Viral Video : महिलांनो सावधान! ‘या’ शहरात फिरतोय Serial Kisser

Serial Kisser Viral Video : गुन्हेगारी जगतातून सर्वात धक्कादायक आणि किळसवाणी घटना समोर आली आहे. एका अश्लील वृत्ताचा आणि हैवान माणसाचं कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. या नराधमामुळे शहरामध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे. महिला आणि तरुणींना घराबाहेर पडायला भीती वाटतं आहे. कारण हा नराधम महिलांना किंवा तरुणींना एकटा पाहून त्यांना कीस करत आहे. या Serial Kisser मुळे शहरात सर्वत्र भयावह वातावरण पाहिला मिळतं आहे. (Crime News in marathi)

महिलांनो सावधान! 

एक महिला हॉस्पिटलच्या बाहेर फोनवर बोलत असताना अचानक तिथे एक तरुण येतो. आजूबाजूला कोणी नाही हे पाहून तो महिलावर झडप घालतो. तो तिला पकडतो आणि जबरदस्ती किस करतो आणि तिथून पळून जातो. महिला काय झालं क्षणभर काहीच कळतं नाही. तिला जोरदार धक्का बसलेला आहे. (man kissing women and girls bihar Serial Kisser sexual harassment Video Viral on Internet now trending on social media)

 ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. पीडित महिलेने आपण त्याला ओळखत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 

हेही वाचा :  पहिल्या भेटीत न आवडलेल्या राजकुमार रावबरोबरच केले पत्रलेखाने लग्न, अशी घडली लव्ह-स्टोरी

कुठलीही आहे घटना?

ही धक्कादायक घटना बिहारमधील जमुईतील हॉस्पिटल परिसरातील आहे. तरुणाबद्दल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्यात आली आहे. पोलीस त्या तरुणाचा शोध घेत आहेत.

गेल्या काही महिन्यांमध्ये बिहारमध्ये गुन्हेगारीमध्ये वाढ झाली आहे. पण या घटनेनंतर शहरातील वातावरण एकदम भीतीदायक झालं आहे. 

पीडित महिलेने घटनेनंतर हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना मदतीसाठी बोलवले पण तोपर्यंत तो नराधम पळून गेला होता. या घटनेनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट पसरली आहे. वारंवार महिलांवर होणारे लैगिंक छळ आणि अत्याचाराविरोधात कठीण कायदे करण्याची मागणी करण्यात आली आहे. पण अशाप्रकारच्या नराधमाला भररस्त्यात मारुन टाका अशी मागणी होतेय. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NDA vs ‘INDIA’: तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान, मतदारांचा कौल कोणाला?

Loksabha Election 2024: तिस-या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार आहे… …

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …