बद्धकोष्ठचा त्रास रोज छळतोय? हे फळ देईल आराम

अनेकांना बद्धकोष्ठता, पोटाट गोळा येणे, इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS), पेटके, अतिसार, मूळव्याध, स्टूलमध्ये रक्त इत्यादी, दररोज पोटाशी संबंधित समस्यांमुळे त्रास होतो. पोट नीट नसेल तर ते अनेक गंभीर आजारांना जन्म देऊ शकते. या सर्व विकारांची सुरुवात बद्धकोष्ठतेपासून होते. पोट स्वच्छ नसल्यास आतड्यांमध्ये विषारी पदार्थ साचत राहतात. या गोष्टीमुळे तु्म्हाला त्रास होऊ शकतो.

खराब आहार आणि बैठी जीवनशैलीमुळे बद्धकोष्ठता किंवा पोटाच्या इतर समस्यांनिर्माण होतात. तीव्र बद्धकोष्ठता गंभीर मूळव्याध किंवा ओटीपोटात दुखणे, भूक न लागणे, मळमळ, उलट्या किंवा गोळा येणे यासारखी गंभीर लक्षणे दिसू शकतात, म्हणून वेळेवर आणि योग्य उपचार करणे आवश्यक आहे. यासाठीच आयुर्वेद डॉ मिहीर खत्री यांनी रामबाण उपाय सांगितला आहे. (फोटो सौजन्य :- Istock)

बद्धकोष्ठता आणि क्रॅम्पसाठी बेल हा एक चांगला उपाय आहे

बद्धकोष्ठता आणि क्रॅम्पसाठी बेल हा एक चांगला उपाय आहे

निरोगी राहण्यासाठी तुम्ही सफरचंद, द्राक्षे, आंबा किंवा केळीसारखी फळे तुम्ही खाता. पण या सर्वामध्ये उन्हाळ्यामध्ये मिळणारे बेलाचे फळ सर्वांसाठी फायदेशीर असते. या फळाची पाने पूजेत वापरली जातात. महादेवाला आवडणाऱ्या या फळाचे अनेक फायदे आहेत.या फळाचे सरबत बनवले जाते. युर्वेद डॉ मिहीर खत्री यांचा असा विश्वास आहे की बद्धकोष्ठता, आयबीएस आणि क्रॅम्प्ससाठी हा एक उत्तम उपाय आहे.

हेही वाचा :  ऑपरेशनशिवाय होणार मुळव्याधावर उपचार, आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं ही भाजी पाइल्सला मुळापासून उपटून टाकेल

(वाचा :- 5 Yoga Benefits: हार्वर्डने मानले चिंता कमी करणारे हे भारतीय योग प्रकार आहेत जबरदस्त)​

​बद्धकोष्ठतेसाठी आयुर्वेदिक उपचार

पोट स्वच्छ होते

पोट स्वच्छ होते

डॉक्टरांचा असा विश्वास आहे की बेल फळाचे सेवन केल्याने तुम्हाला बद्धकोष्ठता, पेटके किंवा अतिसार यासारख्या समस्यांपासून आराम मिळू शकतो. यामुळे बद्धकोष्ठता दूर होते आणि मल मोकळा करून पोट साफ होते. अतिसारावर हा एक स्वस्त उपचार आहे.

(वाचा :- पोट साफ न होणं, बद्धकोष्ठतेची समस्या झटक्यात होणार दूर,स्वयंपाकघरातील ‘हे’ ५ पदार्थ ताबडतोब खायला सुरुवात करा) ​

अतिसारासाठी चांगला उपाय

अतिसारासाठी चांगला उपाय

डॉक्टरांनी सांगितले की, कच्च्या फळाचा उपयोग अतिसार, पोटदुखीसाठी देखील केला जातो. जर तुमचे पोट सकाळी साफ होत नसेल किंवा तुम्हाला २-३ वेळा मल खाण्यासाठी जावे लागत असेल तर हे फळ तुमच्यासाठी उत्तम उपाय आहे. याचा वापर केल्याने समस्या सोडविण्यास मदत होऊ शकते.

रक्ताच्या मुळव्याधांवरही उपचार केले जातील

रक्ताच्या मुळव्याधांवरही उपचार केले जातील

डॉक्टरांनी सांगितले की बेल फळाचा गर गूळ किंवा मधासोबत घेतल्याने रक्तस्त्राव, अल्सरेटिव्ह कोलायटिस, रक्तस्त्राव मूळव्याध यांसारख्या गंभीर समस्यांमध्येही आराम मिळतो. या फळामुळे तुम्हाला आराम मिळण्यास मदत मिळतो.

हेही वाचा :  Food For Constipation : जुन्यातील जुना बद्धकोष्ठतेचा समूळ नाश करतील हे ६ पदार्थ, आतड्यांमधली घाण काढून टाकतील

भूक आणि पचन सुधारते

भूक आणि पचन सुधारते

डॉक्टरांनी सांगितले की हे फळ भूक आणि पचन देखील सुधारते. याचा अर्थ असा की जर तुमची भूक कमी होत असेल किंवा पचन कमी होत असेल तर तुम्ही या फळाचे सेवन करून या समस्येपासून आराम मिळावा.

(वाचा :- आता बिनधास्त खा रबडी-जिलेबी! या भयंकर आजारापासून मिळेल कायमची सुटका, फक्त डॉक्टरांनी सांगितलेली वेळेतच खा) ​

कसा वापर कराल

कसा वापर कराल

डॉक्टरांच्या मते हे फळ ऊर्जा सुधारण्यासाठी देखील वापरले जाते. तुम्ही या फळाचा रस घेऊ शकता आणि ज्यूससाठी नेहमी पिकलेल्या फळांचा वापर करू शकता.
(टिप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …