Sanjay Raut : ‘मिंधे गट पूर्वी बाप पळवत होते, आता मुलं पळवायला लागलेत’, संजय राऊत यांची टीका

Sanjay Raut On Shinde Group : शिंदे मिंधे गट पूर्वी बाप पळवत होते आता मुलं पळवायला लागलेत अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी केली आहे. ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचे पूत्र भूषण देसाई यांच्या शिंदे गटातील प्रवेशावरून राऊतांनी टोला लगावला आहे. (Maharashtra Political ) दरम्यान, गोरेगाव भाजपकडून भूषण देसाई यांना विरोध करण्यात आला आहे. (Maharashtra Political News)

 भूषण देसाई यांनी सोमवारी शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. यावरुन विविध राजकीय चर्चा सुरु असताना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीकास्र सोडले आहे. सुभाष देसाई हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. पण त्यांचा मुलगा हा शिवसेनेत नव्हता. काल सुभाष देसाईंनी निवदेन जारी करत भूषण देसाई हे शिवसेनेचे सदस्य नव्हते, हे स्पष्ट केले आहे. पण मिंधे गट कधी बाप पळवतात. आता मुलंही पळवायला लागले आहेत. त्यांची ही मेगा भरती सुरु आहे, ती कुचकामी आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. 

हेही वाचा :  Gold & Silver Rate: सोन्याच्या दरामध्ये ऐतिहासिक वाढ; चांदीही चमकली! जाणून एका तोळ्याचे दर

भूषण देसाई यांच्यावर उदय सामंत यांचे आरोप

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काही महिन्यांपूर्वी भूषण देसाई यांच्यावर आरोप केले होते. त्यांच्या चौकशीचे आम्ही आदेश दिले आहेत, असेही त्यांनी सांगितलं होते. मात्र, त्यांनी आता भूषण देसाई यांना भाजपाच्या वाशिंगमशीनमध्ये टाकून आपल्या बाजुला बसवले आहे. ही भाजपाच्या वाशिंगमशीनची कमाल आहे. मग उदय सामंत यांच्या आरोपांचं काय, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केलाय.

भाजपचे मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र

सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाईने शिवसेनेत प्रवेश केला. मात्र या प्रवेशाला स्थानिक भाजपमधूनच विरोध होत आहे. गोरेगाव विधानसभेचे भाजप उपाध्यक्ष संदीप जाधव यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच याबाबत पत्र लिहिले आहे. भूषण देसाई कोणत्या तरी आर्थिक व्यवहारातून वाचण्यासाठीच शिवसेनेत आल्याचा आरोप भाजपने या पत्रात केला आहे. 

… आधी त्या व्हिडिओची सत्यता पडतळा – राऊत

तसेच यावेळी शीतल म्हात्रेंच्या व्हिडिओबाबत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. आधी या व्हिडिओची सत्यता पडतळा. ज्याची बदनामी झाली आहे, ते गप्प आहेत. त्यांनी पुढे आले पाहिजे. त्यांनी काही तक्रार केली आहे का? हेही पाहिले पाहिजे. खरं काय ते बाहेर आले पाहिजे. महिलांचा सन्मान केला पाहिजे, पण सूडासाठी काही गोष्टी वापरल्या तर तसेच उत्तर मिळेल हे लक्षात ठेवावं, असा इशारा संजय राऊत यांनी दिलाय. शीतल म्हात्रेंच्या व्हिडिओबाबत त्यांनी हे उद्गार काढले. त्यामुळे सरकारने आता चौकशीचे आदेस दिले आहेत. त्यामुळे यातून आता पुढे काय येत याची उत्सुकता आहे. ज्यांनी हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर टाकला होता. तो मूळ व्हिडिओ आता काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळे खरं काय आणि खोटं काय, हे पुढे आले पाहिजे, अशी प्रतिक्रिया आता राजकीय वर्तुळातून येत आहे. 

हेही वाचा :  'जनाब'सेना म्हणणाऱ्या भाजपा नेत्यांना संजय राऊतांनी दिलं उत्तर; मेहबुबा मुफ्तींची आठवण करुन देत म्हणाले... | Shivsena Sanjay Raut on BJP Leaders Maharashtra CM Uddhav Thackeray MIM Alliance Proposal sgy 87

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय; वाढत्या गर्दीमुळं ‘या’ स्थानकांदरम्यान धावणार विशेष रेल्वे; तातडीनं पाहा वेळापत्रक

Konkan Railway News : मे महिन्याची सुट्टी, शिमगा आणि गणेशोत्सव यादरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या …

भारतात लवकरच आपोआप दुरुस्त होणारे रस्ते? NHAI ने सुरु केलं काम; खड्ड्यांची समस्या कायमची संपणार

Self Healing National Highways In India: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या नेतृत्वाखालील रस्ते वाहतूक मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या …