India W vs Bangladesh W : भारतीय महिला संघाकडून बांग्लादेशचा 110 धावांनी पराभव

Women World Cup India Vs Bangladesh : हॅमिल्टन येथे झालेल्या महिला विश्वचषक (Women’s World Cup 2022) स्पर्धेत भारतीय महिला संघाने बांगलादेशवर 110 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. फिरकीपटू स्नेह राणाने बांगलादेशच्या फलंदाजांना कोंडीत पकडत महत्त्वाच्या चार विकेट्स घेतल्या. भारताने बांगलादेशला 230 धावांचे लक्ष्य दिले होते. विजयासाठी 230 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 40.3 षटकांत अवघ्या 119 धावांत सर्वबाद झाला. सलमा खातूनने सर्वाधिक 32 धावा केल्या. 

आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेत भारताने 50 षटकांत 7 बाद 229 अशी खेळी केली. यास्तिका भाटिया आणि शेफाली वर्मा तसेच ऋचा घोष यांच्या हॅमिल्टनमध्ये बांगलादेशविरुद्धच्या शानदार अर्धशतकी खेळीमुळे भारताला चांगली धावसंख्या गाठता आली. प्रथम फलंदाजी करताना, मिताली राजने चांगली सुरुवात केली.

शैफाली आणि स्मृती मानधना यांनीही सुरुवातीला चांगली खेळी केली. मात्र, बांगलादेशने स्मृती मानधना, शैफाली वर्मा आणि मिताली राज यांच्या तीन झटपट विकेट घेत भारताला बॅकफूटवर आणले. पुढे भारताने हरमनप्रीत आणि ऋचा घोष यांना गमावले पण यस्तिका भाटियाने मैदानावर टिकून दमदार अर्धशतक ठोकून भारताला शेवटी चांगली धावसंख्या गाठण्यास मदत केली.

हेही वाचा :  रोहित दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेला मुकणार? या खेळाडूला मिळू शकते संधी

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …