फोनची स्टोरेज वारंवार फुल होतेय?, एका झटक्यात समस्या सोडवा, पाहा सोपी Tips and Tricks

नवी दिल्लीः Smartphone Tips and Tricks: अनेक वेळा अनेक जणांना स्मार्टफोनचा वापर करताना स्टोरेज फुल होत असल्याची समस्या वारंवार येत असते. तुमच्या फोनचे स्टोरेज कमी झाले असेल तसेच तुम्हाला वारंवार तुम्हाला नोटिफिकेशन येत असेल तर तुमचा फोन हाय स्पीडने काम करू शकत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही खास टिप्स आणि ट्रिक्स संबंधी माहिती देत आहोत. या ट्रिक्सचा वापर केल्यास तुम्हाला नक्कीच फायदा मिळू शकतो.

क्लिअर करा App Cache
तुमच्या फोनमध्ये अनेक कॅशे फाइल्स स्टोर होत असतात. फोनचे स्टोरेज भरण्यासाठी हे सुद्धा एक महत्त्वाचे कारण आहे. तुमच्या मोबाइल मध्ये अनेक अॅप ओपन करीत असतात. तुमच्या फोनमध्ये अॅपचे कॅशे फाइल्स जमा होत असतात. त्यामुळे तुम्हाला सल्ला आहे की, वेळोवेळी फोनमधून कॅशे फाइल्सला क्लिअर करीत राहायला हवे. असे केल्याने फोनचे स्टोरेज रिकामे राहते. तसेच फोन सुद्धा स्लो होत नाही.

वाचाः उन्हाळ्यासाठी खरेदी करा रिचार्जेबल फॅन, वीज गेल्यानंतरही देईल हवा, ५० टक्क्यांपर्यंत मिळतेय सूट

Cloud Storage चा वापर करा
जर तुमच्या फोनचे स्टोरेज वारंवार फुल होत असेल तर यासाठी सर्वात खास ऑप्शन म्हणजे फोन मधील फोटो आणि व्हिडिओ फाइल्सला क्लाउड स्टोरेजवर ट्रान्सफर करा. याचा एक फायदा होईल. तो म्हणजे नंतर तुम्ही या फोटो किंवा व्हिडिओला कुठूनही अॅक्सेस करू शकाल. मग तुमच्या जवळ फोन असो की नाही. तसेच दुसरा फायदा म्हणजे स्टोरेज फुल होण्याची भीती नाही.

हेही वाचा :  या चुका केल्याने स्मार्टफोन खराब होतो, पाहा कोणकोणत्या चुका आहेत

वाचाः Window AC च्या किंमतीत विकला जातोय Split AC, डिस्काउंट पाहून स्टॉक होतोय रिकामा

स्मार्टफोनमधून हटवा अनावश्यक Apps

तुमच्या फोनमध्ये जर अनावश्यक Apps असतील तर ते फोनमध्ये ठेवण्यात काहीच अर्थ राहत नाही. ते डिलीट किंवा काढून टाकणे गरजेचे आहे. या अॅप्समुळे स्टोरेज नेहमी फुल होत असते. त्यामुळे सर्वात आधी चेक करा की, तुमच्या फोनमध्ये अनावश्यक अॅप्स किती आहे. नंतर त्याला अनइंस्टॉल करा.

वाचाः Samsung पासून Poco पर्यंत, या महिन्यात या स्मार्टफोन्सची होणार दमदार एन्ट्री, पाहा डिटेल्स

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महारेराचा बिल्डर लॉबीला दणका; पार्किंचा वाद टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

MAHARERA: बिल्डिंगमध्ये अपुऱ्या जागेच्या अभावी पार्किंग करण्यास अडचणी येतात. हल्ली काही बिल्डर घर खरेदी केल्यानंतरच …

Viral Video : बॉसच्या जाचाला कंटाळून नोकरी सोडणाऱ्या तरुणाकडून शेवटच्या दिवशी ढोलताशे वाजवत कंपनीला निरोप

Pune Job News : सरकारी नोकरीवर (Government Jobs) असणाऱ्या अनेकांचाच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना हेवा …