अभिनेत्री Juhi Parmar ने घरात तयार केले Vitamin C Serum

टिव्ही अभिनेत्री जुही परमारने तिच्या सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. नुकतच तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिला होम रेमिडीजला खूप आवडतात. यामुळेच तिने तिच्या सोशल मीडियावर ही रेसिपी शेअर केली आहे. यावेळी तिने घरातील काही गोष्टींच्या मदतीने विटामिन सी सीरम बनवले आहे. तुम्ही देखील घरच्या घरी हे सिरम बनवून नितळ त्वचा मिळवू शकता. संत्री खाल्ल्यानंतर अनेक लोक साले फेकून देतात. पण ही साले त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. या सालींमध्ये व्हिटॅमिन सी आणि फॉलिक अ‍ॅसिड मुबलक प्रमाणात असते. ज्यामुळे डाग दूर होतात. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.(फोटो सौजन्य :- Istock)

घरगुती सिरम बननण्यासाठी लागणारे साहित्य

घरगुती सिरम बननण्यासाठी लागणारे साहित्य
  • संत्र्याची सालं
  • गुलाब पाणी
  • कोरफड
  • ग्लिसरीन
  • व्हिटामिन – ई कॅप्सूल

(वाचा :- Skin Whitening: जपानी महिलांच्या काचेसारख्या चमकत्या त्वचेचे रहस्य आले समोर, १० मिनिटात मिळवा चमकती त्वचा) ​

​जुही परमारचे ब्युटी टिप्स

हेही वाचा :  Diabetes Diet: मधुमेहाच्या रुग्णांनी आहारात आवर्जून 'या' भाज्यांचा करा समावेश! | Diabetes Diet: Diabetics should include 'these' vegetables in their diet!

विटामिन सी सीरम कसे तयार करावे

विटामिन सी सीरम कसे तयार करावे

विटामिन सी सीरम तयार करण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात संत्र्याची सालं, गुलाब जल, घालून मिश्रण वाटून घ्या. एका वाटीमध्ये काढून घ्या. या मिश्रणात आता एलोवेरा जेल, ग्लिसरीन, व्हिटामिन – ई कॅप्सूल घालून मिश्रण चांगलं मिक्स करा व एका डबीमध्ये घालून फ्रिजमध्ये ठेवा.

(वाचा :- तुमच्या तुटणाऱ्या, गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय, लसणाने मिळवा घनदाट केस फक्त वापरण्याची योग्य पद्धत माहीत हवी)​

सीरम कसे वापरावे

सीरम कसे वापरावे

आता हातावर थोडं सीरम घेऊन चेहरा व मानेवर लावून मसाज करा. आठवड्यातून एक वेळा तुम्ही हे सिरम वापरू शकता. स्कीनकेअर रुटीनमध्ये स्किन सिरम खूप महत्त्वाची भूमिका बजावते. महिलावर्ग क्लिंजर, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि सीरमचा देखील वापर करतात. सीरममुळे त्वचेचे टॅनिंगपासून संरक्षण करता येते. त्याचप्रमाणे त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Gold Rate: दरवाढ सुरुच…9 वर्षापूर्वी 24,000 रुपयांना मिळणारं सोनं आता 72,000 रुपये, काय आहे आजचे दर?

Gold Price Today In Marathi: सोनं आणि चांदीच्या दरात दररोज बदल होत असतात. गेल्या काही …

Indian Railway : काय सांगता? कोकणात जाणाऱ्या वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस रद्द?

Indian Railway : भारतीय रेल्वे मार्गानं प्रवाशांना कायमच प्रवासाचा अविस्मरणीय अनुभव देण्यासाठी सातत्यानं काही प्रयत्न …