PM Modi’s Mother Passes Away: जेव्हा पंतप्रधान मोदी यांनी आईसाठी लिहिली ‘मन की बात’, सांगितली ही खास गोष्ट

PM Modi’s Mother Demise: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची आई हिराबेन (Heeraben) यांचे रात्री तीन वाजण्याच्या सुमारास निधन झाले. पीएम मोदींच्या आई हीरा बा यांनी गुजरातमधील अहमदाबाद येथील यूएन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. हिराबेन यांचे आज शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास निधन झाले. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून आईला श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या आयुष्यातील योगदानाचे स्मरण केले. यावर्षी, 18 जून रोजी, पंतप्रधान मोदी यांच्या आईचा वाढदिवस होता आणि त्यांनी 100 व्या वर्षात प्रवेश केला होता. आईच्या वाढदिवसानिमित्त पीएम मोदी यांनी त्यांच्या आईला एक पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी आईसाठी ‘मन की बात’  लिहिली होती.

आईसाठी पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’

आईच्या वाढदिवसानिमित्त लिहिलेल्या पत्रात पीएम मोदींनी लिहिले होते की आई, हा फक्त शब्द नाही. ही जीवनाची अनुभूती आहे ज्यामध्ये संयम, आपुलकी, विश्वास अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. जगातील कोणतेही ठिकाण असो, कोणताही देश असो, प्रत्येक मुलाच्या हृदयातील सर्वात मौल्यवान आपुलकी ही आईसाठी असते. आई, केवळ आपल्या शरीरालाच आकार देत नाही तर आपले मन, व्यक्तिमत्व आणि आत्मविश्वास देखील आकार देते. हे करत असताना आई आपल्या मुलांसाठी स्वतःचा वेळ खर्च करते, त्याचवेळी ती आई स्वतःला विसरते.

हेही वाचा :  राज्यातील 'आशाताईं'ना दिवाळीचं मोठ गिफ्ट, मानधनात घसघशीत वाढ

मोदी यांनी केला आईच्या तपश्चर्येचा उल्लेख  

जशी प्रत्येक आई असते तशी माझी आई जितकी सामान्य आहे. तितकीच ती असाधारण आहे, असंही पीएम मोदींनी या पत्रात लिहिलं होतं. आईची तपश्चर्या मुलाला योग्य व्यक्ती बनवते. आईचे प्रेम मुलामध्ये मानवी संवेदना भरते. ती एक व्यक्ती नाही, आई हे व्यक्तिमत्व नाही, ती एक रुप आहे. जसा भक्त, तसा देव असे येथे म्हटले आहे. तसेच आपल्या मनाच्या भावनेनुसार आईचे स्वरुप आपण अनुभवू शकतो.

PM मोदींच्या आईच्या वेदना काय होत्या?

पीएम मोदींनी पत्रात लिहिले की, माझ्या आईचा जन्म मेहसाणा येथील विसनगर येथे झाला. वडनगरपासून ते फार दूर नाही. माझ्या आईला माझ्या आजीचे प्रेम लाभले नाही. माझ्या आईचे बालपण आईशिवाय गेले, ती आईकडे कधीच हट्ट करु शकली नाही. ती कधीच डोकं त्याच्या मांडीत ठेवू शकत नव्हती. आईला अक्षरांचे ज्ञानही नव्हते, तिने शाळेचे दार कधी पाहिले नाही. तिला घरात सगळीकडे फक्त गरिबी आणि उणीव दिसली.

पंतप्रधानांच्या आईचे आयुष्य संघर्षात गेले

आईने परिस्थितीशी जोडून घेतले होते. ​​आजच्या काळात आपण कल्पना करु शकतो की माझ्या आईचे बालपण संघर्ष आणि अडचणींनी भरलेले होते. कदाचित देवाने आपल्या जीवनाला अशा प्रकारे आकार देण्याचा विचार केला असेल. आज आई जेव्हा त्या परिस्थितीचा विचार करते तेव्हा ती म्हणते की ही देवाची इच्छा असावी. पण तरीही आई गमावल्याचं दु:ख ज्याला आहे, तिचं तोंडही बघता येत नाही.

हेही वाचा :  तृतीयपंथींना राज्य शासनाची भेट; शिक्षणाचा संपूर्ण खर्च सरकार उचलणार!

पंतप्रधान मोदींनी पत्रात पुढे लिहिले की, वडनगरमध्ये आम्ही ज्या घरामध्ये राहत होतो ते घर खूपच छोटे होते. त्या घरात एकही खिडकी नव्हती, बाथरुम नव्हते, शौचालय नव्हते. त्यात आई-बाबा आणि आम्ही सगळे भाऊ-बहिणी राहायचो. जिथे अभाव आहे, तिथे तणावही आहे. पण माझ्या आई-वडिलांचे वैशिष्ट्य हे होते की, तिने घरात कधीही तणावाचे वर्चस्व निर्माण होऊ दिले नाही. दोघांनीही आपापल्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या होत्या.

पत्राच्या शेवटी पंतप्रधान मोदींनी लिहिले होते की, माझ्या आईच्या या जीवन प्रवासात मला भारताच्या संपूर्ण मातृशक्तीचा त्याग, तप आणि योगदान दिसत आहे. जेव्हा मी माझ्या आईची आणि तिच्यासारख्या करोडो महिलांची क्षमता पाहतो तेव्हा मला देशाच्या बहिणी आणि मुलींसाठी अशक्य असे कोणतेही ध्येय दिसत नाही.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मुख्यमंत्री शिंदेंकडून ‘लाव रे तो व्हिडिओ’, उद्धव ठाकरेंची जुनी क्लिप दाखवत बोचरी टीका

Shinde vs Thackeray : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने राजकीय वातावरण तापू लागलं आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू …

वसईतील बिबट्या पकडला, मात्र आता भाईंदरमध्ये मोकाट फिरतोय बिबट्या, CCTV Video समोर

Trending News Today: वसई किल्ला परिसरात गेल्या 25 दिवसांपासून धुमाकुळ घालणाऱ्या बिबट्याला मंगळवारी जेरबंद करण्यात …