मी एक चांगली आई तर झाली, पण मुलाला आयुष्यात कधीच वडिलांचं सुख देऊ शकणार नाही

आजच्याच दिवशी सुमारे सहा महिन्यांपूर्वी मी माझा नवरा गमावला होता. हे माझ्यासाठी असं काहीसं आहे, जे मी कधीही विसरू शकत नाही. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे मी त्याला अनुभवू शकते पण त्याला शारीरिकरित्या स्पर्श करू शकत नाही किंवा त्याच्याशी बोलू शकत नाही. मात्र, जेव्हा जेव्हा मला कमजोर पडल्यासारखं जाणवतं तेव्हा तो लगेच माझ्यासमोर येतो. जेव्हा मी तणावाखाली असते तेव्हा तो माझा आधार बनतो.

जेव्हा जेव्हा मी आजारी पडते तेव्हा तो माझी हिंमत बनतो. पण यानंतरही सत्य हेच आहे की आम्ही दोघेही एकत्र नाही. यापुढे मी कधीच त्याच्यासोबत राहू शकणार नाही हे वास्तव मी स्वीकारले असले तरी माझे मन त्याच्यापासून दूर जायला तयार होत नाहीये. (सर्व फोटो सूचक आहेत, आम्ही युजर्सनी शेअर केलेल्या कहाणीमध्ये त्यांची ओळख गुप्त ठेवतो)

मी कधीच बाबा बनू शकणार नाही

जेव्हाही मी आमचे एकत्र फोटो पाहते तेव्हा मला नेहमी वाईट वाटते. जेव्हा जेव्हा मी एखाद्या लहान मुलाला त्याच्या वडिलांसोबत रस्त्याने चालताना पाहते तेव्हा मला वाटते की मी एक चांगली आई तर झाली आहे, परंतु मी माझ्या मुलाला वडिलांचे सुख कधीच देऊ शकणार नाही. रियानही खूप लहान आहे. त्यालाही अनेक गोष्टी कळत नाहीत. पती गेल्यानंतरही मी माझ्या पतीला विसरु शकले नाही याचे हे देखील एक कारण आहे.

हेही वाचा :  Ex BF वरूणने दिलेल्या दागिन्यांचा वाद, दिव्या अग्रवालने भडकून दिले उत्तर, नात्यातून बाहेर पडल्यावर काय लक्षात ठेवाल

(वाचा :- माझी कहाणी : बायकोच्या या गोष्टीमुळे मी कर्जबाजारी झालोय, असंच चालत राहिलं तर मी लवकरच रस्त्यावर येईन, काय करू?)

माझा आनंद काहीच वेळासाठी टिकला

मी सर्वांसमोर आनंदी राहण्याचा प्रयत्न करते, पण खरे सांगायचे तर मी यातून कधीच बाहेर पडू शकणार नाही. मात्र, त्याच्यासोबत घालवलेल्या क्षणांचा मला आनंद आहे. पण एकच दुःखाची गोष्ट म्हणजे तो फक्त थोड्या काळासाठीच माझ्यासोबत होता आणि ते क्षण मी परत आणू शकत नाही.

(वाचा :- श्रद्धासारखंच 12 वर्षापूर्वी राजेशने केले अनुपमाचे 70 तुकडे, एक्सपर्टने उलगडलेले भयंकर सत्य प्रत्येकास माहित हवे)

सिंगल मदर बनणं कठीणच

नव-याशिवाय आयुष्य जगणं फार वेदनादायी असतं पण त्याहून भयंकर असतं ते म्हणजे आपल्या मुलाचं बापाविना पोरकं होणं. मला त्याच्या उभ्या आयुष्याची चिंता सतावत असते. आईचं सुख तर त्याला मी भरघोस देईन पण वडिलांची कर्तव्य पार पाडताना कायम मी कमी राहिन याची जाणीव झाल्यावर फार सलत राहतं.

(वाचा :- माझी कहाणी : माझा बॉयफ्रेंड दुस-या मुलीसोबत अफेअर करत राहिला आणि जेव्हा मला कळलं तेव्हा त्याने जे केलं ते भयंकर)

हेही वाचा :  मी सप्तपदी चालत होती व बॉयफ्रेंड रडत कोप-यात उभा होता, याच हळव्या झालेल्या मुलाने पुढे जे केलं ते ऐकून हादराल

त्याची हिंमत बना

आपण समजू शकतो एकट्याने मुलाचा सांभाळ करणं किती कठीण आहे पण तुम्हाला हिंमत दाखवावी लागेल. जर तुम्हीच हिंमत हरलात तर मुलगाही स्वत:च्या आयुष्यात काहीतरी कमी आहे असं मानू लागेल आणि त्याचा आत्मविश्वास कमी होईल आणि जिथे तिथे त्याला हार पत्करावी लागेल. त्यामुळे त्याला जर स्ट्रॉंग बनवायचं असेल तर आधी तुम्हाला कठोर व्हावं लागेल.

(वाचा :- माझी कहाणी : ऑर्कुटवर ओळख झाली, आकंठ प्रेम झालं, सारं जग सोडण्यासाठी मी तयार होती, पण त्याचा हेतू वेगळाच निघाला)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …