आमिरची दोन्ही लग्न तुटली पण बायकोशी आजही नाते दोरखंडासारखे घट्ट, चॉकलेट बॉयने सांगितले रहस्य

बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता आमिर खानचा आज 58 वा वाढदिवस आहे. सोशल मीडिया आणि अवॉर्ड फंक्शनपासून दूर राहणाऱ्या मोजक्या स्टार्समध्ये त्याची सुद्धा गणना होते. याशिवाय आमिर खान (Happy 58th Birthday Aamir Khan) चित्रपटांसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत असतो. ‘लाल सिंह चड्ढा’च्या प्रमोशनसाठी गेल्या वर्षी ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात आमिरने हजेरी लावली होती. यावेळी Karan Johar ने आमिरला त्याच्या दोन अयशस्वी झालेल्या लग्नांबद्दल प्रश्न विचारले तेव्हा त्याने असे उत्तर दिले जे ऐकल्यानंतर सर्वत्र घटस्फोटानंतर एक्स-पार्टनरसोबत कसं नातं असावं यावर बरीच चर्चा झाली. आमिर खानने सांगितले की, मला माझ्या दोन्ही एक्स पत्नींबद्दल खूप आदर आहे. विभक्त झाल्यानंतरही आम्ही नेहमीच एका कुटुंबासारखे राहतो. आम्ही सगळे कितीही व्यस्त असलो तरी आठवड्यातून एकदा एकत्र येतो.

आम्हाला एकमेकांबद्दल काळजी, प्रेम आणि आदर आहे. Kiran Rao सोबत लग्न करण्यापूर्वी आमिर खानने ReenaDutta सोबत पहिले लग्न केले होते. आमिर जवळपास 15 वर्षे दोन्ही लग्नात राहिला. त्याला रिनाकडून Ira khan and Junaid khan अशी दोन मुले आहेत तर दुसरी पत्नी किरणकडून Azad Rao khan हा एक मुलगा आहे. 2021 मध्ये दुसऱ्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर आमिर खान आता सिंगल आहे. पण आमिर आजही एक चांगला बाबा आणि सर्वोत्तम जोडीदार म्हणून ओळखला जातो. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुमच्यासोबत आमिर खानच्या अशा काही रिलेशनशिपला हॅंडल करण्यासाठी टिप्स शेअर करणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या पार्टनर आणि कुटुंबासोबत नेहमीच हेल्दी बाँडिंग शेअर करू शकता. (फोटो सौजन्य :- amirkhanactor_इंस्टाग्राम, iStock)

हेही वाचा :  'सोलापुरातल्या लोकांनी मला उपाशी झोपू दिलं नाही'; गृहप्रकल्प पाहून पंतप्रधान मोदी भावूक

नात्यात Ego आणू नका

-ego-

आमिर खानची एक्स पत्नी किरण राव हिने त्यांच्या लग्नाबद्दल एका मुलाखतीत सांगिताना म्हटलं होतं की, आमच्या दोघांमध्ये कधीच इगो आला नाही. जोडीदार असण्यासोबतच आम्ही चांगले मित्रही आहोत. रिलेशनशिपमध्ये आम्ही कधीच एकमेकांना दबावात ठेवण्याचा प्रयत्न केला नाही. आमिरसोबत राहत असताना आपल्या हक्काच्या व सुरक्षित घरात असल्यासारखे वाटते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या पार्टनरलाही तुमच्यासोबत कम्फर्टेबल आणि सुरक्षित वाटत आहे का याची खात्री करा. यामुळे दोघांच्या विचारांत मतभेद असूनही चांगले नाते टिकून राहू शकते.

(वाचा :- लग्नानंतरही पुरूष का होतात दुस-या महिलांकडे आकर्षित? अखेर समोर आली 5 धक्कादायक खरी कारणं, पायाखालची जमिन सरकेल)​

पार्टनरचा आदर करा

पार्टनरचा आदर करा

आमिर खानचे दोन्ही लग्न जरी टिकली नसली तरी त्याच्या दोन्ही एक्स वाईफ्सच्या मते, आमिर हा खूप चांगला माणूस आहे. आजही आमिर आपल्या दोन्ही पत्नींना खूप आदर देतो. तसेच त्यांची गणती आयुष्याला कलाटणी देणा-या महत्त्वाच्या महिलांमध्ये करतो. तुम्ही एकत्र असाल किंवा नसाल तरीही एकमेकांचा आदर करणे नेहमीच चांगली गोष्ट आहे.
(वाचा :- भाभी जी घर पर है मधील अंगुरी भाभीने का तोडलं नव-यासोबत 19 वर्षाचं नातं, शाळेतून सुरू झालेली शुभांगीची लवस्टोरी)​

हेही वाचा :  लाल रंगाच्या गाऊनमध्ये आमिर खानची मुलगी आयराची एंगेजमेंट, किरण रावचा साधा लूक पाहून हडबडून जाल

भुतकाळावरून जज करू नका

भुतकाळावरून जज करू नका

प्रत्येकाचा एक भूतकाळ असतो, ज्यावरून एखाद्याला जज देणे हे मूर्खपणापेक्षा कमी नाही. आमिर खान आणि त्याची एक्स पत्नीमध्ये आजही अतिशय हेल्दी नाते आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही भूतकाळातील सर्व वाईट क्षण विसरता आणि फक्त एकमेकांसोबत घालवलेल्या चांगल्या क्षणांची आठवण ठेवता व मुव्ह ऑन होता.
(वाचा :- धडधाकट पुरूष असूनही मी बायकोला आवरू शकत नाही याची लाज वाटू लागलीये,पुरूषाचा जन्म घेतला यात चूक आहे का हो माझी?)​

कठीण काळात एकमेकांसोबत उभे राहा

कठीण काळात एकमेकांसोबत उभे राहा

आज जरी आमिर खानने आपल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला असला तरी प्रत्येक कठीण प्रसंगी ते एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात. घटस्फोटानंतर जोडप्यांमध्ये ही गोष्ट सहसा दिसत नाही. पण असे केल्याने लग्न तुटल्यानंतरही तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत मैत्रीचे नाते जपू शकता. यामुळे तुम्ही इमोशनली मॅच्युअर देखील होता.
(वाचा :- काय आहे रिलेशनशिपचा 3 Month Rule? ब्रेकअपनंतर फॉलो केल्यास नवीन पार्टनर मिळाल्यावर सोन्याहून पिवळं होईल नातं.!)​

मुलांना पर्सनल मतभेदांपासून दूर ठेवा

मुलांना पर्सनल मतभेदांपासून दूर ठेवा

घटस्फोटाचा सर्वात जास्त परिणाम मुलांवर होतो. पण प्रकरण समजूतदारपणे हाताळले तर मुलांना त्याच्या गंभीर परिणामांपासून वाचवता येऊ शकते. आमिर याचे उत्तम उदाहरण आहे. तीन मुलांचा बाबा असूनही त्याने पुन्हा घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. पण आपल्या मुलांना याची झळ कधीच बसू दिली नाही. हे तेव्हाच शक्य होते जेव्हा दोन्ही जोडीदार वेगवेगळं राहूनही मुलांची जबाबदारी घेण्यास सहमत असतात.
(वाचा :- पुरूषहो, हे 6 गुण ज्या मुलांमध्ये असतात त्यांना मुली समजतात Husband Material, कधीच सिंगल राहत नाहीत असे पुरूष)​

हेही वाचा :  इंडोनेशियातील समुद्रात भीषण दुर्घटना; बोट उलटल्याने 15 जणांचा बुडून मृत्यू, 19 जण बेपत्ता; शोध सुरु

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मैत्रिणींसोबत ट्रिपला गेली, हॉटेलमध्ये झालं असं काही की घरी येताच महिलेने नवऱ्याला दिला घटस्फोट

Trending News In Marathi: पती-पत्नी यांच्यात अनेक कारणांवरुन वाद होत असतात. कधी कधी याच वादातून …

पहिल्या तीन महिन्यातच मोडला कणा; ‘या’ कंपनीकडून 6000 कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची तयारी, नावांची यादीही तयार

Layoff News : फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या महिन्यांदरम्यान अनेक कंपन्यांमध्ये लगबग पाहायला मिळते ती …