तुमच्या मोबाईलमधील नेटवर्क सारखा जातो का? मग या मार्गांचा वापर करा

मुंबई : नेटवर्कशी संबंधीत समस्या हा बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे. लोक आपल्या फोनला नेटवर्क मिळण्यासाठी अनेक पर्याय करुन पाहातात. परंतु तरीही लोकांना नेटवर्क मिळत नाही. तुम्ही देखील अशा समस्यांना तोंड देत असाल, तर तुमच्यासाठी ही कामाची बातमी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला फोनला नेटवर्क नसल्यावर काय करायचं यासाठी काही ट्रिक्स सांगणार आहोत.

बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की, माझा फोन खराब तर झालेला नाही ना? परंतु प्रत्येक वेळी खराब नेटवर्कचे कारण तुमचा फोन नाही, तर खराब हवामान किंवा सेल टॉवरची कमतरता देखील असू शकते. ज्यामुळे ही समस्या निर्माण होते. परंतु अशावेळी काय करावे? असा लोकांना प्रश्न पडतो, तर आज आम्ही तुम्हाला काही मार्ग सांगणार आहोत.

रिस्टार्ट करा

फोन रीस्टार्ट करणे हा देखील एक चांगला पर्याय आहे. संगणकाप्रमाणेच, तुम्ही स्मार्टफोन रीस्टार्ट करून नेटवर्क समस्येचे निराकरण करू शकता. जर तुम्ही अँड्रॉइड वापरकर्ता असाल तर तुम्हाला पॉवर बटण जास्त वेळ दाबून ठेवावे लागेल, त्यानंतर तुम्हाला रीस्टार्ट करण्याचा पर्याय मिळेल. तर आयफोन वापरकर्त्यांना होम बटण दाबावे लागेल. यानंतर तुम्हाला पॉवर स्लाइडर मिळेल, ज्याच्या मदतीने फोन बंद करावा लागेल आणि नंतर तो चालू करावा लागेल.

हेही वाचा :  आयुष्यमान कार्डमुळे कुठे होतात मोफत उपचार? कोणाला मिळतो योजनेचा लाभ?

सिम कार्ड काढा

सिम कार्ड काढणे हा देखील एक चांगला पर्याय आहे. जर तुमच्या फोनला चांगले नेटवर्क मिळत नसेल, तर तुम्हाला स्मार्टफोनमधून सिम कार्ड काढून तो परत ठेवावा लागेल. अशा प्रकारे, जेव्हा तुमच्या फोनमध्ये नेटवर्क परत येईल, तेव्हा ते अधिक चांगल्या स्थितीत असेल.

सिग्नल बूस्टर

जर वरील सर्व पर्याय काम करत नसेल, तर तुम्ही नेटवर्क बूस्टर वापरून पाहू शकता. सिग्नल बूस्टर तुमचे नेटवर्क सुधारू शकतो. मात्र, त्यांचा वापर भारतात बेकायदेशीर आहे. कारण बूस्टर वापरणारे स्पेक्ट्रम आणि वापरकर्ते त्यांना पैसे देत नाहीत. परंतु अवैध सिंगल बूस्टरच्या मदतीने तुमचे वायरलेस नेटवर्क कव्हरेज सुधारले जाऊ शकते.

फ्लाईट मोड

फ्लाईट मोड हा एक सोपा आणि जलद पर्याय आहे. हा पर्याय 99 टक्के काम करेल. जर तुम्ही अँड्रॉइड वापरकर्ता असाल तर तुम्हाला क्विक सेटिंग्ज पॅनलवर जावे लागेल. येथे तुम्हाला एअरप्लेन मोड आयकॉन मिळेल. त्यावर क्लिक केल्याने, फोन ऑफलाइन मोडमध्ये जाईल आणि नंतर तो बंद करुन सुरू केल्याने तुम्हाला एक चांगले नेटवर्क मिळेल. तर आयफोनमध्ये हा पर्याय तुम्हाला कंट्रोल सेंटरमध्ये मिळेल.

हेही वाचा :  Tata कंपनीत नोकरी हवी? iPhone कव्हर बनवण्यासाठी हवेत हजारो कामगार!

नेटवर्क सेटिंग्ज

काहीवेळा तुम्हाला चांगल्या नेटवर्कसाठी सेटिंग बदलावी लागेल. तुम्ही Android वापरकर्ता असल्यास, तुम्हाला  Settings > General > Reset > Reset Network Settings वर जावे लागेल. पुष्टी केल्यानंतर फोन रीसेट करा. तर आयफोन वापरकर्ते Settings > General management > Reset > Reset network settings करून सेटिंग रीसेट करू शकतात.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पेट्रोलची टाकी फूल केल्यास स्फोट होतो? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य

Viral News : पेट्रोलची टाकी फूल केली तर स्फोट होऊ शकतो असा दावा करणारा व्हिडिओ …

पहिला Video Call कधी, कुणी आणि कुणाला केला? तुम्हाला माहितीय का?

First Video Call : आताच जग हे इंटरनेटचं जाळ आहे. इथे प्रत्येक व्यक्तीच्या मग तो …