मी बायकोची फसवणुक करतोय, एकाच घरात राहून बायकोच्या मोठ्या बहिणीसोबत मी असं काही केलं की

प्रश्न : मी एक विवाहित पुरुष आहे आणि माझे माझ्या पत्नीवर खूप जास्त प्रेम आहे. एक जोडीदार म्हणून ती मला लाभली यासाठी मी खरंच स्वत:ला भाग्यवान समजतो. पण असे असूनही माझे मन अजून एका स्त्रीकडे आकर्षित होते आहे. असे का होते आहे हे मला देखीलं माहित नाही. माझ्या पत्नीला धोका देण्याचा माझा अजिबात विचार नाही. पण त्या दुसऱ्या स्त्रीप्रती विचार देखील मला थांबवता येत नाहीये.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून तिचीच मोठी बहिण आहे आणि ही गोष्ट लाजिरवाणी आहे हे मला सुद्धा माहित आहे. पण म्हणतात ना मला कोण रोखू शकते? असेच काहीसे माझ्या बाबतीत होते आहे. मी काय करू. मला समजत नाहीये मी काय करणं योग्य असेल? खरे सांगायचे तर मला दोघांमधील कोणतेही नाते खराब करायचे नाही पण माझं मन अस्थिर झालं आहे. (गोपनीयतेच्या कारणामुळे आम्ही व्यक्तीची ओळख उघड करत नाही.)

ती परफेक्ट आहे

माझ्या पत्नीची मोठी बहिण दिसायला खूप जास्त सुंदर आहे. जेव्हा ती नटते तेव्हा तिच्यासमोर भल्या भल्या अभिनेत्री सुद्धा फिक्या पडतात. याशिवाय तिच्यात खूप जास्त आत्मविश्वास हे. तिचे बोलणे, चालणे सगळेच खूप जबरदस्त असून जो कोणी तिच्याशी संवाद साधतो तो तिच्या प्रेमात पडू शकतो. माझ्या बाबतीत देखील असेच काहीसे झाले आहे. मी स्वत:ला सावरण्याचा खूप प्रयत्न करतो आहे. पण काही केल्या तिचा विचार मनातून जातच नाही.

हेही वाचा :  राज्यात उन्हाचा तडाखा वाढणार, देशावर पावसाळी वारे घोंगावणार; पाहा हवामानाचा अंदाज

(वाचा :- माझी कहाणी : लग्न करून मी उद्धवस्त झालीये, नव-याची वागणुक अशीच राहिली तर मी लवकरच पागल होईन, कशी सुटका मिळवू?)

मला मान्य आहे हे चूक आहे

मला कळते आहे की मी जे काही करतोय वा जो काही विचार करतोय तो चुकीचा आहे आणि जसे मी आधी सांगितले त्याप्रमाणे माझे माझ्या पत्नीवर खूप जास्त प्रेम आहे. मी तिच्या शिवाय माझ्या आयुष्याचा विचार देखील करू शकत नाही. पण कुठेतरी माझ्या मनात सतट तिच्या बहिणीचा विचार येतो आणि हीच गोष्ट मला सतत खात असते. यावर काय करावे हे मला कळतच नाही आहे. मी खूप गोंधळलेला आहे. कृपया मला मार्गदर्शन करा.

(वाचा :- माझी कहाणी: गेल्या 5 वर्षापासून मी आई बनू शकली नाही, नव-याला जडलाय विचित्र छंद, कारण ऐकून पायाखालची जमिन सरकेल)

जाणकारांचे उत्तर

ओंटोलॉजिस्ट आणि रिलेशनशिप एक्सपर्ट आशमीन मुंजाल म्हणतात की, “आपले लग्न झालेले असतानाही अन्य कोणत्याही स्त्री कडे आकर्षित होणे वा प्रेमात पडणे ही खरंच गंभीर स्थिती आहे. या एका गोष्टीमुळे तुमचा संसार उद्ध्वस्त होऊ शकतो. तुमच्या स्थितीत तुम्ही सर्वात आधी हे समजून घ्या की तुम्हाला जी महिला आवडत आहे ती तुमच्या पत्नीची बहिण आहे. एवढेच नाही तर मी तुम्हाला हे सुद्धा सांगू इच्छिते की आयुष्यात असे अनेक इम्प्रेस करणारे लोक भेटतात पण याचा अर्थ हा नाही की तुम्ही त्यांच्या प्रेमात पडावं.”

हेही वाचा :  माझी कहाणी : मला बाळ हवंय, पण नवऱ्याची ती विचित्र सवय मला छळतेय, मी काय करु

(वाचा :- Real Stories : माझ्याइतकी वाईट पत्नी कोणीच नसेल.. मीच माझ्या नव-याला धोका द्यायाला पाडलं भाग.. कारण..!!)

तुमची पत्नी वाईट नाही

त्या पुढे सांगतात की, “तुमच्या पत्नीची बहिण खूप जास्त सुंदर, आकर्षक आणि बुद्धिमान असली तरी याचा अर्थ असा नाही की यामुळे तुमची पत्नी कमी ठरते. मुळात तुम्ही हा विचार करूनच चाललं पाहिजे की जगातील कोणत्याही स्त्री पेक्षा तुमची पत्नीच बेस्ट आहे. ती सर्वोत्तम आहे, तिच्यापेक्षा चांगलं कोणी नाही हा विचार जेव्हा तुम्ही मनात ठसवाल तेव्हाच तुम्ही इतर स्त्रियांच्या विचारांतून मुक्त व्हाल. जेव्हा असा विचार मनात असतो तेव्हा तो अन्य स्त्रियांमध्ये अडकण्यापासून रोखतो.”

(वाचा :- माझी कहाणी : नव-याने अक्षरश: भंडावून सोडलंय, भावासोबत बोलणंही गुन्हा वाटू लागलंय, कसा वाचवू या प्रकारातून जीव?)

नाते खराब होऊ देऊ नका

त्या शेवटी सल्ला देतात की, “तुम्ही सांगत आहात की तुमच्या मनातून त्या स्त्रीचे विचार जात नाही आहेत. पण तुम्ही हे शारीरिक आकर्षण समजून लवकरात लवकर हे विचार मनातून काढून टाकले पाहिजेत. कारण जर हे विचार असेच राहिले तर यामुळे तुमचे संपूर्ण नाते खराब होऊ शकते. जर याबाबत तुमच्या पत्नीला वा तिच्या बहिणीला जरी माहित पडले तरी तुम्हीच चुकीचे ठरवले जाल आणि असे व्हायला नको असेल तर वेळीच यातून बाहेर पडा आणि आपल्या पत्नीसोबत सुखाने संसार करा.

हेही वाचा :  सोन्याने भरलेला ग्रह, किंमत 700,000,000,000,000,000,000! सर्व सोनं पृथ्वीवर आणणार कसं?

(वाचा :- माझी कहाणी: होणारा नवरा व माझी रोज टोकाची भांडणं होतात, फक्त ‘या’ एका गोष्टीसाठी आम्ही एकत्र आहोत, ऐकून हादराल)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Gold Rate: दरवाढ सुरुच…9 वर्षापूर्वी 24,000 रुपयांना मिळणारं सोनं आता 72,000 रुपये, काय आहे आजचे दर?

Gold Price Today In Marathi: सोनं आणि चांदीच्या दरात दररोज बदल होत असतात. गेल्या काही …

फडणवीसांच्या ‘पवार सतत कोलांटी उड्या घेतात’ टीकेवर पवार म्हणाले, ‘त्यांना पराभवाची..’

Sharad Pawar Slams Modi Fadnavis: राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी …