Narendra Modi : पलक-मिथुन अडकले लग्नबंधनात; पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

Palak Muchhal- Mithun Wedding : बॉलिवूडचा लोकप्रिय संगीतकार मिथुन शर्मा (Mithun Sharma) आणि पार्श्वगायिका पलक मुच्छल (Palak Muchhal) नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. सोशल मीडियावर चाहत्यांसह सेलिब्रिटींनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक खास पत्र पाठवत नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी पाठवलेले पत्र पलकने सोशल मीडियावर शेअर केले आहे. जोडप्याला आशीर्वाद देत पंतप्रधानांनी लिहिलं आहे,”पलक आणि मिथुन नवीन प्रवासासाठी शुभेच्छा. दोघांचं एकमेकांवरचं प्रेम आणि आपुलकी दिवसेंदिवस वाढत जावो. कायम एकत्र राहत एकमेकांची स्वप्न साकार करण्यासाठी एकमेकांना मदत करा. आयुष्याच्या एका नवीन प्रवासाची सुरुवात करताना माझा आशीर्वाद आहेच. लग्नसोहळ्याला आमंत्रित केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद”.

पलक आणि मिथुनने पंतप्रधानांचे मानले आभार


पलक आणि मिथुनने पंतप्रधानांचे आभार मानत लिहिलं आहे,”आदरणीय मोदीजी, तुमचे आशीर्वादरुपी पत्र हृदयाला भिडणारं आहे. आम्हाला प्रेम आणि आशीर्वाद दिल्याबद्दल खूप खूप आभार. आम्हाला तुमचा आशीर्वाद मिळणं ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे”. 

हेही वाचा :  शुभमनला क्रिकेटच्या मैदानावर पाहताच चाहत्यांकडून साराच्या नावाच्या घोषणा

पलक आणि मिथुनच्या लग्नसोहळ्याला सेलिब्रिटींची हजेरी

पलक आणि मिथुनच्या लग्नसोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यात सोनू निगम, सलमान खान, जॅकी श्रॉफ, हिमेश रेशमिया आणि एआर रहमान या दिग्गज कलाकारांचा समावेश होता. लग्नानंतर पलकने सोशल मीडियावर लग्नसोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे,”आज आम्ही दोघे एक झालो आहोत”. त्यांचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. 

एकमेकांना बराच काळ डेट केल्यानंतर पलक आणि मिथुन लग्नबंधनात अडकले आहेत. मुंबईत पलक आणि मिथुन यांचा लग्नसोहळा पार पडला. लग्नानंतर त्यांनी ग्रँड वेडिंग रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. 

संबंधित बातम्या

Palak Muchhal- Mithun Sharma: गायिका पलक मुच्छलनं मिथुन शर्मासोबत बांधली लग्नगाठ; थाटात पार पडला विवाह सोहळा



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …