‘कल्याणची चुलबुली’ शिवालीचा बेधडक मॉडर्न पैठणी ड्रेस लुक, पारंपरिकतेसह आधुनिकतेचा मेळ

शिवाली परब हे नाव आता घराघरात माहीत झालं आहे. ‘शिवाली हे खरंय’ म्हटल्यानंतर शिवालीशिवाय कोणाचा चेहरा समोरच येत नाही. कल्याणची चुलबुली अशी ही शिवाली फॅशनमध्येही मागे नाही. नेहमी वेगवेगळ्या स्टाईलने ती आपल्या चाहत्यांचं मन जिंकून घेत असते.

नुकतेच सुरू झालेल्या हिंदू नववर्षाच्या दिवशी अर्थात गुढीपाडव्याला शिवालीने पैठणी साडीचा ड्रेस परिधान केला होता. मात्र तिने हा वेगळ्याचा आधुनिक स्टाईलने वनपिस शिवला होता. तुम्हीही अशी फॅशन शिवालीच्या स्टाईलवरून प्रेरणा घेऊन कॅरी करू शकता. पाहूया कसा होता शिवालीचा लुक (फोटो सौजन्य – @parabshivali Instagram)

पैठणी साडीचा मॉडर्न ड्रेस

पैठणी साडीचा मॉडर्न ड्रेस

पैठणी साडीचे ड्रेस शिऊन घेतले जातात हे तर सर्वांनाच माहीत आहे. मात्र बरेचदा ते पारंपरिक सलवार कमीज असेच दिसून येतात. पण शिवालीने याला मॉडर्न टच देत पैठणी साडीचा स्लिव्हलेस वनपिस शिवला आहे. त्यातही त्याला वनपिस लाँग गाऊनसारखा लुक देण्यात आला आहे. तुम्हालाही पारंपरिकता आणि आधुनिकतेचा मेळ जपायचा असेल तर ही स्टाईल उत्तम आहे.

हेही वाचा :  गडगंज श्रीमंत घराण्याची सून झाली पण नव-याने जे केलं ते ऐकून हादराल,जबाबदार ठरले सासरचे लोक

मोत्यांच्या दागिन्याचा साज

मोत्यांच्या दागिन्याचा साज

पैठणीवर नेहमीच मोत्यांचे दागिने सुंदर दिसतात आणि शिवालीनेही या ड्रेसवर मोत्यांच्या दागिन्यांचीच निवड केली आहे. चिंचपेटी, मोत्यांचा तन्मणी, मोत्यांचे झुमके असा साज तिने ल्यायला आहे. या लाल रंगाच्या पैठणी ड्रेससह हे दागिने खूपच आकर्षक आणि सुंदर दिसत आहेत.

(वाचा – ग्लॅमरस ड्रेसवर पायात पैंजण, अनुष्काच्या फॅशनवर इंप्रेस झालेत चाहते)

नाकात नथीचा नखरा

नाकात नथीचा नखरा

नथीशिवाय तर महाराष्ट्रीयन लुक पूर्णच होत नाही. शिवालीनेही नाकात मोत्याची सुंदर नाजूकशी नथ घालून हा नथीचा नखरा पूर्ण केला आहे. अत्यंत साधा मात्र तरीही आकर्षक असा हा लुक दिसून येतोय. कोणत्याही कार्यक्रमासाठी तुम्ही असा लुक करू शकता.

(वाचा – मैदानातच नाही तर स्टाईलमध्येही शुभमन गिलचा जलवा, ठरतोय ‘लाखों दिलों की धडकन’, करतोय मुलींच्या काळजावर वार)

केसात भांग पाडून आंबाडा

केसात भांग पाडून आंबाडा

तर यासह शिवालीने केसात मध्ये भांग पाडून आंबाडा घातला आहे. बाकी सर्व लुक पारंपरिक ठेवत तिने हा मॉडर्न पैठणी ड्रेस परिधान केलाय. त्यामुळे मराठमोळा असाच हा लुक दिसून येतोय. मात्र त्याला थोडीसा विदेशी तडका लावण्यात आलाय.

हेही वाचा :  बॉयफ्रेंडला लागले दुसऱ्या बाईचे वेड, क्षणार्धात झालं होत्याचं नव्हतं!

(वाचा – निळ्याशार कपड्यातील करिश्माने वेधले लक्ष, चेहऱ्यावरील ग्लो समोर तरूण अभिनेत्रीही फिक्या)

व्हाईट हिल्स

व्हाईट हिल्स

या ड्रेससह शिवालीने व्हाईट हाय हिल्स परिधान केलेत. या संपूर्ण लुकसह तयार होत तिने आपल्या चाहत्यांसाठी फोटो पोस्ट केले आहेत. तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसून येतोय. हा ड्रेस शिवालीसाठी @kanchuki.in सई पंडितने तयार केला होता.
तुम्हालाही काहीतरी वेगळी स्टाईल करायची असेल तर अशा स्वरूपाचा मॉडर्न पैठणी ड्रेस तुम्ही तुमच्या वॉर्डरोबमध्ये समाविष्ट करून घेऊ शकता.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …