Russia Ukraine Conflict : हजारो सैनिकांचे प्राण पणाला लागलेले असतानाच पुतीन यांची सिक्रेट गर्लफ्रेंड कुठे पळाली?

मॉस्को: रशिया युक्रेन या दोन्ही देशांमध्ये सुरु असणाऱ्या युद्धादरम्यानच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या खासगी आयुष्याबद्दलही बरंच बोललं जात आहे. मुख्य म्हणजे गुलदस्त्यात असणारं त्यांचं खासगी आयुष्य यानिमित्तानं प्रकाशझोतात आलं आहे. ज्यामुळं एकच खळबळ माजली आहे. (Russia Ukraine war)

गेल्या काही दिवसांपासून पुतीन यांच्या सिक्रेट गर्लफ्रेंडवर सर्वांच्या नजरा आहेत. ती नेमकी कुठे असते, ती काय करते इथपासून तिचं आणि पुतीन यांचं नेमकं काय नातं, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

दरम्यानच असा दावा करण्यात येत आहे की, पुतीन यांची ही सिक्रेट गर्लफ्रेंड स्वित्झर्लंडमध्ये आहे. (Putin Secret Girlfriend Switzerland)

तिचं नाव, गाव काय? 
(President Putin) यांची ही कथित प्रेयसी एक जिमनॅस्ट असल्याचं म्हटलं जात आहे. अलीना काबेवा असं तिचं नाव. मुख्य म्हणजे युद्धाची ठिणगी पडल्या दिवसापासूनच ती नेमकी कुठं आहे असे प्रश्न समोर आले होते. 

ऑनलाईन याचिका 
अलीना स्वित्झर्लंडमध्ये असल्याचं कळताच तिच्याविरोधात अनेकांनी ऑनलाईन याचिका दाखल केल्याचं कळत आहे. या याचिकेनुसार तिला स्वित्झर्लंडमधून बाहेर काढण्याचीही मागणी करण्यात येत आहे. 

अलीनाविरोधात आतापर्यंत 50 हजार नागरिकांनी याचिकेवर सही केल्याचं कळत आहे. 

हेही वाचा :  शेतकऱ्यांच्या मदतीची ‘गॅरंटी’ कोण घेणार? अवकाळीवरुन ठाकरेंचा सवाल; म्हणाले, 'सरकार नेत्यांच्या..'

अलीना राजकारणातही होती सक्रिय 
38 वर्षीय अलीना ऑलिम्पिक खेळांमध्येही सक्रिय होती. पुतीन यांच्या (United Russia Party)तूनही ती सक्रिय होती. सध्या मात्र पुतीन यांच्यावर जगातील बहुतांश राष्ट्रांची नाराजी असताना अलीना मात्र 3 मुलांसोबत स्वित्झर्लंडमध्ये एका आलिशान व्हिलामध्ये असल्याचं म्हटलं जात आहे. 

अलीना फारशी माध्यमांसमोर येत नाही. पण,  अखेरच्या वेळी तिला प्रसारमाध्यमांनी टिपलं तेव्हा ती 2 महिन्यांची गरोदर असल्याचं सांगण्यात आलं होतं. पुतीन आणि अलीना यांचं नातं सर्वज्ञात असलं, तरीही या नात्याचा त्यांनी कधीच अधिकृत स्वीकार केलेला नाही. 

2008 मध्ये अलीना आणि पुतीन यांचं नाव सर्वप्रथम एकत्रितरित्या समोर आलं. 2019 मध्ये तिनं मॉस्कोमध्ये 2 मुलांना जन्म दिला. यादरम्यान तिच्यासाठी रुग्णालयातील  VIP मजला पूर्ण रिकामा ठेवण्यात आला होता. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …