पहिल्या भेटीत न आवडलेल्या राजकुमार रावबरोबरच केले पत्रलेखाने लग्न, अशी घडली लव्ह-स्टोरी

अभिनेत्री पत्रलेखाचा आज वाढदिवस असून काही दिवसांपूर्वीच राजकुमार रावसह तिने लग्नाचे एक वर्ष साजरे केले आहे. सिटीलाईट्स चित्रपटातून पत्रलेखाचा प्रवास सुरू झाला मात्र त्याआधी पत्रलेखा जाहिरातींमध्ये काम करत होती आणि त्यावेळीच राजकुमारने तिला पाहिले होते. सिटीलाईट्समध्येच पहिल्यांदा दोघांनी एकत्र काम केले होते. मात्र राजकुमारची पहिली भेट ही पत्रलेखासाठी तितकीशी चांगली नव्हती. मग ११ वर्ष डेटिंग आणि कसं झालं राजकुमारसह पत्रलेखाचं लग्न एक छोटीशी प्रेमकहाणी. (फोटो सौजन्य – @rajkummar_rao Instagram)

​पहिल्या भेटीत आवडला नव्हता राजकुमार​

​पहिल्या भेटीत आवडला नव्हता राजकुमार​

पत्रलेखाने राजकुमारला LSD चित्रपटात पहिल्यांदा पाहिले होते. पण पहिल्या भेटीत पत्रलेखाला अजिबातच राजकुमार आवडला नव्हता. तर राजकुमारने जेव्हा पहिल्यांदा पत्रलेखाला एका जाहिरातीत पाहिले होते तेव्हा ‘याच मुलीशी लग्न’ करायचे असे ठरवले होते. तर पत्रलेखाने लिहिलेल्या पत्रात म्हटले की, राजकुमारबरोबर काम करायला लागल्यानंतरच जादू घडली.

​पहिले झाली मैत्री​

​पहिले झाली मैत्री​

पहिल्यांदा राजकुमार पत्रलेखाला जरी आवडला नसला तरीही त्याच्याशी मैत्री झाल्यानंतर मात्र तिला तो आवडू लागला. एकमेकांना डेट करण्यापूर्वीच दोघेही एकमेकांची सपोर्ट सिस्टिम बनले होते. दोघेही एकमेकांसह लाँग ड्राईव्हवर जायचे, एकत्र चित्रपट पाहायचे आणि एकमेकांना पाठिंबा द्यायला ऑडिशन्सलादेखील एकत्र जायचे. तर राजकुमार अशा अनेक गोष्टी करायच्या ज्यामुळे तिचा त्याच्यावरील विश्वास अधिक दृढ होत गेला.

हेही वाचा :  राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, 'वकिली करणाऱ्यांनी..'

(वाचा – धर्माच्या भिंती ओलांडून अखेर अभिनेत्री स्वरा भास्करने बांधली फहाद झिरार अहमदशी लग्नगाठ)

​जेव्हा बॅग चोरी झाली​

​जेव्हा बॅग चोरी झाली​

पत्रलेखाने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होती की ११ वर्ष दोघांनी डेटिंगनंतर लग्न केले. पण राजकुमारने जास्त पैसे नसतानाही एक अशी गोष्ट केली की ती कधीच विसरू शकत नाही. तिच्या आवडीची ब्रँडेड बॅग जी खूप महाग होती ती राजकुमारने तिच्यासाठी गिफ्ट म्हणून आणली होती. त्यावेळी राजकुमारची कमाई तितकी जास्त नव्हती. पण पत्रलेखाच्या आनंदासाठी त्याने ती आणली होती. पण ही बॅग लंडनमध्ये चोरी झाली त्यानंतर पत्रलेखा खूप रडली होती. पण हॉटेलवर पोहचल्यानंतर तशीच बॅग तिला पुन्हा मिळाली होती, जी राजकुमारने पाठवली होती.

(वाचा – प्रेमाला आसुसलेल्या राखी सावंतच्या नात्याचा खेळखंडोबा, कसे जपावे नाते सोप्या टिप्स)

​राजकुमारसाठी पत्रलेखा सर्वस्व​

​राजकुमारसाठी पत्रलेखा सर्वस्व​

पत्रलेखाने आपल्या पत्रात असंही म्हटलं आहे की, राजकुमारसाठी ती आणि तिच्यासाठी तो सर्वस्व आहेत. राजकुमारच्या अशा काही सवयी आहेत ज्या तिला सतत त्याच्यावर अधिक प्रेम करण्यास भाग पाडतात. एकदा एका आर्टिकलमध्ये दोघांचा फोटो छापून आला होता, त्यात लिहिले होते, ‘राजकुमार आपल्या गर्लफ्रेंड पत्रलेखासह’ तर त्यावर राजकुमारने ट्विट करत लिहिले, ‘पत्रलेखा आपला बॉयफ्रेंड राजकुमारसह’. आपल्या प्रेयसीला अधिकाधिक आपलेपणा आणि प्राधान्य देणे हेच खरं प्रेम आहे.

हेही वाचा :  जोडीदाराशी कितीही टोकाची भांडणे झाली तरी नातं तुटणार नाही याची हमी, फक्त फॉलो करा ‘या’ टिप्स!

(वाचा – पहिल्याच भेटीत झाले लिपलॉक, लग्नासाठी करिअरही सोडलं पण झाला घटस्फोट, अमृता-सैफची अधुरी कहाणी)

​११ वर्ष डेटिंगनंतर केले लग्न​

​११ वर्ष डेटिंगनंतर केले लग्न​

दोघेही ११ वर्ष एकमेकांना जाणून घेत होते. मात्र कधीही एकमेकांना दुरावा जाणवू दिला नाही. राजकुमारने नेहमीच पत्रलेखाला आपल्या जवळ ठेवले आणि तिला योग्य आदर आणि प्रेम दिले. त्यामुळे ११ वर्षानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि आता त्यांच्या लग्नाला १ वर्ष पूर्ण झाले आहे. ट

राजकुमार आणि पत्रलेखाचे लग्न एका फेअरीटेल स्टोरीप्रमाणे झाले. आयुष्यात असा बॉयफ्रेंड आणि नवरा असेल तर प्रत्येकालाच प्रेम आणि लग्न करावे वाटेल.

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …

‘आनंद दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संपत्तीची…’, CM एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde on Uddhav Thackeray: धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या निधनानंतर मी उद्धव ठाकरेंना …