IND vs NZ Score Live : भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरी वन-डे, सामन्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

IND vs NZ 2nd ODI Score Live : आज भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळवला जात आहे. पहिला सामना भारताने जिंकला असून आता दुसरा सामना खेळवला जाणार आहे. दरम्यान भारताने आजचा हा सामना जिंकल्यास मालिकाही भारताच्या नावावर होणार आहे. तर दुसरीकडे मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी न्यूझीलंड संघाला आज विजय मिळवावा लागणार आहे.

आजचा हा सामना रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सामना होणाऱ्या रायपूर क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी भारतातील इतर विकेट्सप्रमाणे फलंदाजांसाठी अनुकूल आहे. येथील विकेट टी-20 सामन्यांसारखी असेल ज्याच्या सरासरीने 170 धावा केल्या होत्या. पण जसजसा खेळ पुढे जाईल तसतशी इथली खेळपट्टी स्लो होत जाईल. म्हणजे वेगवान गोलंदाजांपेक्षा फिरकीपटू अधिक प्रभावी ठरतील. रायपूरची विकेट पाहता नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला प्रथम फलंदाजी करायला आवडेल. प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारल्यानंतर फिरकीपटूंच्या माध्यमातून नंतर फलंदाजी करणाऱ्या संघावर दबाव आणणे ही कर्णधारांची रणनीती असणार यात शंका नाही…

हेही वाचा :  भारत-न्यूझीलंड आमने-सामने, सर्वाधिक धावा ते सर्वाधिक विकेट्स, वाचा सविस्तर

भारताचा एकदिवसीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उप कर्णधार) वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराद, उमरान मलिक 

न्यूझीलंडचा एकदिवसीय संघ:

फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकिपर/कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर, जेकब डफी, डग ब्रेसवेल, मार्क चॅपमन, हेन्री शिपले

भारत विरुद्ध न्यूझीलंड Head to Head

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 114 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 56 सामने जिंकले आहेत, तर न्यूझीलंडने 50 सामने जिंकले आहेत. याशिवाय 7 सामन्यांमध्ये कोणताही निकाल लागला नाही आणि एक सामना बरोबरीत सुटला.

कुठे पाहू शकता लाईव्ह सामना?

 

भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील. .

हेही वाचा :  IND vs BAN : नाणेफेकीचा कौल बांग्लादेशच्या बाजूने, प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

हे देखील वाचा-

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …