जोडीदाराचा मूड ठेवायचा असेल कायम रोमँटिक तर ही जुनी गाणी तुमच्या लिस्टमध्ये हवीतच

नवरा आणि बायकोचे नाते अधिक काळ टिकवायचे असेल तर त्यात रोमँटिकपणा असायलाच हवा. गर्लफ्रेंड – बॉयफ्रेंड असो वा नवरा – बायको रोमँटिकपणा हा हिंदी गाण्यांसह जोडला गेलाच आहे. पूर्वपरंपरागत हिंदी गाण्यांमधील भावना या रोमँटिकपणाशी जोडल्या गेल्या आहेत.

७०-८० च्या दशकातील अशी काही रोमँटिक गाणी आहेत, जी जोडीदाराचा मूड चांगला बनविण्यासाठी तुमच्या लिस्टमध्ये असायलाच हवीत. मोहम्मद रफी, किशोर कुमार, लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या आवाजातील गाणी नात्यात एक वेगळेच वातावरण निर्माण करतात हे कोणीच नाकारू शकत नाही. कोणती आहे ती गाणी जाणून घ्या. (फोटो सौजन्य – Freepik.com)

एकमेकांवरील राग काढण्यासाठी – बाहों मे चले

एकमेकांवरील राग काढण्यासाठी - बाहों मे चले

एव्हरग्रीन असणारे गाणे म्हणजे बाहों में चले आओ. राग, रूसवा-फुगवा घालविण्यासाठी हे गाणं उत्तम आहे. या गाण्यात रोमँटिकपणा ठासून भरलाय असं म्हटलं तर नक्कीच अतिशयोक्ती ठरणार नाही. आपल्या जोडीदाराचा मूड चांगला करण्यासाठी हे गाणं उत्तम आहे.

हेही वाचा :  मेरा वाला अलग है असं म्हणू नकोस ताई, सावध हो!

प्रेम व्यक्त करण्यासाठी – आपकी नजरों ने

प्रेम व्यक्त करण्यासाठी - आपकी नजरों ने

नात्यात प्रेम नुसतं असून चालत नाही तर ते व्यक्तही करावं लागतं. तुम्हाला शब्द सापडत नसतील तर धर्मेंद्र आणि माला सिन्हावर चित्रित झालेले हे गाणे म्हणजे प्रेम व्यक्त करण्यासाठी बेस्ट पर्याय. शब्द, सूर आणि भावना या तिन्हीचे योग्य मिश्रण मूड फ्रेश करण्यास उपयोगी ठरते.

मस्तीचे वातावरण – नहीं नहीं अभी नहीं

मस्तीचे वातावरण - नहीं नहीं अभी नहीं

जया बच्चन आणि रणधीर कपूरवर चित्रीत करण्यात आलेले हे रोमँटिक गाणे म्हणजे एखाद्याचा वाईट मूड चांगले करण्यासाठी मदत करते. आपल्या जोडीदाराचा मूड अधिक चांगला करायचा असेल तर या रोमँटिक गाण्याचा नक्की वापर करून घ्या.

(वाचा – आणि अखेर अनिल कपूरचा बांध फुटला…लॉरेनचा हार्डी हरवला, मैत्रीचा आदर्श सतीश, अनिल आणि अनुपम )

पावसाळ्यातील मूड – भिगी भिगी रातों में

पावसाळ्यातील मूड - भिगी भिगी रातों में

धकाधकीच्या जीवनात फार कमी आणि चांगले क्षण जोडीदारांना मिळत असतात. त्यातही पाऊस आणि भिगी भिगी रातों में गाणं असेल तर चारचाँद. या गाण्याचे बोल, संगीतच वातावरणात रोमँटिकपणा जागृत करण्यास प्रवृत्त करणारे आहेत. त्यामुळे ८० च्या दशकातील हे गाणं तर लिस्टमध्ये हवंच.

हेही वाचा :  कठोर कारवाई केवळ कागदावरच! अकोल्यात नायलॉन मांजानं चिमुकल्याचा चिरला गळा

(वाचा – आई म्हणून अनुष्काने…विराटच्या डोळ्यात आले पाणी, म्हणाला ती माझी प्रेरणा आहे)

जोडीदाराची प्रशंसा – ओ मेरे दिल के चैन

जोडीदाराची प्रशंसा - ओ मेरे दिल के चैन

आपल्या जोडीदाराची प्रशंसा करायला शब्द सापडत नसतील आणि मूडही चांगला करायचा असेल तर ओ मेरे दिल के चैन या गाण्याची नक्कीच आठवण यायला हवी. नुसतं गाणं ऐकूनच मूड बदलू शकतो. तुमच्या जोडीदाराला जुनी गाणी आवडत असतील तर या रोमँटिक गाण्याचा नक्की वापर करा.

(वाचा – हिंदू-मुस्लीम विभिन्न धर्म पण खऱ्या अर्थाने जिंकलं प्रेम, मिनी माथुर – कबीर खानच्या लग्नाला झाली २५ वर्ष)

मूड बनविण्यासाठी – चुरा लिया है तुमने

मूड बनविण्यासाठी - चुरा लिया है तुमने

आपल्या जोडीदाराचा मूड चांगला होण्याचा प्रयत्न करत असाल, विशेषतः पत्नीचा, गर्लफ्रेंडचा तर यापेक्षा अधिक रोमँटिक गाणं काय असू शकतं? जोडीदाराची प्रशंसा, आपलेपणा सांगण्यासाठी यापेक्षा चांगलं गाणं मिळूच शकत नाही. त्यामुळे मूड चांगला होण्यासाठी या रोमँटिक गाण्याची मदत घ्या.

मनातल्या भावना करा व्यक्त – दिल क्या करे

मनातल्या भावना करा व्यक्त - दिल क्या करे

कधी कधी जोडीदाराकडे मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्द मिळत नाहीत. मग अशावेळी गाण्यांचा उपयोगी करून घेता येतो. दिल क्या करे या गाण्याचे बोल आणि भावना यासाठी तुम्हाला उपयोगी ठरतील.

हेही वाचा :  बॉलिवूडमध्ये झळकण्याची जिद्द ठरली जीवघेणी; मुंबईतील तरुणीसोबत घडला अमानुष प्रकार

एकत्र वेळ घालवताना – बडे अच्छे लगते है

एकत्र वेळ घालवताना - बडे अच्छे लगते है

सचिन पिळगावरचं हे सुप्रसिद्ध जुनं गाणं आजही तितकंच एव्हरग्रीन आहे. एकत्र वेळ घालवताना आपल्या जोडीदारासह गुणगुणावं असं हे गाणं अनेकांच्या आवडीचं आहे. खराब मूड चांगला करण्यासाठी नक्कीच हे गाणं लिस्टमध्ये असायला हवं.
आपल्या जोडीदाराचा स्वभाव आणि गोष्टी लक्षात घेता तुम्ही गाणी ठरवू शकता. पण ही अशी गाणी आहेत, जी कोणत्याही पिढीसाठी रोमँटिक मूड होण्यासाठी उपयोगी ठरतील.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता

ECI Lists Out 12 Identity Proofs : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील …

लहानपणी शाळेत खाल्लेला रट्टा लागला जिव्हारी, अभिनेत्याने शाळा विकत घेत फिरवला बुलडोझर

Trending news in Marathi : आई वडील असो किंवा शिक्षक मुलांना चांगली सवय आणि शिस्त …