दिनेश-दीपिकाचा लव्ह स्टोरी अशी की, प्रेमावर पुन्हा पुन्हा विश्वास ठेवावा

एकदा प्रेमात धोका मिळाला की, पुन्हा प्रेम करणं अनेकांना त्रासदायक असावे असंच वाटतं. पण लग्न, नाती या खरंतर गुंतागुंतीच्या गोष्टी आहेत. नात्यात मनाला होणारा त्रास हा अत्यंत वेदनादायी असतो आणि तो प्रत्येकाच्या वाटल्या कधी ना कधीतरी येतच असतो. काही जण यातून सावरून आपला पुढचा मार्ग काढतात तर काही जणांसाठी आयुष्यच थांबतं. क्रिकेटर दिनेश कार्तिकच्या बाबतीतही आयुष्य जणू काही थांबलंच होतं. पण दीपिकाच्या येण्याने दिनेशने पुन्हा स्वतःला सावरलं आणि तिची साथ मिळाल्यामुळे पुढे यशस्वीदेखील झाला. जाणून घेऊया दिनेश – दीपिकाची गोष्ट आणि नात्यात सर्वच संपलं आहे असं न समजता कसा मार्ग काढायचा हेदेखील.

पहिल्या बायकोकडून प्रेमात धोका

दीपिका ही दिनेशची दुसरी बायको आहे. मात्र २००७ मध्ये दिनेशने निकिताशी लग्न केलं होतं. पण आपलाच टीममेट मुरली विजय याच्यासह बायकोचं असलेलं अफेअर दिनेश सहन करू शकला नाही आणि २०१२ मध्ये त्याने घटस्फोट घेतला. त्यानंतर दिनेशचं आयुष्यच उद्धस्त झालं होतं. हे सहन करणं त्याला शक्य होत नव्हतं. मात्र त्यानंतर दीपिकाची भेट एकदा जिममध्ये झाली आणि दिनेशचं आयुष्य बदललं. प्रेम पुन्हा आयुष्यात बहरू शकतं याची जाणीव दिनेशला झाली. पहिल्या भेटीत मात्र दीपिकाने त्याला भावही दिला नव्हता असं एका मुलाखतीत दिनेशने सांगितलं.

हेही वाचा :  आयुर्वेदातील हे 3 उपाय साफ करतात नाकातील घाण व बॅक्टेरिया, घोरण्याची समस्याही होते छुमंतर

नात्यात साथ महत्त्वाची

कोणत्याही नात्यात साथ ही महत्त्वाची ठरते. हीच साथ त्रासातून बाहेर येत असताना आणि नात्यात धोका मिळालेल्या दिनेशला दीपिकाकडून मिळाली. काही दिवसातच दोघे चांगले मित्र झाले. एकदा दिनेशने तिला भेटायला सांगितले असता तिने आपली कॅनडामध्ये टूर्नामेंट असल्याचे सांगितले. तर इंग्लंडला ट्रेनिंगसाठी गेले असताना दिनेश तिच्यामागून तिला भेटायला आल्याने तिला आश्चर्याचा धक्का बसला होता. त्याचवेळी दीपिका दिनेशच्या प्रेमात पडली. त्यानंतर अनेक वेळा दिनेशच्या क्रिकेट मॅचेसना तिने हजेरी लावली होती. त्याच्या आयुष्यातील सर्वात खडतर वळणावर दीपिकाने त्याला साथ दिली आणि म्हणूनच दोघांमधील नाते अधिक घट्ट होत गेले. कोणत्याही नात्यात समोरची व्यक्ती आपल्याला साथ देऊ शकते याचा विश्वास मनात ठामपणे असला की पुढे जायला काहीच हरकत नाही आणि हेच दोघांच्या बाबतीतही घडले.

(वाचा – क्षिती-हेमंतच्या लग्नाला झाली १० वर्ष, लग्नाचे नाते कसे राहते टिकून)

साखरपुडा ते लग्न

कार्तिकने दीपिकाला लग्नाची मागणी घातली. पण दीपिकाने काही काळ मागून घेतला होता. कारण दीपिका ख्रिश्चन होती तर दिनेश हिंदू. हे नातं खूपच लवकर पुढे गेले होते पण ते चांगल्यासाठीच होते असं दीपिकाने सांगितलं होतं. दोघांच्या कुटुंबाकडूनही हे नातं स्वीकारायला वेळ लागला होता. दीपिका आणि दिनेशने २०१५ मध्ये लग्न करायचे ठरवले. हिंदू आणि ख्रिश्चन दोन्ही पद्धतीने त्यांनी लग्न केले. दिनेश आणि दीपिका लग्नानंतर अत्यंत आनंदी असून दोघांना जुळी मुलं आहेत.

हेही वाचा :  Toxic Relationships संपवण्यासाठी लोक 4 वर्षे वाट पाहतात, संशोधनातून समोर आलेले सत्य वाचून तुमचाही थरकाप उडेल

(वाचा – या एका कारणामुळे IAS टीना दाबीने आपल्यापेक्षा १३ वर्षांनी मोठ्या असलेल्या प्रदीप गावंडेशी केले लग्न)

नातं तुटल्यावर नकारात्मक विचार करू नये

दिनेश आणि दीपिकाच्या नात्यावरून हेच सिद्ध होतं की, एक नातं तुटलं तर संपूर्ण आयुष्य उद्वस्त होत नाही. आपण सकारात्मक विचार केला तर सगळं सकारात्मक होतं. नात्यात धोका ही आयुष्यातील एक फेज असते. पण त्यातून आपणच आपल्याला सावरायचं असतं. प्रेम जगात संपलं आहे अथवा आपल्यासाठी प्रेम नाहीच अशी टोकाची भूमिका न घेता योग्य व्यक्तीची निवड करून पुन्हा एकदा जगायला तयार होणं हेच आयुष्य आहे. नातं तुटलं म्हणजे सर्व काही संपलं असा विचार कधीही करू नये. तर यातूनही बाहेर येऊन तुम्ही स्वतःसाठी जगणं अत्यंत गरजेचे आहे.

(फोटो क्रेडिटः Instagram)

(वाचा – नात्यात भावनेवर नसेल राहात नियंत्रण, तर घ्या या सोप्या टिप्सचा आधार)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर …

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जयेश जगड, झी मीडिया, अकोला (Akola News in Marathi) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात …