जगातील सर्वात सुंदर हस्ताक्षर, आठवीतल्या मुलीचं कॉम्प्युटरपेक्षाही सुंदर अक्षर

World best handwriting: सुंदर हस्ताक्षर हाच खरा दागिना असतो असं म्हटलं जात. लहानपणी शाळेत असताना शिक्षक विद्यार्थ्यांकडे सुवाच्च अक्षर लिहिण्याचा आग्रह धरतात. आपलं हस्ताक्षर सुंदर व्हावं हा यामागचा उद्देश असतो. सुंदर  हस्ताक्षरामुळे परीक्षेत चांगले गुणही मिळतात. वक्तृत्व, अभिनय, इत्यादी कलेप्रमाणे सुंदर हस्ताक्षर (Handwriting) असणं हीसुद्धा एक महत्त्वाची कला आहे. मोत्यासारखे, वळणदार अक्षर असावं असं पूर्वी म्हटलं जात होतं. पण सध्याच्या डिजिटल युगात पाटी, पेन्सिल, पेनचा वापर कमी झाला आणि हस्ताक्षराचं महत्वही कमी झालं. पण या काळातही एका विद्यार्थिनीने आपल्या हस्ताक्षराने शाळेचंच नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. या विद्यार्थिनीच्या अक्षराला जगातील सुंदर हस्ताक्षराचा मान (World Best Handwriting) मिळाला आहे. 

जगातील सुंदर हस्ताक्षर
या मुलीचं नाव आहे प्राक्रीती  मल्ला (Prakriti Malla). प्राक्रीती नेपाळची  रहिवासी असून ती इयत्ता आठवीत शिकते.  प्राक्रीतीने लिहिलेला पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण जगाचं लक्ष तीने वेधलं.  प्राक्रीतीचं हस्ताक्षर पाहून लोकं आश्चर्यचकित झाली. सोशल मीडियावर तीचं कौतुक केलं जात आहे. 

हेही वाचा :  बिअर प्यायल्याने पोट वाढतंय?, 'हा' जालीम उपाय करा, होतील फायदेच फायदे

2022 मध्ये नेपाळमधल्या संयुक्त अरब अमीरातच्या राजदूतांनी प्राक्रीती मल्लासंदर्भात एक ट्विट केलं होतं. यात म्हटलं होतं, नेपाळची तरुणी प्राक्रीती मल्ला हिला संयुक्त अरब अमीरातच्या 51 व्या स्पिरिट ऑफ द यूनियनच्या निमित्ताने जगातील सुंदर हस्ताक्षर पुरस्कारासाठी गौरवण्यात येतंय असं ट्विटमध्ये सांगण्यात आलं होतं. 

प्राक्रीती मल्ला ही नेपाळच्या सैनिकी शाळेत शिकते.  तिच्या हस्ताक्षरासाठी नेपाळ सरकार आणि सेनेकडून प्रकृतीला पुरस्कारही देण्यात आला आहे. प्राक्रीती हिचं हस्ताक्षर कॉम्प्युटवर टाईप केलेल्या फॉन्टसारखं आहे. प्राक्रीतीचं हस्ताक्षर फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सअॅप अशा सर्व सोशल साईटवर व्हायरल झालं असून हस्ताक्षर पाहून लोकं तिचं कौतुक करत आहेत. 

प्राक्रीतीने सुंदर हस्ताक्षराचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. मोत्याच्या अक्षरांसारख्या सुंदर हस्ताक्षरासाठी प्राक्रीतीला देशात अनेक ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आहे. अनेक जणांनी तिच्या हस्ताक्षराची तुलना कॅलिग्राफीशी केली आहे. सुंदर हस्ताक्षरासाठी  प्राक्रीती दररोज दोन तास सराव करते असं तीने एका मुलाखतीत सांगितलं होतं. 

हेही वाचा :  Samruddhi Mahamarg : नावातच सगळं काही! समृद्धी महामार्गावरील 'या' टोलची का होतेय 'वायफळ' चर्चा?



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा; महाराष्ट्रातील 13, तर देशातील एकूण 49 जागांवर मतदान

Lokshabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यासाठी  आज (20 मे) मतदान होत …

Ebrahim Raisi : इराणच्‍या राष्ट्राध्यक्षाच्‍या हेलिकॉप्टरचा अपघात; पीएम मोदी चिंतेत, म्हणाले…

PM Modi On Iran helicopter crash : इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी (Ebrahim Raisi) आणि परराष्ट्र …