आयुष्यमान कार्डमुळे कुठे होतात मोफत उपचार? कोणाला मिळतो योजनेचा लाभ?

Ayushman Card Scheme: सर्वसामान्य नागरिकांसाठी केंद्र सरकार अनेक योजना आणत असते. बऱ्याचजणांना याची माहिती नसते. अशावेळी आपत्कालिनवेळी याचा भुर्दंड सहन करावा लागतो. आयुष्यमान कार्ड योजना हीदेखील अशीच एक सरकारी योजना आहे. आयुष्यमान योजनेचा थेट फायदा सर्वसामान्यांना होतो. या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना उपचार सुविधा पुरवते. याद्वारे त्यांना 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मिळू शकतात.

कोठे मिळतात उपचार?

जर कोणाकडे आयुष्मान कार्ड असेल तर तो सर्व सरकारी रुग्णालये आणि काही विशिष्ट रुग्णालयांमध्ये त्याचा लाभ घेऊ शकतो. कोरोना, कॅन्सर, किडनी, हृदयविकार, डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, डायलिसिस, गुडघा आणि हिप ट्रान्सप्लांट, मोतीबिंदू आदी आजारांवर या योजनेद्वारे उपचार करता येणार आहेत.

कोणाला मिळतो लाभ?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कच्च्या घरात राहणारे, भूमिहीन, अनुसूचित जाती किंवा जमातीचे, ग्रामीण भागात राहणारे, ट्रान्सजेंडर आणि दारिद्र्यरेषेखालील लोक याचा लाभ घेऊ शकतात. या लोकांना योजनेसाठी अर्ज करता येतो. 

नोंदणी कशी करायची?

सर्वप्रथम तुम्हाला PMJAY वेबसाइट https://pmjay.gov.in/ वर जा.
यानंतर  ‘Am I Eligible’ या पर्यायावर क्लिक करा.
समोर आलेल्या पेजवर तुमचा मोबाइल नंबर टाइप करा.
कॅप्चा कोड टाका आणि ओटीपी मिळवण्यासाठी ‘जनरेट ओटीपी’ वर क्लिक करा.
तुमचे राज्य आणि जिल्हा निवडा.
तुमचे नाव, रेशनकार्ड नंबर आणि मोबाईल नंबर शोधा.
यानंतर तुम्ही किंवा तुमचे कुटुंब या योजनेअंतर्गत पात्र आहे की नाही हे समजू शकेल. 
तुम्ही आयुष्मान भारत योजनेच्या कॉल सेंटरला 14555 किंवा 1800-111-565 वर कॉल करू शकता.

हेही वाचा :  7th Pay Commission: 'या' दिवशी मिळणार कर्मचाऱ्यांना 10500 रुपयांची खुशखबर! जाणून किती वाढणार तुमचा पगार

मिळणारे फायदे 

दर्जेदार आरोग्य सेवा: लाभार्थी देशभरातील सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये आरोग्य सेवांचा लाभ घेऊ शकतात.

कॅशलेस उपचार: या योजनेंतर्गत समाविष्ट कुटुंबे कोणत्याही आगाऊ पैसे किंवा कोणत्याही कागदपत्राशिवाय उपचार घेऊ शकतात.

पोर्टेबल: तुम्ही कार्ड सहजपणे घेऊन जाऊ शकता. तसेच हे कार्ड संपूर्ण भारतात वापरले जाऊ शकते.

वयोमर्यादा नाही: आयुष्मान भारत कार्ड बनवण्यासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘पत्नीसोबत अनैसर्गिक शरीर संबंध गुन्हा नाही’, कोणत्या प्रकरणात हायकोर्टाने दिला निर्णय?

Unnatural Intercourse: पती पत्नीमध्ये अनेक कारणांवरुन वाद होत असतात. हे वाद टोकाला गेले की कोर्टाची …

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …