जलतरणपटू गीता मालुसरेवर जेलीफीशचा हल्ला

 पुणे:  स्विमींगमधलं (Swimming) आपलं उज्ज्वल करिअर वाचवण्याची धडपड करणाऱ्या एका राष्ट्रीय जलतरणपटूच्या चॅम्पियन बनण्याच्या स्वप्नांना ब्रेक लागला आहे. पुण्यातील (Pune News) 18 वर्षीय गीता मालुसरेला (Geeta Malusare)  एका स्पर्धेत पोहताना जेलीफीशचा दंश झाला आणि हात कढून टाकण्याची वेळ तिच्यावर आली. सध्या डॉक्टरांचे उपचार आणि आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर गीता पुन्हा एकदा पाण्यात पोहण्याचं स्वप्न पाहतेय.

राष्ट्रीय जलतरणपटू गीता महेश मालुसरे. गीताची जिद्द आणि इच्छाशक्ती तुम्हा आम्हाला अचंबित करणारी आहे. गेल्या दोन महिन्यात गीताच्या हातावर एक दोन नाही तर तबब्ल सात शस्त्रक्रिया झाल्या आहेत. सध्या जेलीफिशच्या चाव्यानंतर आपला हात वाचवण्यासाठी आणि पुन्हा पाण्यात सूर मारण्यासाठी गीता संघर्ष करतेय.

 डिसेंबर महिन्यात इस्त्राईलला होणाऱ्या स्पर्धेत गीताला भाग घ्यायचा होता.  सरावासाठी गीताने नोव्हेंबर महिन्यात रत्नागिरीतल्या  स्विमींग स्पर्धेत भागही घेतला. गीता या स्पर्धेत दुसरी आली. पण पोहताना पाण्यामध्ये जेलीफिशने तिच्या हाताचा चावा घेतला आणि हात वाचवण्यासाठी गीता गेले दोन महिने धडपडत आहे.  इतक्या कमी वयात एवढ्या मोठ्या संकटाला तोंड देणं आणि हिंमतीने सामोरं जाणं अतिशय अवघड आहे पण गीताने ते हसतमुखाने करत आहे. 

हेही वाचा :  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील गणेश अथर्वशीर्ष अभ्यासक्रमास प्राध्यापकांकडून विरोध

 गीता या संकटाने खचलेली नाही.  स्विमींगमधल्या करिअरचा तीचा निर्धार ढळलेलाही नाही आपल्या देशासाठी क्वीन ऑफ द ओशन पुरस्कार मिळवण्याचं स्वप्नं गीता मनाशी बाळगून आहे. गीताचा जलतरणाच्या प्रवासाला छोटासा ब्रेक लागलेला असला तरी ती हिंमत हरलेली नाही. जलपरीच्या या संघर्षात तीच्या आप्तस्वकीयांसोबत आपल्या सर्वांच्या पाठिंब्याचीही तिला गरज आहे. 

live reels News Reels

 डॉक्टरांच्या मते गीता भारतातली पहिलीच अशी केस आहे पण एवढी संकटं आली तरी गीताचा प्रवास असाच सुरू राहणार आहे. समुद्रात लांब पल्ले गाठण्यासाठी तिची झुंज अशीच सुरू राहील. एवढं होऊनही भारतासाठी खेळण्याचा तिचा निर्धार पक्का आहे. 

संबंधित बातम्या :

Success Story: वडील शेतकरी, आई गृहिणी… जळगावच्या ‘कलाकार’ पोरीची कमाल! चित्रांना परदेशातही मागणी, दिग्गजांकडून कौतुक

 

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …