आतड्यातील विषारी घाण झटक्यात काढून फेकतात हे 5 पदार्थ, गॅस, अपचन, पोट साफ न होणं सर्व समस्यांचा उपाय किचनमध्ये

आतड्याला शरीराचा दुसरा मेंदू देखील म्हणतात. कारण हा अवयव शरीराच्या इतर भागांप्रमाणे मेंदूच्या सूचनांनुसार काम करत नाही किंवा ना तो मेंदूवर अवलंबून असतो. शिवाय कोणत्याही कार्यप्रणालीने हा अवयव प्रभावित होत नाही. या अवयवाचे संचलन आंतरिक तांत्रिक तंत्राद्वारे होते जी पचन क्रियेसाठी थेट जबाबदार असते. आतडे हेल्दी असणे तुमच्या एकूण आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे, कारण त्यात रोगप्रतिकारक प्रणालीच्या 70 टक्के पेशी असतात. म्हणूनच कमकुवत आतडे असलेले लोक सहजपणे गंभीर आजारांना बळी पडतात.

यासोबतच तुमचे वजन वाढवण्याचे आणि कमी करण्याचे कामही आतडे करतात. चांगल्या बॅक्टेरियाच्या कमतरतेमुळे आणि वाईट बॅक्टेरिया अति वाढल्यामुळे आतड्यांसंबंधित आजार होतात. आतड्यांसंबंधी अस्वस्थतेची लक्षणे काय आहेत? आतड्यांमधील बॅक्टेरियाचे संतुलन बिघडल्याने थकवा, पोटात दुखणे, बद्धकोष्ठता, जुलाब, अॅसिडिटी, झोपेत अडथळा, वजनात अचानक बदल अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत, त्या पदार्थांचा आहारात समावेश केला पाहिजे, जे आतड्यांतील हेल्दी बॅक्टेरिया वाढवण्याचे काम करतात. आज आतड्यांचे आरोग्य वाढवणाऱ्या पाच मसाल्यांची माहिती येथे आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. (फोटो सौजन्य :- iStock)

हळद

हळद

NIH मध्ये प्रकाशित केलेल्या एका अभ्यासानुसार, हळद आतड्यांसाठी आवश्यक आणि फायदेशीर असलेले बॅक्टेरिया वाढवण्याचे काम करते. यामध्ये कर्क्युमिन आढळते, जे अँटी-इन्फ्लमेट्री आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध आहे. अशा स्थितीत गॅस, अपचन, आणि अल्सर यामध्ये हळदीचा वापर फायदेशीर ठरतो. त्यामुळे जर तुम्ही हळद आहारात वापरात नसाल तर अशी चूक करू नका. अवश्य हळदीचा समावेश करा.

हेही वाचा :  Optical Illusion: 'या' फोटोत लपलेले 9 चेहरे शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

(वाचा :- या 3 चुकांमुळे तांब्याच्या भांड्यातील पाणी होतं विषारी, पिताच सर्व अवयवांत पसरतात अनेक रोग व होतात भयंकर वेदना)​

आले

आले

आल्यामध्ये जिंजरॉल नावाचे एक संयुग आढळते, जे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल अॅक्टिविटी वाढवण्याचे काम करते. ज्यामुळे पचनसंस्था प्रभावीपणे काम करते. आल्याचे नियमित सेवन केल्याने अॅसिडीटी, गॅस, अपचन, पोटदुखी सोबतच मुळव्याध आणि कॅन्सरपासून सुद्धा बचाव होतो. अनेकजण आले पाहून नाक मुरडतात. तुम्ही सुद्धा असे करत असाल तर ही सवय थांबवा आणि थोडेसे का होईना आल्याचे सेवन करायला सुरूवात करा.

(वाचा :- या 5 गोष्टी ब्लॉक करतात रक्ताच्या नसा किंवा रक्तवाहिन्या, Heart Attack पासून वाचवतील कार्डियोलॉजिस्टचे हे उपाय)​

जिरे

जिरे

जिरे अन्नाच्या पचनामध्ये मदत करण्यासोबतच भूक वाढवण्याचेही काम करते. एनसीबीआयच्या एका रिपोर्टनुसार, जिरे पचनाशी संबंधित आजार जसे की जुलाब, अपचन, गॅस, पोट फुगणे यासाठी खूप फायदेशीर आहेत. त्यात थायमॉल नावाचे तत्व असते, जे पचनसंस्थेला योग्य कार्य करण्यास मदत करते. जर तुम्ही आहारात जि-याचा वापर करत असाल तर उत्तम, पण जर वापर करत नसाल तरतो करायला सुरूवात नक्की करा.

हेही वाचा :  MLA Mother : याला म्हणतात साधेपणा! मुलगा आमदार असतानाही आई महाकाली देवीच्या यात्रेत विकतेय बांबूच्या टोपल्या

(वाचा :- पोट, मांड्या, कंबरेची चरबी झटक्यात जाईल जळून, फॉलो करा एक्सपर्टने सांगितलेला 7 दिवसांचा Weight Loss Diet Plan)​

धणे

धणे

पचनक्रिया सुधारण्यासाठी धण्यांचा वापर अगदी प्राचीन काळापासून होत आहे. त्याच्या वापरामुळे पित्त आम्ल तयार होते, जे पचनासाठी आवश्यक आहे. यासोबतच यात कार्मिनेटिव्ह गुणधर्म असतात, ज्यामुळे गॅसची समस्या दूर होण्यास मदत होते. धण्यांचे किंवा धणे-जिरे पावडरचे दररोज सेवन करणे आतड्याच्या चांगल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

(वाचा :- व्यायाम व योग करण्याआधी चुकूनही करू नका ही 3 कामे, मजबूत होणं सोडाच शरीराचा सांगडा बनवतील या भयंकर चुका..!)​

दालचिनी

दालचिनी

दालचिनीमध्ये प्रीबायोटिक गुणधर्म असतात, जे आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया वाढवून पचनक्रिया सुधारतात. याशिवाय दालचिनीमध्ये अँटी-मायक्रोबियल, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-ऑक्सिडेंट्स आणि अँटी-डायबेटिक गुणधर्म देखील असतात. अशा स्थितीत मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी याचे नियमित सेवन करावे.

(वाचा :- हे 5 पदार्थ करतात इम्युनिटी लोखंडाइतकी मजबूत, कोरोना ते कॅन्सर कोणताच भयंकर आजार करू शकणार नाही शरीरावर हल्ला)​

हिंग

हिंग

हिंग पोटात आणि लहान आतड्यात पाचक एंझाइम्सची क्रिया वाढवून पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. जठरासंबंधित अर्थात अनेक गॅस्ट्रिक समस्या टाळण्यासाठी हेल्थ एक्सपर्ट्स आपल्या नियमित आहारात हिंगाचा समावेश करण्याचा सल्ला देतात.

हेही वाचा :  तुमच्या 'या' एका चुकांमुळे वाढू शकतात तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या, आजच सोडून द्या ही वाईट सवय

(वाचा :- Sinus Remedy : सायनस इनफेक्शनमध्ये दिसतात ही भयंकर व वेदनादायी लक्षणं, नाक मोकळं करण्यासाठी घरीच करा हा 1 उपाय)​
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महारेराचा बिल्डर लॉबीला दणका; पार्किंचा वाद टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

MAHARERA: बिल्डिंगमध्ये अपुऱ्या जागेच्या अभावी पार्किंग करण्यास अडचणी येतात. हल्ली काही बिल्डर घर खरेदी केल्यानंतरच …

Viral Video : बॉसच्या जाचाला कंटाळून नोकरी सोडणाऱ्या तरुणाकडून शेवटच्या दिवशी ढोलताशे वाजवत कंपनीला निरोप

Pune Job News : सरकारी नोकरीवर (Government Jobs) असणाऱ्या अनेकांचाच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना हेवा …