पदवीनंतर थेट ‘पीएचडी’ची मुभा; UGC चा नवा प्रस्ताव

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

नवीन शिक्षण धोरणानुसार तुम्हाला संशोधनासह पदवी घ्यायची असेल तर बारावीनंतरच्या चार वर्षांच्या पदवी शिक्षणानंतर पदव्युत्तर पदवी शिक्षण न घेता थेट ‘पीएचडी’साठी (Phd) प्रवेश मिळणे शक्य होणार आहे. यासाठी नियमांत बदल करण्यात येणार आहेत. याबाबतचा मसुदा विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) वेबसाइटवर प्रसिद्ध केला असून याबाबत सूचना मागविल्या आहेत.

नवीन शिक्षण धोरणानुसार (NEP) पदवी शिक्षणात विद्यार्थ्यांना कोणत्याही वर्षी बाहेर पडता येणार आहे, तसेच कालांतराने पुढील शिक्षण घेता येणार आहे. याचबरोबर विषयाचा सखोल अभ्यास व्हावा या उद्देशाने अतिरिक्त एक वर्ष शिक्षण घेऊन त्या विषयातील संशोधन अथवा ऑनर्स पदवीही मिळवता येणार आहे. अशा प्रकारे बारावीनंतर चार वर्षांचे पदवी शिक्षण घेऊन संशोधन अथवा ऑनर्सची पदवी मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी शिक्षण न घेता थेट ‘पीएचडी’ला प्रवेश घेता येईल, असा प्रस्ताव ‘यूजीसी’ने आणला आहे. याबाबतचा मसुदा वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यावर ३१ मार्चपर्यंत सूचना मागविण्यात आल्या आहेत.

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात बारावीनंतर पदवी शिक्षण घेत असताना प्रथम वर्षात ४० ते ४४ श्रेयांक मिळाल्यानंतर विद्यार्थी प्रमाणपत्र घेऊन शिक्षण सोडू शकतो किंवा पुढील इयत्तेमध्येही जाऊ शकतो. दुसऱ्या वर्षी ८० श्रेयांकासह शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी पदविकाधारक होऊन शिक्षण सोडू शकतो. तर, तिसऱ्या वर्षीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी पदवीधर होतो. या वर्षात विद्यार्थ्याचा सीजीपीए ७.५ इतका असेल तर हा विद्यार्थी चौथ्या वर्षी अर्थात संशोधन किंवा ऑनर्स पदवीसाठी पात्र ठरतो आणि त्याने हे शिक्षण पूर्ण केल्यास त्याला ऑनर्सची पदवी मिळते. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा सीजीपीए ७.५ इतका असेल ते विद्यार्थी पदव्युत्तर पदवी शिक्षण न घेता थेट ‘पीएचडी’ अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात.

हेही वाचा :  IGNOU TEE Paper Leak: प्रश्नपत्रिका मिळण्याआधीच 'ती'च्याकडे उत्तरे असायची तयार!

विद्यापीठ अनुदान आयोगाने ‘पीएचडी पदवीची प्रमाणित पद्धत निश्चित करणारे नियमन २०२२’चा मसुदा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये हे बदल सुचविण्यात आले आहेत. याचबरोबर आयोगाने चार वर्षे ऑनर्स आणि संशोधनासह पदवीचा मसुदाही प्रसिद्ध केला आहे. यानुसार केंद्रीय विद्यापीठे शैक्षणिक वर्ष २०२२-२३पासून चार वर्षे पदवी शिक्षण देण्याची तयारी सुरू करत आहेत. या मसुद्यानुसार चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्याकडे १६० ते १७६ श्रेयांक असणे आवश्यक आहे. चार वर्षे शिक्षण घेऊन पदवी घेतलेल्या विद्यार्थ्याला पदव्युत्तर पदवी शिक्षण घ्यायचे असेल तर त्याला एका वर्षात हे शिक्षण घेण्याची मुभा आहे. तर, तीन वर्षांनंतर पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याला दोन वर्षे पदव्युत्तर पदवी शिक्षण घ्यावे लागणार आहे. पदवी शिक्षणादरम्यान प्रत्येक श्रेयांकासाठी ४५ तासांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे. हा अभ्यासक्रम वर्गशिक्षण, प्रात्यक्षिक शिक्षण, इंटर्नशिप, सेमिनार्स, सामाजिक सेवा अशा विविध भागांमध्ये विभागला गेला आहे. तर, सर्व पदवी शिक्षणासाठी आता काही समान विषय असणार आहेत. यामध्ये इंग्रजीसह स्थानिक भाषा, पर्यावरण, भारताची ओळख, डिजिटल शिक्षण, गणित आणि कम्प्युटेशनल थिंकिंग, आरोग्य, योग अशा विषयांचा समावेश असणार आहे.

हेही वाचा :  नाशिक अंगणवाडी भरती

वैद्यकीय शिक्षण देशातच पूर्ण करू द्या; युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुप्रीम कोर्टात याचिका

विभागीय आयुक्त पुणे येथे विविध पदांची भरती, जाणून घ्या तपशील
NBE FMGE 2022: फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट परीक्षेचे नोटिफिकेशन जाहीर

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …