त्या रात्री रडून मला श्वास घेणं ही कठीण झालं होतं, दुसऱ्या मुलीसाठी त्याने मला सोडलं

प्रश्न: माझ्या प्रियकराने एकदा दुसऱ्या मुलीसोबत माझी फसवणूक केली आणि मी त्याला माफ केले असले तरी मला आतून अस्वस्थ वाटते. ही गोष्ट मला ज्या दिवशी कळाली त्या रात्री रडून मला श्वास घेणं ही कठीण झालं होतं. त्या मुलाने प्रेमात असताना घेतलेल्या आणाभाका सर्वकाही खोटं होतं. या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नव्हता. पण एवढं झाल्यानंतर तो शांत बसला नाही त्याने प्रत्येक मार्गाने माझ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला.या सर्वांचा माझ्या घरातल्या सदस्यांना देखील त्रास होत आहे. पण माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे. त्याला मी विसरु शकत नाही. एवढं सर्व झाल्यानंतर ही मला त्याच्या सोबत संबंध तोडणं कठीण जात आहे. मला खरंच कळत नाही आहे मी काय करु ? (गोपनीयतेच्या कारणामुळे आम्ही व्यक्तीची ओळख उघड करत नाही.) फोटो सौजन्य : @pexels

तज्ञांचे मत

या समस्येवर ऑन्टोलॉजिस्ट आणि रिलेशनशिप एक्सपर्ट आशमीन मुंजाल सांगतात की विश्वास हा काचेसारखा एकदा तुटला तर पुन्हा तसा विश्वास करणे खूप कठीण असते. कधी कधी लोकांना वाटतं की जसा वेळ जातो त्याप्रमाणे सर्व गोष्टी निट होतात पण तसे होत नाही. अशा वेळी अनेक प्रश्न आपल्या मनात घर करतात ”तो माझ्याशी असे कसे करू शकतो”, किंवा “माझ्यामध्ये काहीतरी चूक आहे का” किंवा ”हे लोक निष्ठावान नाहीत, कोणावरही विश्वास ठेवू नका” असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील तर तसे करु नका. एका व्यक्तीने विश्वासघात केला म्हणून स्वत:ला त्रास करुन घेऊ नका.

हेही वाचा :  कोंड्यापासून मिळू शकते कायमची सुटका; घरच्या घरी करा ‘हे’ पाच उपाय

(वाचा :- 14 वर्षांनी शरद केळकरने मान्य केले बायकोच देते खर्चाला पैसे,लव्हस्टोरी वाचून तुम्ही ही म्हणाल जोडी नंबर 1)

​नवीन संधी देताना हा विचार करा

जर तुम्ही त्यामुला एक संधी देण्याचा विचार करत असाल तर तो व्यक्तीत्या पात्रतेचा आहे का ? या गोष्टीचा विचार करा. कारण तुमच्या सोबत असे करताना त्या व्यक्तीने एकदा ही विचार केला नाही. त्याला क्षमा करण्याचा मार्ग तुम्ही निवडलात ही चांगली गोष्ट आहे. पण त्यांनी तुमच्या आयुष्यात पुन्हा स्थान द्यायचे की नाही या गोष्टीवर एकदा नक्की विचार करा.

(वाचा :- माझी कहाणी : मी ज्या मुलीवर प्रेम करतो तिचा पतीच माझा बॉयफ्रेंड आहे, हे खूप गुंतागुंतीचं आहे, मला कळत नाही मी काय करु?)

​चुका सर्वाकडून होतात

माणूस म्हटलं की चुका होणारच पण जर माणूस या चुकांमधून काही शिकत नसेल तर अशा व्यक्तीला आपल्या आयुष्यात ठेवणं अतिशय धोकादायक आहे. असे व्यक्ती तुम्हाला कधीच मनशांती मिळवून देणार नाही. त्यामुळे माफ करताना १०० वेळा विचार करा.

(वाचा :- Genelia D’Souza ने सासूबाईंना दिल्या मराठीमधून वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रत्येक सूनेने या गोष्टी शिकायला हव्याच)

हेही वाचा :  ट्विटरवर व्हायरल झाला Pick Me Girl चा ट्रेंड, संकल्पना ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

​भविष्याचा विचार करा

तुमच्या भविष्याचा विचार करा. हा व्यक्ती तुम्हाला आयुष्यभर सुखी ठेवू शकेल असं तुम्हाला वाटत असेत तर तुम्ही या व्यक्तीचा विचार करु शकता. कारण वर्तामानात घेतलेले निर्णय आपल्याला भविष्यात त्रास देऊ शकतात. त्यामुळे तुम्ही जो निर्णय घेणार आहात त्याचा विचार करा.

(वाचा :- माझी कहाणी : हनिमूनवरुन आल्यानंतर माझी पत्नी पूर्णपणे बदलली आहे, आता तर मला तिची भीतीच वाटते मी काय करु ?)

​तो व्यक्ती खरंच तुमच्यावर प्रेम करतो का ?

जो व्यक्ती तुम्हाला रडवू शकतो तो व्यक्ती खरंच तुमच्यावर प्रेम करतो का ? हा विचार करणं गरजेच आहे. प्रेमात समोरच्या व्यक्तीला जपले जाते. त्याच्या आवडी निवडीची काळजी घेतली जाते. तो व्यक्ती तुमच्या सोबत असे करेल का याची खात्री करुन घ्या.

(वाचा :- रितेश म्हणतो ‘बायकोला डोक्यावर बसवाल तरच नातं टिकतं’ त्यांच्या आंबट गोड नात्यातून या गोष्टी शिका)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का पुसण्यासाठी अजितदादांचा मास्टर प्लान

NCP Ajit Pawar On Baramati: बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का कायमस्वरूपी पुसण्यासाठी अजितदादांचा ॲक्शन प्लॅन तयार …

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …