लग्नाआधी १० वर्षे लपतछपत केले बायकोला डेट तर परेलच्या ब्रिजवर केले प्रपोज, अंकुश चौधरी दीपाची फिल्मी लव्ह स्टोरी

Ankush Chaudhary Birthday: अंकुश चौधरी हा कधीही म्हातारा न होणारा असा चॉकलेट हिरो असं अनेकांना वाटतं. ३१ जानेवारी रोजी म्हणजे आज या चिरतरूण हिरोचा वाढदिवस. अंकुश जसा पडद्यावर रोमँटिक दिसतो तसाच तो खऱ्या आयुष्यतही आहे का हे सर्वांनाच जाणून घ्यायचे आहे. तर अंकुशने आपली पत्नी दीपा परब चौधरी हिला लग्नाआधी १० वर्षे डेट केले. याबाबत कोणालाच त्यांनी थांगपत्ता लागू दिला नव्हता. इतके वर्ष हे नातं मीडियापासूनही त्यांनी लपवून ठेवण्यात यश मिळवलं होतं. कशी जमली या दोघांची लग्नगाठ जाणून घ्या ही फिल्मी लव्ह स्टोरी. (फोटो सौजन्य – @deepaparabchaudhariofficial and @ankushpchaudhari Instagram)

​कॉलेजमधील मैत्री आणि जुळलेलं प्रेम​

​कॉलेजमधील मैत्री आणि जुळलेलं प्रेम​

अंकुश चौधरी आणि दीपा परब हे दोघेही एम. डी. कॉलेजचे विद्यार्थी. दोघेही एकमेकांना कॉलेजच्या दिवसांपासून ओळखत होते. रंगभूमी, नाटक, अभिनय हे दोघांचेही प्रेम. एकांकिका करताना दोघांची ओळख झाली आणि या मैत्रीचे रूपांतर कधी प्रेमात झाले हे दोघांनाही कळले नाही. त्यानंतर तब्बल १० वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले. आधी अभिनयक्षेत्रात नाव कमवायचे आणि मगच लग्न करण्याचा निर्णय दोघांनी घेतला होता.

हेही वाचा :  Viral Video : महिलांनो सावधान! 'या' शहरात फिरतोय Serial Kisser

​फिल्मी स्टाईलने केले प्रपोज​

​फिल्मी स्टाईलने केले प्रपोज​

नाटकात एकत्र काम करतानाच ओळख झाली आणि पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र अंकुशने दीपाला खऱ्या आयुष्यातही अत्यंत रोमँटिक पद्धतीने आणि फिल्मी स्टाईलनेच प्रपोज केले होते. ‘चला हवा येऊ द्या’च्या एका भागात अंकुश आणि दीपा एकत्र आले होते. त्यावेळी हा किस्सा अंकुशने सांगितला होता. आजही दीपाला प्रपोज केलेला दिवस जसाच्या तसा आठवतो असं अंकुश म्हणाला, ‘कॉलेज हे परेल ब्रिजजवळच होते आणि दीपा निघाली तसा मी तिच्यामागे धावत गेलो आणि तो मधलाच दिवस होता. ब्रिजवर खूपच गर्दी होती. पण त्या गर्दीतही माझ्या गुडघ्यावर बसून हातात गुलाबाचे फूल घेत मी दीपाला मागणी घातली होती’ असं सांगत अंकुश आठवणीत रमला होता.

(वाचा – Ramesh Deo Birthday: पहिल्याच भेटीत आवडल्या सीमा देव, योगायोग घडतच गेले आणि लाभली जन्मभराची साथ)

​२००७ मध्ये केले लग्न​

​२००७ मध्ये केले लग्न​

लग्नाआधी ताकास तूर लागू न देता दोघांनीही एकमेकांना १० वर्षे डेट केले आणि मग नाव कमावल्यावर २००७ मध्ये अंकुश आणि दीपाने लग्न केले. हा सर्वांसाठीच सुखद धक्का होता. अगदी मीडियालादेखील याची कल्पना नव्हती. कारण एकदाही या दोघांनी एकत्र कामही केले नव्हते अथवा यांचे कधी एकमेकांसोबत नावही जोडले गेले नव्हते. पण अचानक लग्न करून दोघांनीही चाहत्यांना धक्का दिला होता.

हेही वाचा :  जपानी गुडीया भारतीय तरूणाच्या प्रेमात! दोन वर्षानी बांधली लग्नगाठ

(वाचा -Nafisa Ali Birthday: नफीसाला जेव्हा सासूने स्वीकारले नाही, नवऱ्यासह राहावे लागले मित्राच्या घरी, बॉलीवूडमध्ये गाठली ‘उँचाई’)

​दोघेही कामात व्यस्त​

​दोघेही कामात व्यस्त​

लग्नानंतर दीपाने काही काळ ब्रेक घेत मुलगा प्रिन्स याला सांभाळले. तर अंकुश सतत चित्रपटांमधून दिसत राहिला. दोघेही सुखाने संसार करत असून सध्या दीपादेखील पुन्हा मालिकेतून काम करताना दिसून येत आहे. हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये दीपाने चांगलाच जम बसवला आहे. तर अंकुश आणि दीपा दोघेही सोशल मीडियावर नेहमीच आपले फोटो पोस्ट करत असतात.

अंकुश आणि दीपाची लव्ह स्टोरी ही अत्यंत खास असून फिल्मी आहे. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे सेलिब्रिटी असूनही कधीच यांचे नाते लग्नापूर्वी गाजले नाही.

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …