काँग्रेस आमदाराने राजभवनासमोर स्वत:चा चेहऱ्याला फासलं काळं; Video झाला Viral

Winning MLA Smears Black Ink On His Face: सामान्यपणे पराभूत झालेल्या किंवा एखाद्या लोकप्रितिनिधीच्या कामावर नाराज असल्यावर संतापून कोणीतरी अशा लोकप्रतिनिधीच्या चेहऱ्याला काळं फासण्याचा प्रयत्न केल्याच्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. मात्र राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार फूल सिंह बरैया हे लवकरच स्वत:चं तोंड काळं करुन घेतलं आहे. मात्र निवडणूक जिंकल्यानंतरही या नवनिर्वाचित आमदाराने असं का केलं आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यामागे एक रंजक कारण आहे. एकेकाळी बहुजन समाजवादी पार्टीचे अध्यक्ष राहिलेले फूल सिंह बरैया आता मागील बऱ्याच काळापासून काँग्रेसमध्ये आहेत. त्यांनी यंदा काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढली आणि जिंकली. ते भांडेर मतदारसंघाचे आमदार झाले आहेत. भाजपाच्या लाटेमध्ये काँग्रेसच्या मोजक्या उमेदवारांनी तग धरला आणि पक्षाचं नाव राखलं. अशाच उमेदवारांपैकी एक आहेत फूल सिंह बरैया! मात्र विजयानंतरही फूल सिंह बरैया आपलं तोंड काळं केलं आहे.

…म्हणून तोंड काळं करुन घेतलं

काँग्रेस आमदार फूल सिंह बरैया यांनी आज राजभवनासमोर स्वत:चं तोंड काळं करुन घेतलं. बरैया यांनी निवडणुकीचा निकाला लागला त्या दिवशीच दुपारी 7 तारखेला 2 वाजता भोपाळमध्ये राजभवनाच्या समोर आपल्या तोंडाला काळं फासणार आहोत असं जाहीर केलं होतं. आता असं करण्यामागील कारण म्हणजे फूल सिंह बरैया यांनी निवडणुकीपूर्वी एक विधान केलं होतं. भारतीय जनता पार्टीने राजस्थानमध्ये 50 हून अधिक जागा जिंकल्या तर मी माझ्या तोंडाला सर्वांसमोर काळं फासून घेईन, असं फूल सिंह बरैया म्हणाले होते. भाजपाने राजस्थानमध्ये 115 जागा जिंकल्या तर काँग्रेसने 69 जागा जिंकल्या. त्यामुळेच बरैया यांनी आपलं तोंड काळं करुन घेतलं आहे. 

हेही वाचा :  Viral Romace Video : परत दिसली 'रोमान्स'वाली स्कूटी! प्रेमी युगुलांचं खुल्लम खुल्ला प्रेम

समर्थकांबरोबर राजभवनासमोर गेले अन्…

आपल्या समर्थकांसहीत राजभवनासमोर जाऊन बरैया यांनी आपल्या चेहऱ्याला काळं फासून घेतलं. तसेच ईव्हीएमला विरोध असल्याने ईव्हीएमच्या पोस्टरलाही बरैया यांनी काळं फासलं. यावेळेस काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह सुद्धा उपस्थित होते.

…म्हणून लढलो निवडणूक

निकालानंतर बोलताना फूल सिंह बरैया यांनी आपण आपल्या विधानावर कायम आहोत असं स्पष्ट केलं होतं. मी काही भाजपाचा नेता नाही जो दिलेला शब्दावरुन मागे फिरेल असं म्हणत लोकशाहीच्या संरक्षणासाठी रक्ताने तोंड लाल करण्याचीही आपली तयारी असल्याचं फूल सिंह बरैयांनी म्हटलं होतं. ‘बॅलेट पेपरमध्ये 90 टक्के मतं आम्हाला मिळाली. आम्ही ईव्हीएममध्ये पराभूत झालो. भाजपाने व्होट आणि नोटची निवडणूक लढली. आम्हाला ईव्हीएमवर विश्वास नाही. आमच्या पराभवाचं मुख्य कारण ईव्हीएमच आहे,’ असं फूल सिंह बरैया म्हणाले. पुढे बोलताना, “पोटनिवडणुकीमध्ये नरोत्तम मिश्रा यांनी मला शिवी घालून निवडणूक मोहिमेला सुरुवात केली. लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम त्यांनी केलं. म्हणून मी त्यांना निवडणुकीमध्ये पराभूत करण्याचा प्रण घेतला आणि तो पूर्ण केला,” असंही फूल सिंह बरैया यांनी सांगितलं.

हेही वाचा :  Exit Polls: एक्झिट पोल म्हणजे काय असतं? ओपिनियन पोल वेगळं असतं का? जाणून घ्या एका क्लिकवर!

मिळवला मोठा विजय

मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीमध्ये फूल सिंह बरैया यांनी भांडेर मतदारसंघातून 29 हजार 438 मतांनी निवडणूक जिंकली. त्यांनी भाजपाचे धनश्याम पिरौनिया यांना पराभूत केलं आहे.Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Anti Paper Leak Law: मोठी बातमी! पेपरफुटीला बसणार आळा; सरकारने मध्यरात्री नवा कायदा केला लागू

What is Anti Paper Leak Law: युसीजी नेटचा पेपर लीक झाल्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात …

धावत्या स्कूल व्हॅनचा मागचा दरवाजा उघडला आणि… काळजचा थरकाप उडवणारा Video

School Van Incident CCTV : शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बस आणि स्कूल व्हॅनसाठी (School …