Improve Laptop Speed: लॅपटॉप स्लो झाल्यामुळे टेन्शन आलय ? या सोप्या टिप्समुळे वाढेल वेग

Laptop Speed Tips: आजकाल प्रत्येकाला लॅपटॉपची गरज असते. कारण, त्याचा उपयोग ऑफिसच्या कामासाठी अभ्यास आणि मनोरंजनासाठीही होतो. लॅपटॉपचा इतक्या कामांसाठी सतत वापर केल्यामुळे साहजिकच, काही वेळानंतर लॅपटॉप स्लो किंवा हँग व्हायला लागतो, ज्याचा कामावर परिणाम होतो आणि पर्यायी युजर्सनाही मोठा त्रास होतो. आजकाल Work From Home मुळे प्रत्येक घरी लॅपटॉप पाहायला मिळतात. काही जण त्याची योग्य काळजी घेतात. तर, काही लोकत्याकडे दुर्लक्ष करतात. तुम्हीही जर कामानिमित्त लॅपटॉपचा खूप वापर करत असाल आणि तुमच्या लॅपटॉपमध्येही अशी समस्या असेल तर आता काळजी करण्याची आवश्यकता नाही. आज आम्ही तुमच्यासोबत काही भन्नाट टिप्स शेयर करणार आहो , ज्यांच्या मदतीने तुम्ही करून तुम्ही तुमच्या लॅपटॉपचा वेग वाढवू शकता. चला तर मग पाहूया या भन्नाट टिप्स, ज्या लॅपटॉपच्या स्पीडची समस्या सोडविण्यात कामी येतील.

Update

update

नेहमी अपडेट ठेवा : कोणताही लॅपटॉप स्लो होण्याचे कारण ते वेळेवर अपडेट न करणे हे देखील असू शकते. त्यामुळे जर तुम्ही तुमचा लॅपटॉप बराच काळ अपडेट केला नसेल तर लगेच अपडेट करा, यामुळे तुमच्या लॅपटॉपचा वेग वाढेल.

हेही वाचा :  Computer Shortcut Keys: कॉम्प्युटर व लॅपटॉपवर काम करताना ‘या’ शॉर्टकट कीचा होईल उपयोग, जाणून घ्या

डिस्क क्लीनअप आवश्यक आहे: तुम्हाला जी फाईल काढायची आहे ती निवडा आणि ओके वर क्लिक करा. यानंतर, सिस्टम फाइल्स क्लीनअप वर जा आणि तुम्हाला हटवायची असलेली फाइल निवडा आणि ती सिस्टममधून काढून टाका. या कामासाठी तुम्ही सॉफ्टवेअरचीही मदत घेऊ शकता.

वाचा :Realme 9i 5G अवघ्या ६९९ रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी, ऑफर काही दिवसांसाठीच

Unnecessary Software

unnecessary-software

अनावश्यक सॉफ्टवेअर्स काढा : बर्‍याच वेळा युजर्स असे काही सॉफ्टवेअर डाउनलोड करतात, ज्याचे काम त्यांना पुन्हा पडत नाही किंवा अनेक वेळा असेही होते की, युजर्स सॉफ्टवेअर डाउनलोड करून त्याचे काम झाल्यावर त्याबद्दल विसरतात. अशा परिस्थितीत, सॉफ्टवेअर खूप जागा घेते, ज्यामुळे तुमची विंडोज ऑपरेटिंग सिस्टम लोड होते आणि तुमचा लॅपटॉप स्लो होतो . म्हणूनच, आवश्यक नसलेले सॉफ्टवेअर लॅपटॉपमधून काढून टाकणे कधीही चांगले. यामुळे लॅपटॉप पूर्वीप्रमाणेच चांगल्या स्पीडने काम करायला लागेल .

वाचा :IND vs ENG: खूप कामाचे आहे Google चे हे फीचर,ऑन करताच आपोआप सांगणार Live Score

Extra RAM

extra-ram

अधिक रॅम वापरा: संगणक आणि लॅपटॉपचा वेग वाढवण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे. सिस्टमला चालना देण्यासाठी तुम्ही अधिक रॅम वापरू शकता. अधिक रॅम जोडल्याने सिस्टम जलद काम करेल आणि कधीही हँग होणार नाही. तुम्ही काही सुप्रसिद्ध कंपन्यांकडून RAM वापरू शकता.

हेही वाचा :  घसा व नाकात साचलेला कफ मुळापासून होईल साफ व टायफॉईड, करोनाचा धोकाही टळेल, सर्दी-खोकला सुरू होताच करा हे 5 उपाय

हार्ड डिस्क बरोबर लॅपटॉपच्या इतर भागांचीही काळजी घ्या: सर्विस सेंटरमधून किंवा घरून तुम्ही हे काम करू शकतात. यासाठी मिळणारं क्लिनींग किट बाजारात उपलब्ध आहे. यासह ब्रश, एअर ब्लोअर आणि माइक्रोफाइबर क्लोथ सुद्धा मिळेल. याने आपण लॅपटॉप वरची धुळ साफ करू शकता.. लॅपटॉपच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या टुल्स सुद्धा साफ कराव्या, नाहीतर लॅपटॉप गरम होतो, परिणामी स्लो होतो.

वाचा : सरकारचा नवा प्लान ! इंटरनेटशिवाय पाहता येणार Netflix, Prime व्हिडिओ, Jio- Airtel-Vi चे काय ?

Start programme

start-programme

स्टार्टअप प्रोग्राम लिमिटेड: लॅपटॉपचा स्टार्टअप प्रोग्राम भरपूर रिसोर्स वापरतो आणि जर विंडोजसह इतर प्रोग्राम लॅपटॉप रिसोर्स वापरत असतील तर तुमची सिस्टम हळू काम करेल. जर तुम्हाला स्टार्टअप प्रोग्राम्सची संख्या कमी करायची असेल, तर काही सोप्या गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल. दररोज वापरल्या जात नसलेल्या फाईल्स आणि फोल्डर्स हटवा आणि नंतर रीसायकल बिन रिकामा करा. असे केल्याने तुमचा लॅपटॉप वेगाने काम करू लागेल आणि स्लो स्पीडमुळे तुमच्या कामात कसलाही अडथळा येणार नाही.

Virus

virus

नियमित व्हायरस चेक न करणे : लॅपटॉप स्लो व्हायचे हे एक प्रमुख कारण असू शकते. लॅपटॉपवर आजकाल अनेक कामं केली जातात. अशात काही वेळा इंटरनेट ब्राउझ करताना, तुमचा लॅपटॉप व्हायरसच्या संपर्कात येऊ शकतो, ज्यामुळे तुमची सिस्टीम स्लो होते. यासाठी तुम्ही तुमच्या लॅपटॉपवरील स्पायवेअर आणि व्हायरस वेळोवेळी तपासत राहणे महत्त्वाचे आहे. यासोबतच लॅपटॉप सुरक्षित करण्यासाठी तुम्ही अँटी -व्हायरस स्कॅनिंग देखील चालवू शकता. असे न केल्यास व्हायरसमुळे इतरही अनेक नुकसान होऊ शक्तात.

हेही वाचा :  Over Heating मुळे होऊ शकते लॅपटॉपचे मोठे नुकसान, डिव्हाइस कूल ठेवण्यासाठी वापरा 'या' टिप्स

वाचा: मंदीची चाहूल ! Twitter नंतर Facebook ची पॅरेन्ट कंपनी असलेल्या Meta नेही ११००० कर्मचाऱ्यांना काढले

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ठाणे पालिकेतील सफाई कर्मचारी महिलेचा मुलगा बनला अधिकारी, UPSC साठी ‘अशी’ केली तयारी

UPSC Success Story: आपल्या मुलाने चांगल शिक्षण घेऊन मोठा अधिकारी व्हावं असं प्रत्येक आईला वाटत …

चंद्र एकाच जागी स्थिरावणार; तब्बल इतक्या वर्षांनी आकाशात दिसणार भारावणारं दृश्य

Lunar Standstill : चंद्र… इथं पृथ्वीवर प्रेमाच्या आणाभाकांपासून खगोलीय घटनांपर्यंत महत्वाच्या भूमिकांमध्ये आणि रुपांमध्ये हा …