IND vs NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिला एकदिवसीय सामना, सर्व अपडेट्स एका क्लिकवर

IND vs NZ, 1st ODI : भारतीय क्रिकेट संघ (Team India) आजपासून न्यूझीलंड संघाविरुद्ध एकदिवसीय मालिकेची (IND vs NZ ODI Series) सुरुवात करणार आहे. आजचा भारत विरुद्ध न्यूझीलंड हा पहिला एकदिवसीय हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारताने नुकताच श्रीलंका संघाला घरच्या मैदानात 3-0 ने व्हाईट वॉश दिला. विशेष म्हणजे अखेरच्या सामन्यात भारताने श्रीलंका संघाला 317 धावांच्या फरकाने मात दिली. हा एकदिवसीय क्रिकेट इतिहासाती सर्वात मोठा विजय ठरला. त्यामुळे भारत आपली ही विजयी घोडदौड श्रीलंकेविरुद्धही कायम ठेवतो का? हे पाहावे लागेल.

आजचा सामना होणाऱ्या हैदराबादमधील मैदानाची खेळपट्टी सपाट विकेटसाठी ओळखली जाते. या मैदानावर खेळ सुरू असताना विकेट स्लो होते. म्हणजे वेगवान गोलंदाजांपेक्षा फिरकीपटूंना येथे अधिक मदत मिळेल. मात्र शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्याच्या आधारे येथील विकेट फलंदाजीसाठी देखील अनुकूल असल्याचं दिसून आलं आहे. सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सामन्यात देखील मोठी धावसंख्या झाली होती. येथे खेळल्या गेलेल्या शेवटच्या सहा एकदिवसीय सामन्यांमध्ये संघाने लक्ष्याचा पाठलाग करताना तीन जिंकले आहेत. तर तीन सामन्यांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा विजय झाला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होईल हे नक्की.

हेही वाचा :  ग्राहमची हॅटट्रिक! ऑस्ट्रेलियानं पाचवा टी20 सामना जिंकला, भारतानं 4-1 नं मालिका गमावली

कुठे पाहू शकता लाईव्ह सामना?

भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   

कसे आहेत दोन्ही संघ?

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकिपर), हार्दिक पांड्या (उप कर्णधार)वॉशिंगट सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराद, उमरान मलिक 

न्यूझीलंडचा संघ: फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकिपर/कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर, जेकब डफी, डग ब्रेसवेल, मार्क चॅपमन, हेन्री शिपले

हे देखील वाचा-

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …