‘आणखी शस्त्रं द्या,’ झेलेन्स्कींची युरोपीयन राष्ट्रांकडे मागणी, रशिया-युक्रेन युद्ध आणखी पेटणार ?


रशियन फौजांकडून कधीही हवाई हल्ले होण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात आलंय.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा आजचा १९ वा दिवस आहे. हा संघर्ष अजूनही संपलेला नसून युद्धामध्ये दोन्ही देशांमधील सैनिकांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होतोय. असे असताना युद्ध आणखी पेटण्याची शक्यता आहे. कारण युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी मंगळवारी युरोपीयन राष्ट्रांकडे शस्त्रांची मागणी केली आहे.

रशियाविरोधात युद्ध करण्यासाठी झेलेन्स्की यांनी युरोपीयन राष्ट्रांना शस्त्रे पुरवण्याचे आवाहन केले आहे. “आपण सर्वच रशियाचे लक्ष्य आहोत. म्हणूनच युक्रेनचे अस्तित्व टिकले नाही, तर पूर्ण युरोपसाठी ते धोकादायक ठरेल. त्यामुळे तुम्ही आमची मदत करुन तुमच्या स्वत:चीदेखील तुम्ही मदत करावी,” असं झेलेन्स्की यांनी युरोपीय राष्ट्रांनी उद्देशून म्हटलंय. असे आवाहन करताना झेलेन्स्की यांनी या राष्ट्रांकडे शस्त्रांची मागणी केली आहे.

झेलेन्स्की यांच्या या आवाहनानंतर युरोपीयन देशांकडून युक्रेनला शस्त्रांचा पुरवठा झाल्यास रशिया-युक्रेन यांच्यातील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे युक्रेन प्रशासन देशातील नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचे सांगत आहे. मिळालेल्या माहितीनुसार युक्रेनमधील चेर्नीव्ह येथील प्रशासनाने देशभरात अलर्ट जारी केलाय. यामध्ये रशियन फौजांकडून कधीही हवाई हल्ले होण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे संभाव्य हवाई हल्ल्यांमुळे युक्रेनमधील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे सांगण्यात आले आहे. युद्ध सुरु झाल्यापासून म्हणजेच २४ फेब्रुवारीपासून युक्रेनमध्ये आतापर्यंत ६३६ नागरिकांचा मृत्यू झालाय, असे संयुक्त राष्ट्राने सांगितले आहे.

हेही वाचा :  दुहेरी हत्याकांडाने यवतमाळ हादरले; सज्जनगड मठात आढळले दोन मृतदेह, गूढ कायम

दुसरीकडे युद्ध सुरु होऊन १८ दिवस झाले आहेत. या काळात रशियन फौजांकडून युक्रेनवर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले करण्यात आले आहेत. यामुळे रशियाला दारुगोळा तसेच मानुष्यबळाची कमी जाणवत असून आगामी दहा दिवासांत रशियाला युद्ध थांबवावे लागेल, असा दावा अमेरिकेचे लष्करी अधिकारी बेन हॉजेस यांनी म्हटलंय.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …