Aryan Khan Debut : शाहरूख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तो लवकरच एका चित्रपटाचे किंवा वेब सीरिजचे लिखन करणार आहे. पिंकविला रिपोर्टनुसार, आर्यन वेब-सीरिजबद्दल एका ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत चर्चा करत आहे आणि तो एका फीचर फिल्मवरही काम करत आहे. ही फिल्म शाहरूखच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट या प्रोडक्शन हाऊसद्वारे तयार केली जाणार आहे. आर्यननं लिहिलेली वेब सीरिज यावर्षी प्रदर्शित होईल, असं म्हटलं जात आहे. बिलाल सिद्दीकी हे या सारिजचे को- रायटर आहेत.
आर्यनने 2020 मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियामधून पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी ललित कला, सिनेमॅटिक आर्ट्स, फिल्म आणि टेलिव्हिजन निर्मितीमध्ये बॅचलर डिग्री घेतली आहे. आता तो लेखन क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.
सुहाना खान करणार अभिनय क्षेत्रात पदार्पण
शाहरूखची मुलगी सुहाना खान ही देखील लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. रिपोर्टनुसार, नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या एका आगामी सीरिजमध्ये सुहाना महत्वाची भूमिका साकारणार आहे. या सीरिजचं दिग्दर्शन जोया अख्तर करणार आहे, असं म्हटलं जात आहे.
IPLच्या लिलावात लावली होती हजेरी
आयपीएलच्या 2022 हंगामाच्या लिलावात आर्यन खान आणि सुहाना खान यांनी हजेरी लावली होती. तसेच त्यांच्यासोबतच अभिनेत्री जुही चावलाची मुलगी जान्हवी मेहता ही देखील हजर होते.
हेही वाचा :
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha