या 5 महिलांनी पैशासाठी जे केलं ती कहाणी ऐकून तुम्हालाही फुटेल घाम

सगळे जण नेहमी म्हणतात की जर प्रेम असेल तर संसार सहज टिकू शकतो. प्रेमापुढे सारं काही शुन्य आहे. पण खरंच असं असतं का? कित्येक जोडपी गरीबीत संसार सुरु करतात पण ती गरिबी संपलीच नाही तर? किती दिवस पैश्याशिवाय राहणार? असे कित्येक संसार असतात जे एका मर्यादेपर्यंत सहन करू शकतात पण त्यानंतर मात्र त्यांना जाणीव होते की जगायचं असेल तर पैसा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. पण इथे लक्षात घेण्याजोगा मुद्दा असा आहे की प्रेमाऐवजी पैसा निवडणाऱ्या लोकांना बेईमान म्हणणे चुकीचे ठरेल. कारण तो मार्ग त्यांच्यासाठी अजिबात सोपा नसतो.

त्यांना अशा माणसाबरोबर राहण्यास भाग पाडले जाते ज्यावर त्या कधीही प्रेम करू शकत नाही. एका आकडेवारीनुसार हे दिसून आले आहे की संसारात पैश्याच्या कमतरतेमुळे आणि सतत अॅडजस्ट करावं लागत असल्याने स्त्रिया कंटाळतात आणि शेवटी आपल्या आयुष्याचा विचार करून वेगळा निर्णय घेतात. अशाच काही स्त्रियांचे अनुभव आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यांनी याच गोष्टीमुळे आयुष्याचा वेगळा निर्णय घेतला.

पैश्यासाठी प्रेमाचा त्याग केला

जो व्यक्ती आपल्या कुटुंबाचे पोट भरू शकत नाही तो माझ्या इच्छा काय पूर्ण करणार? हाच विचार माझ्या मनात सतत यायचा. एकीकडे माझे मन म्हणत होते कि तो खूप चांगला व्यक्ती आहे. आयुष्यभर मला सांभाळेल. पण मला याची सतत चिंता होती कि मी किती खुश राहू शकेन? पैसाच नाही तर माझ्या इच्छा काय पूर्ण होणार? म्हणून मी शेवटी माझ्या मनाविरुद्ध जाऊन एका श्रीमंत व्यक्तीशी लग्न केलं. मला तेव्हा खूप विअत वाटलं होतं. तो सुद्धा पुरता कोलमडला होता. पण आज मागे वळून पाहताना मला मी घेत्लाला निर्णय योग्य वाटतो. पण इथे लक्षात घेण्याजोगा मुद्दा असा आहे की प्रेमाऐवजी पैसा निवडणाऱ्या लोकांना बेईमान म्हणणे चुकीचे ठरेल. कारण तो मार्ग त्यांच्यासाठी अजिबात सोपा नसतो. त्यांना अशा माणसाबरोबर राहण्यास भाग पाडले जाते ज्यावर त्या कधीही प्रेम करू शकत नाही.

हेही वाचा :  गुड न्यूज! दिल्लीच्या धर्तीवर मुंबईत लवकरच सुरू होणार अंडरग्राउंड मार्केट

(वाचा :- काश..! गर्भश्रीमंत घराण्याची सून होण्याआधी मला या गोष्टी माहित असत्या, तर माझ्यासोबत जे घडलं ते कधीच झालं नसतं)

मी लग्नच केलं नसतं

खरं सांगायचं तर मी कधीच लग्न करणार नव्हती. कारण माझा लग्नावर विश्वास नव्हता. मात्र जे स्थळ मला आले ते एवढे श्रीमंत होते की मी माझ्याच विचाराविरुद्ध जाऊन लग्नाचा निर्णय घेतला. तो दिसायला अजिबात सुंदर नाही. अनेकांनी तेव्हा मला याच्याशी लग्न का करते असा प्रश्न केला. पण मी मात्र ठरवले होते कि याच्याकडे पैसा आहे आणि माझे भविष्य सुखी आहे. आता लाग्नःच्या इतक्या वर्षानंतर मी खरंच माझ्या पतीसोबत खूप खुश आहे.

(वाचा :- मला जडल्यात काही विचित्र सवयी, जर त्या मी आई-वडिलांसमोर कबूल केल्यात तर मला मुलगी म्हणायलाही त्यांना वाटेल लाज)

पैश्यासाठी केले लग्न

माझे माझ्या पाटीवर अजिबात प्रेम नाही., लग्नावेळी मी विचार केला होता कि मला पुढे जाऊन त्यांच्याविषयी प्रेम निर्माण होईलं. पण असे काहीच झाले नाही. आज केवळ त्यांच्याकडे पैसा आहे आणि तो श्रीमंत आहे म्हणून मी त्याच्या सोबत आहे. तो मला कसलीच कमतरता भासू देत नाही. जे हवं ते मी खरेदी करू शकते. ऐशोआरामात राहते. एखाद्या मुलीला जसं आयुष्य हवं असतं तसचं आयुष्य मला मिळालं आहे आणि त्याबाबत मी खूप खुश आहे.

हेही वाचा :  स्मार्टफोन चोरीला गेल्यास त्वरित करा 'ही' २ कामे, अन्यथा तुमचे बँक खाते होईल रिकामे

(वाचा :- माझी कहाणी : लग्नानंतर 7 महिन्यांतच बायकोने माझं जीवन मुश्किल करून ठेवलंय, कळतच नाहीये मी असं काय पाप केलंय..?)

पैश्यांसाठी दुसरे लग्न

मी प्रेमविवाह केला, मला वाटले कि पैसा नाही पण प्रेम आमचे नाते टिकवेल, आम्ही आयुष्यभर सोबत राहू. पण काहीच काळात मला कळून चुकले कि ह्या सगळ्या पुस्तकी गोष्टी आहेत. खऱ्या आयुष्यात असे काही होत नाही. आमचा संसार अधिक भयानक होत चालला होता. आर्थिक स्थिती काही सुधारत नव्हती. आमची भांडणे वाढत चालली. शेवटी कंटाळून मी दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडले जो खूप जास्त श्रीमंत होता. त्याला माझी स्थिती माहित होती. त्याला माझी गरज होती आणि मला त्याची! शेवटी मी त्याच्याशी लग्न केले आणि आता आमचा संसार सुखाचा आहे.

(वाचा :- पैशांसाठी मी अशा माणसाशी लग्न केलं ज्यावर माझं काडीमात्रही प्रेम नव्हतं, पुढे त्याने जे केलं ते ठरलं अनपेक्षितच)

पैसे आहेत पण प्रेम नाही

मी कहाण वयातच एका श्रीमंत माणसाच्या प्रेमात पडून लग्न केले. आमच्या घरची स्थिती नीट नव्हती. लग्नानंतर माझ्या पतीने माझ्या घरच्यांची जबाबदारी देखील स्वीकारली. आम्हाला कसलीच कमतरता भासू दिली नाही. मी सुद्धा राणी सारखी राहत होते. पण मी कबुलं करते की माझे त्याच्यावर प्रेम नाही आणि कुठेतरी त्याचेही प्रेम आता कमी झाल्याचे मला जाणवू लागले हे. आमच्या संसारात पैसे खूप आहेत पण प्रेम नाही!

हेही वाचा :  तरुणांची / पुरुषांची कोणती गोष्ट महिलांना सर्वात जास्त आकर्षित करते?

(वाचा :- वयाने मोठ्या पुरूषाच्या प्रेमात पागल असतात मुली, 5 महिलांनी सांगितले मोठ्या पुरूषांच्या प्रेमात का घायाळ असते मन)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; ‘या’ भागात पडणार पाऊस

Maharashtra Weather Forecast Today : एप्रिल महिन्यापासून राज्यातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतही …

बारामतीच्या रणधुमाळी! प्रचारासाठी उतरल्या पॉवरफुल ‘पवार लेडीज’

Lok Sabha Election 2024 : अखेर प्रतिभा पवार या देखील बारामतीच्या रणमैदानात उतरल्यात. आतापर्यंत कधीही …