेळ जास्त असतो. अशा परिस्थितीत डीसीएने करण्यात येणारे नॉन-इन्व्हेसिव्ह उपचार लोकप्रिय होत आहेत. रुग्णांनी त्यांचे वजन कायम राखले आणि सुदृढ जीवनशैलीचा अंगाकर केला तर हे उपचार दीर्घकाळ टिकतात, असे शल्यविशारदांनी सांगितले.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …