हे ६ घरगुती पदार्थ बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय, आतड्यांतील सर्व घाण पडेल बाहेर

बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या आहे. ज्यामुळे दररोज एखाद दुसरा माणूस त्रासलेला असतोच. बद्धकोष्ठतेचे सर्वात मोठे कारण म्हणजे अन्नामध्ये फायबरची कमतरता, कमी पाणी पिणे आणि कोणत्याही प्रकारच्या शारीरिक हालचालींमध्ये सहभागी न होणे. जेव्हा बद्धकोष्ठता असते तेव्हा मल घट्ट किंवा कठोर बनतो, जो बाहेर येऊ शकत नाही. एक-दोन दिवस असे झाल्यास ती समस्या नाही, परंतु यापेक्षा जास्त दिवस ही समस्या कायम राहिल्यास हे तीव्र बद्धकोष्ठता चे लक्षण असू शकते.

बद्धकोष्ठतेला हलक्यात घेणे तुम्हाला महागात पडू शकते. कधीकधी दीर्घकालीन बद्धकोष्ठतेमुळे मूळव्याध, फिस्टुला, फिशर किंवा गंभीर आतड्यांसंबंधी रोग होऊ शकतात. बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी अनेक औषधे आणि उपचार उपलब्ध आहेत, परंतु काही घरगुती उपायांनी तुम्ही या समस्येपासून आराम मिळवू शकता. पोषणतज्ज्ञ लवनीत बत्रा तुम्हाला असेच काही नैसर्गिक उपाय सांगत आहोत, ज्यामुळे जुनाट बद्धकोष्ठता सहज दूर होऊ शकते. (फोटो सौजन्य – iStock)

बद्धकोष्ठतेसाठी घरगुती उपाय

हेही वाचा :  आतड्यांना पिळवटून टाकणाऱ्या मुळव्याधावर आयुर्वेदिक उपाय, ऑपरेशनशिवाय व्हाल बरे

दही + फ्लेक्स सीड पावडर

दही + फ्लेक्स सीड पावडर

दह्यात बिफिडोबॅक्टेरियम लॅक्टिस नावाचे प्रोबायोटिक असते. हे पचनसंस्थेला दुरुस्त करण्यास मदत करते. अळशीबाबत बोलायचे झाल्यास त्यात विद्राव्य तंतू आढळतात. विरघळणारे फायबर पाण्यात विरघळते, ज्यामुळे मल मऊ आणि सहज पास होतो.

आवळा रस

आवळा रस

आवळा केवळ बद्धकोष्ठतेपासून आराम देत नाही तर अनेक आरोग्य समस्या दूर करण्याची क्षमता देखील त्यात आहे. आवळ्याचा ३० मिली रस सकाळी एक ग्लास पाण्यात मिसळून प्यायल्याने पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

​(वाचा – दुपारी ३ ते ४ पेंगताय? डॉक्टरांकडून धक्कादायक खुलासा)​

ओटस चोकर

ओटस चोकर

ओटसच्या चोकरमध्ये विरघळणारे आणि न विरघळणारे असे दोन्ही प्रकारच फायबर असतात. हे दोन्ही घटक बद्धकोष्ठता दूर करण्यास आणि आतड्यांचे कार्य सुधारण्यास मदत करतात.

( वाचा – Vitamin D in India : विटामिन डी च्या अधिक सेवनाने हाडे होतील ढिसूळ, शरीरात तयार होतील दगड)

तूप + दूध

तूप + दूध

तूप हे ब्युटीरिक ऍसिडचा एक उत्तम स्रोत आहे. ज्याने आतड्यांतील चयापचय सुधारते आणि मल बाहेर पडण्याच्या हालचालीत मदत करते. रात्री झोपताना एक कप कोमट दुधात १ चमचा तूप मिसळणे हा बद्धकोष्ठता कमी करण्याचा प्रभावी उपाय आहे.

हेही वाचा :  Bleeding Piles : मुळव्याध झालाय? मग औषधं व सर्जरी सोडा, घरच्या घरी करा या 5 उपायांनी मिळवा मुक्ती..!

(वाचा – Vitamin D in India : विटामिन डी च्या अधिक सेवनाने हाडे होतील ढिसूळ, शरीरात तयार होतील दगड)​

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्या

पालक, ब्रसेल्स स्प्राउट्स आणि ब्रोकोली यांसारख्या पालेभाज्या केवळ फायबरने भरलेल्या नसतात, तर त्यामध्ये फोलेट तसेच जीवनसत्त्वे सी आणि के देखील असतात. हे सर्व घटक आतड्यांच्या कार्याला चालना देण्यासाठी उपयुक्त आहेत.

​(वाचा – Diet Plan For Men After 40 : चाळीशीनंतर हाडं होतात खिळखिळी, या ५ पदार्थांनी शरीर ठेवा तंदुरूस्त)​

पुरेसे पाणी प्या

पुरेसे पाणी प्या

बद्धकोष्ठता टाळण्याचा किंवा त्यापासून आराम मिळवण्याचा सर्वात स्वस्त आणि सोपा मार्ग म्हणजे भरपूर पाणी पिणे. पाण्याव्यतिरिक्त इतर द्रवपदार्थ देखील बद्धकोष्ठता सुधारतात. एकूणच, फायबरयुक्त पदार्थ आणि पाण्याचे सेवन हा बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हा कोणत्याही प्रकारे एखाद्या औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महारेराचा बिल्डर लॉबीला दणका; पार्किंचा वाद टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

MAHARERA: बिल्डिंगमध्ये अपुऱ्या जागेच्या अभावी पार्किंग करण्यास अडचणी येतात. हल्ली काही बिल्डर घर खरेदी केल्यानंतरच …

Viral Video : बॉसच्या जाचाला कंटाळून नोकरी सोडणाऱ्या तरुणाकडून शेवटच्या दिवशी ढोलताशे वाजवत कंपनीला निरोप

Pune Job News : सरकारी नोकरीवर (Government Jobs) असणाऱ्या अनेकांचाच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना हेवा …