काश..! लग्नाआधी मला ‘या’ 5 गोष्टी माहित असत्या तर बरं झालं असतं

लग्न ही अशी गोष्ट आहे जी दोन घरांना जोडते. दोन्ही घरातील लोक लग्नामुळे खुश असतात. खूप जास्त एन्जॉय करत असतात. पण खरं एन्जॉय तर नवरा-नवरीने करायला हवं, हो ना? पण तसं तर काहीच दिसत नाही. फार कमी जोडपी असतात ज्यांना लग्नावेळी कसलंच टेन्शन नसतं. पण बहुतांश जोडपी अशी असतात ज्यांच्या चेहऱ्यावरील हसण्यामागे खूप टेन्शन दडलेलं असतं. मुलींना आपण नवरीन घरात जातो आहे’ तर तिथे आयुष्य कसं असले याचं टेन्शन असतं आणि मुलांना आर्थिक बाबी सांभाळून संसार पुढे कसा न्यायचा याचं टेन्शन असतं.

बोलून कोणी दाखवत नाही पण या गोष्टी मनात सतत सुरू असतात. नवरा-नवरीला अजिबात माहित नसतं की हे नातं आणि हा संसार यशस्वी करून दाखवण्यासाठी त्यांना किती गोष्टी कराव्या लागणार आहेत. माझ्या सोबत सुद्धा असेच काहीसे झाले. लग्नानंतर मला उमगले की वास्तवात नाते टिकवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते. (गोपनीयतेच्या कारणामुळे आम्ही व्यक्तीचे नाव उघड करत नाही.)

फॅमिली प्रेशर

आपल्या समाजात विनाकारण फॅमिली प्रेशर देते. लग्न होऊन एक वर्ष सुद्धाझालेलं नसतं आणि घरचे मूल होण्याचा निर्णय घ्या म्हणून तगादा लावायला सुरुवात करतात. त्यांना याची सुद्धा चिंता नसते की ज्या मुलाशी आपण आपल्या मुलीचं लग्न लावून दिलंय ती खुश तरी आहे का? वर्ष झालं तरी ती ऍडजस्ट करू शकली आहे का? पण याचा विचार कोणीच करत नाही. फक्त अपेक्षा सांगून ओझं वाढवत जातात. हीच गोष्ट मला खटकते आणि लग्नानंतर हीच गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली. मी जेव्हा या फेज मधून गेली तेव्हा मी माझ्या पतीशी चर्चा केली.

हेही वाचा :  Sharad Pawar : 'मागील 15 दिवसांत अचानक...', बिहारच्या सत्तांतरावर शरद पवार यांचं सूचक वक्तव्य, म्हणतात...

(वाचा :- नवरा श्रीमंत नसता तर चुकूनही लग्न केलं नसतं’ या 5 महिलांनी पैशासाठी जे केलं ती कहाणी ऐकून तुम्हालाही फुटेल घाम)

इतरांशी तुलना करू नये

कधीच आपल्या नात्याची इतरांशी तुलना करू नका. ते कसे राहतात, ते कसे जगतात, त्याने तिला काय दिलं, तिने त्याला काय दिलं. या सगळ्या गोष्टींचा जेवढा कमी विचार करत तेवढा उत्तम आहे! जरी विचार करत असाल तरी तुलना करण्याची चूक अजिबात करू नका. कारण जेव्हा तुम्हाला तुमच्या नात्यात कमतरता दिसू लागते तेव्हा इतर बाहेरचे लोक तुमचे कान भरू लागतात आणि तुम्ही सुद्धा त्या गोष्टी ऐकून निर्णय घेता. मी सुद्धा ही चुकी केली पण माझ्या पतीने वेळीच मला ती लक्षात आणून दिली.

(वाचा :- काश..! गर्भश्रीमंत घराण्याची सून होण्याआधी मला या गोष्टी माहित असत्या, तर माझ्यासोबत जे घडलं ते कधीच झालं नसतं)

भांडणे होणे चुकीचे नाही

जेव्हा कधी कपल्स मध्ये भांडणे होतात तेव्हा त्यांच्या मनात पहिला प्रश्न येतो की मी हे लग्न उगाच केले का? माझा निर्णय चुकला का? क्षुल्लक कारणावरून कधीच हा विचार करून स्वतःला त्रास देऊ नये आणि आपल्या जोडीदाराला सुद्धा त्रास होईल असे वागू नये. ते म्हणतात ना की संसारात भांड्याला भांडे लागतेच, त्याचप्रमाणे संसारात भांडणे होणे ही खूप साधी गोष्ट आहे त्याचा खूप विचार करू नये. जर होणारी भांडणे मारझोड पर्यंत जात असतील वा सतत नकारात्मक टोन वर संपत असतील तर विचार करणे गरजेचे आहे.

हेही वाचा :  कोरोनाबाबत अतिशय महत्त्वाची बातमी, जगाची 10 टक्के लोकसंख्या Coronavirus च्या विळख्यात ?

(वाचा :- मला जडल्यात काही विचित्र सवयी, जर त्या मी आई-वडिलांसमोर कबूल केल्यात तर मला मुलगी म्हणायलाही त्यांना वाटेल लाज)

स्वतःला हरवू नका

याचा अर्थ असा की तुमचे एक स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व आहे ते कधीच विसरु नका. तुमचे लग्न झाले याचा अर्थ असा नाही को जोडीदार सांगेल तसेच वागावे. तुमची सुद्धा काही मते आहेत, विचार आहेत आणि त्याच्याशी तुम्ही बांधील राहायला हवे. लग्नानंतर अनेक मुली आपले करियर विसरून जातात. फक्त संसाराकडे लक्ष देतात. मी देखील याच मार्गावर होती पण मी स्वतःला भाग्यवान समजते की मला खूप समजूतदार पती मिळाला आहे आणि त्यानेच मला योग्य मार्गावर आणले.

(वाचा :- माझी कहाणी : लग्नानंतर 7 महिन्यांतच बायकोने माझं जीवन मुश्किल करून ठेवलंय, कळतच नाहीये मी असं काय पाप केलंय..?)

अतिविचार करू नका

जेव्हा आपण नव्या घरात जातो वा नव्या दुनियेत राहायला जातो तेव्हा साहजिकच खूप विचार डोक्यात येतात. अनेक विचार हे अति असतात आणि नकारात्मक असतात. यामुळे सगळं खराब होऊ शकतं. ते होऊ नये म्हणून नको त्या विचारांना दूर करा आणि हसत खेळत संसार करा. संसार कठीण जरी वाटत असला तरी हसणे विसरु नका. कारण परिस्थिती कधीच एकसारखी राहत नाही. ती बदलत जाते. याच काही गोष्टी आहेत ज्या लग्नानंतर मला कळल्या आणि यांचा तुम्हाला सुद्धा नक्की उपयोग होऊ शकतो.

हेही वाचा :  Teddy Day 2023: मुलींना आवडतात ‘या’ रंगांचे टेडी, नातं टिकवण्यासाठी रंगाचे महत्त्व जाणून घ्या

(वाचा :- पैशांसाठी मी अशा माणसाशी लग्न केलं ज्यावर माझं काडीमात्रही प्रेम नव्हतं, पुढे त्याने जे केलं ते ठरलं अनपेक्षितच)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महारेराचा बिल्डर लॉबीला दणका; पार्किंचा वाद टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

MAHARERA: बिल्डिंगमध्ये अपुऱ्या जागेच्या अभावी पार्किंग करण्यास अडचणी येतात. हल्ली काही बिल्डर घर खरेदी केल्यानंतरच …

Viral Video : बॉसच्या जाचाला कंटाळून नोकरी सोडणाऱ्या तरुणाकडून शेवटच्या दिवशी ढोलताशे वाजवत कंपनीला निरोप

Pune Job News : सरकारी नोकरीवर (Government Jobs) असणाऱ्या अनेकांचाच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना हेवा …