Mata exclusive : हळद लागली ! फ्लोरल प्रिंटच्या ड्रेसमध्ये वनिता खरातचा ग्लॅमरस अंदाज, नवराईवरून कोणाचीच नजर हटेना

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या घराघरीत पोहचलेली लोकप्रिय कलाकार म्हणजे वनिता खरात. वनितानं तिच्या अभिनयानं तसंच तिच्या उत्तम विनोदाच्या टायमिंगमुळे रसिकांच्या मनात घर केले. वनिता खरात तिचा बॉयफ्रेंड सुमीत लोंढे याच्याबरोबर २ फेब्रुवारी रोज विवाहबद्ध होत आहे. या सोहळ्यातील हळदीचे फोटो समोर आले आहे.
वनिता आणि सुमितच्या घरी लग्नाची लगबग सुरू झाली असून विवाहाच्या आधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. मंगळवारी वनिताच्या घरी मेंदी सोहळा झाला, त्याचे फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले होते. त्याचप्रमाणे वनिताने हिरवा चुडा भरलेल्या हाताचा फोटो तिनं इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या चुड्यामध्ये प्राजक्ता माळीनं तिला गिफ्ट केलेल्या गहू तोडे, पैलू पाटली असे दागिने परिधान केले होते.तिच्यावर चाहत्यांनी आणि तिच्या सहकलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (फोटो सौजन्य : प्रियांका लांजेकर , @diaries_of_ananda)

असा होता हळदीचा लुक

असा होता हळदीचा लुक

हळदीच्या लुकसाठी वनिताने फ्लोरल प्रिंट ड्रेसची निवड केली आहे. वनिताच्या या ड्रेसला ड्रेसच्या रंगाशी मिळती जुळती ओढणी देण्यात आली आहे. ह्या लुकमध्ये वनिता खूपच क्युट दिसत आहे. तुम्ही देखील वनिताप्रमाणे असा लुक कॅरी करु शकता.

हेही वाचा :  सगळीकडे फक्त प्राजक्ता माळीच्या लुकची हवा, चाहते म्हणतात ‘अस्सल...’

या डिझायनरने तयार केला ड्रेस

या डिझायनरने तयार केला ड्रेस

वनिताच्या लग्नातील सर्वच लुक फॅशन डिझायनर ‘डायरीज ऑफ आनंदा क्रिएशनच्या’ प्रियांका लांजेकर यांनी तयार केले आहे. महाराष्ट्र टाइम्ससोबत बोलताना प्रियांका यांनी सांगितले की वनिताच्या लग्नाची तयास सष्टेंबरपासूनच सुरु झाली होती. वनिताच्या आवडीच्या सर्वगोष्टी आम्ही आगदी मनापासून खरेदी केल्या. वनितचा जास्त भर आरामदायी आणि कम्फटेबल कपड्यांकडे होता त्यामुळे प्रत्येक कपड्याची निवड देखील तशीच करण्यात आली आहे.

(वाचा :- जाळीदार ड्रेसमध्ये मालती मेरीच्या आईचा ग्लॅमरस अंदाज, प्रियांका चोप्राचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल)

मोत्याची थिम

मोत्याची थिम

वनिताने तिच्या एका व्हिडीओमध्ये आधीच सांगितले आहे की तिच्या लग्नाची थिम ही मोती आहे. त्यामुळे हळदीच्या दिवशी देखील मोती रंगाशी मिळते जुळते कपडे तिने परिधान केले आहे.

(वाचा :- सबसे कातिल गौतमी पाटील, लवकरच Web series मध्ये झळकणाऱ्या गौतमीच्या ग्लॅमरस अंदाजावर नजर टाकाच)

दागिनांचा साज

दागिनांचा साज

वनिताला महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाची सूत्रसंचालिका प्राजक्ता माळीने ‘प्राजक्तराज’ या ब्रँडचे दागिने गिफ्ट केले आहेत. वनिताच्या लग्नात पारंपरिक मराठमोळे दागिने पाहियला मिळणार आहेत. आता वनिता लग्नामध्ये कशी दिसते या गोष्टीची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.

हेही वाचा :  देबिना बॅनर्जीने अनोख्या पद्धतीने दुसऱ्या मुलीचं नाव केलं शेअर, अर्थ कळताच अंतःकरणापासून जोडाल हात

असा होता मेहेंदी लुक

नवरदेवने केली खरेदी

नवरदेवने केली खरेदी

यावेळी फॅशन डिझायनर प्रियांका लांजेकर यांनी सांगितल्याप्रमाणे या खरेदीमध्ये वनितीचा नवरा सुमीत लोंढे यांनी खूप मदत केली आहे. शुटिंगच्या कामात बिझी असल्याने सुमीतने सर्व खरेदी केली आहे. या सर्ववरून त्याचे आपल्या लाडक्या वनीवर असणारे प्रेम दिसून येते.

(वाचा :- रवीना टंडनने रेखासोबत घेतला सेल्फी, केले एकमेकींना किस, रेखाच्या बनारसी साडीने चाहत्यांचा कलेजा केला खल्लास)Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रात अजब शिक्षक भरती; कन्नड भाषेच्या शाळेत 274 मराठी शिक्षकांची नियुक्ती

Sangali News : कन्नड आणि उर्दु शाळांमध्ये चक्क मराठी माध्यमिक शिक्षकांचे नियुक्ती करण्याचा अजब कारभार …

OTP कशासाठी वापरला? रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट होता का? निवडणूक अधिकाऱ्यांचा मोठा खुलासा

Ravindra Waikar :  मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातली निवडणूक वादाच्या भोव-यात सापडली आहे. शिवसेनेचे विजयी …