केंद्रीय विद्यापीठांच्या पदवी प्रवेशांसाठी आता CUET परीक्षा

नवी दिल्ली: केंद्रीय विद्यापीठांच्या पदवी अभ्यासक्रमांना यापुढे विद्यापीठ संयुक्त प्रवेश परीक्षेत (CUET) द्वारे प्रवेश मिळणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोग (UGC)अध्यक्ष एम जगदीश कुमार यांनी सोमवारी सांगितले की केंद्रीय विद्यापीठांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यापीठ संयुक्त प्रवेश परीक्षेत (CUET) मिळालेल्या गुणांच्या आधारे प्रवेश दिले जातील. त्यांनी हेही सांगितले की जुलैच्या पहिल्या आठवड्यात सीयुईटी परीक्षेचे आयोजन केले जाईल.

याचा अर्थ विविध विद्यापीठांचे पात्रता निकष वगळता बारावीमध्ये मिळालेल्या गुणांचा विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर परिणाम होणार नाही. पत्रकार परिषदेदरम्यान जगदीश कुमार म्हणाले, ‘शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून, राष्ट्रीय परीक्षा एजन्सी पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी CUET आयोजित करेल. सर्व केंद्रीय विद्यापीठांना त्यांच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी CUET मध्ये मिळालेले गुण ग्राह्य धरावे लागतील.’

देशातील ४५ केंद्रीय विद्यापीठांना UGC कडून आर्थिक मदत मिळते. कुमार म्हणाले की CUET चा अभ्यासक्रम NCERT च्या बारावीच्या अभ्यासक्रमासारखा असेल.

CUET मध्ये सेक्शन-1A, सेक्शन-1B, सामान्य अध्ययन आणि अभ्यासक्रमातील विशिष्ट विषय असतील. सेक्शन-1A अनिवार्य असेल, ते १३ भाषांमध्ये असेल आणि उमेदवार त्यांच्या आवडीची भाषा निवडू शकतील.

जगदीश कुमार म्हणाले की, विद्यार्थ्यांना इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दूचा पर्याय असेल. विद्यापीठांच्या आरक्षण धोरणावर CUET चा कोणताही परिणाम होणार नाही. ते म्हणाले की CUET नंतर कोणतीही केंद्रीय समुपदेशन फेरी होणार नाही.

हेही वाचा :  सीयूईटी वर्षातून दोनवेळा? UGC चे अध्यक्ष म्हणाले...

पदवीनंतर थेट ‘पीएचडी’ची मुभा; UGC चा नवा प्रस्ताव

यूजीसीकडून पीएचडी प्रवेशाच्या नियमांमध्ये बदल, जाणून घ्या अपडेट
MAH LLB CET 2022: महाराष्ट्र लॉ सीईटीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …