Mann Ki Baat: पंतप्रधानांच्या ‘मन की बात’चं शतक, आमिर-रवीनासह हे दिग्गज सहभागी

Mann Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) ‘मन की बात’मधून (Mann Ki Baat) देशवासियांशी संवाद साधतात आणि त्यांना प्रेरणा देतात. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बात हा कार्यक्रम होतो. येत्या रविवारी म्हणजे 30 एप्रिलला पंतप्रधान मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचं शतक म्हणजे 100 वा एपिसोड प्रसारित (Mann ki baat @100) होणार आहे. यानिमित्ताने 26 एप्रिलला राजधानी दिल्लीत ‘मन की बात @ 100’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. या कार्यक्रमात अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आणि रवीना टंडन (Ravina Tandan) सहभागी झाले होते. 

हे दिग्गज उपस्थित 
आमिर खान आणि रवीना टंडन यांच्याशिवाय पुद्दुचेरीच्या माजी उपराज्यपाल किरण बेदी, संगीतकार रिक्की केज, भारताची आघाडीची महिला बॉक्सर निकहत झरीन आणि दीपा मलिक, निलेश मिश्रा, उद्योजक संजीव भीकचंदानी, मोहनदास पई सहभागी झाले होते. मन की बात हे देशातील नेता आणि जनता यांच्यातील संवादाचं एक उत्तम माध्यम आहे. यात महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करुन विचार मांडले जातात जे देशवासियांसाठी महत्त्वाचे ठरतात. 

हेही वाचा :  पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी; जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोलचा भाव

मन की बात या कार्यक्रमात देशभरातील 100 हून अधिक नगारिक सहभागी होणार आहेत. गृहमंत्री अमित शाहा या क्रार्यक्रमाच्या अखेरीस देशवासियांना संबोधित करणार आहेत. यात ते एक स्मारक शिक्का आणि टपाल तिकिटाचं लोकार्पण करणार आहेत. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, अनुराग ठाकूर आणि पंकज चौधरी उपस्थित राहणार आहेत.

मे 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी 3 ऑक्टोबर 2014 पासून मन की बात कार्यक्रमाला सुरुवात केली. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी आकाशवाणीवर या कार्यक्रमाचं प्रसारण होतं. या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी केली जाते. तळागाळापासून शाळा-महाविद्यालयील विद्यार्थ्यांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. 

इतक्या लोकांपर्यंत पोहोचतो कार्यक्रम
एका सर्व्हेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम जवळपास 23 कोटी लोकं ऐकतात. यात 65 टक्के लोकं हिंदी भाषेत हा कार्यक्रम ऐकण्यास पसंत करतात. तर 18 लोकांना हा कार्यक्रम इंग्रजी भाषेत व्हावा असं वाटतं. एकूण लोकांपैकी 44.7 टक्के लोकं टीव्हीवर हा कार्यक्रम ऐकतात. तर 37.6 ट्केक लोकं मोबाईलद्वारे या कार्यक्रमाशी जोडले जातात. 

परदेशी भाषेतही कार्यक्रम 
विशेष म्हणजे 22 भारतीय भाषांबरोबर मन की बात हा कार्यक्रम फ्रेंच, चीनी, इंडोनिशियाई, तिब्बती, बर्मी, बलूची, अरबी, पश्तू, फारसी, दारी आणि स्वाहिली सारखअया 11 परदेशी भाषांमध्येही हा कार्यक्रम प्रसारित केला जातो.

हेही वाचा :  Ajit Pawar Speach: 2004 मध्ये मुख्यमंत्रिपदाची संधी होती, आजपर्यंत राष्ट्रवादीचाच CM असता! पण…



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …