“कर्जाचे पैसे परत करण्याची माझी सध्या ऐपत नसून माझ्यावर चार-पाच…”, अभिनेता करणवीर बोहराने केला धक्कादायक खुलासा | lock upp actor karanveer bohra is in debt from many years a shocking revelation


कंगना रणौतच्या ‘लॉक अप’ शोमध्ये करणवीर बोहराने हा खुलासा केला आहे.

बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौतचा ‘लॉक अप’ शो सध्या वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. या शोमधील सदस्य लॉकअपमध्ये त्यांच्या आयुष्यातील भूतकाळ तसेच चांगले किंवा वाईट अनुभव एकमेकांसोबत शेअर करताना दिसतात. ज्याची चर्चा सध्या सोशल मीडियावरही होतेय. काही दिवसांपूर्वीच जेंडर बदलून ट्रान्सवूमन झालेल्या सायशा शिंदे, तेहसीन पुनावाला आणि शिवम शर्मा यांनी त्यांच्या आयुष्यातील धक्कादायक खुलासा केला होता. आता अभिनेता करणवीर बोहराने देखील धक्कादायक खुलासा केला आहे.

करणवीर बोहरा इतर स्पर्धकांशी बोलताना म्हणाला, गेल्या सात वर्षांपासून मी करियरमध्ये काही विशेष करू शकलो नाही. मी अनेकांकडून कर्ज घेतलेलं आहे आणि त्यांचे पैसे परत करण्याची माझी सध्या ऐपत राहिलेली नाही. त्यामुळे माझ्यावर चार-पाच खटलेही सुरू आहेत. मी इतक्या मोठ्या प्रमाणात कर्जात बुडालो आहे, की इच्छा असूनही मला त्यातून बाहेर निघता येत नाही.’

आणखी वाचा : “राज साहेबांनी ‘ते’ २ दिवसात करून दाखवलं…”, The Kashmir Files प्रकरणावरून केआरकेचा कॉंग्रेसला टोला

आणखी वाचा : आराध्या हिंदी भाषेवरील प्रभुत्व पाहून अभिषेक बच्चनने जोडले हात, पाहा Video

हेही वाचा :  Happy Birthday Sushmita Sen : आजही आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करणारी सुष्मिता सेन!

करणवीर पुढे म्हणाला, की ‘२०१५ पासून मी जे काही काम केलं आहे, त्यातून मिळालेली सर्व कमाई कर्जाची परतफेड करण्यासाठी खर्च झाली. कर्जाचे हप्ते न भरल्यानं काही जणांनी मला न्यायालयात खेचलं आहे. सध्या माझ्यावर चार ते पाच खटले सुरू आहेत. मला माझ्या कुटुंबासाठी खूप वाईट वाटतं. माझ्या जागी दुसरं कोणी असतं तर त्यानं आत्महत्या केली असती. त्यामुळं हा शो माझ्यासाठी लाइफलाइन आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …

विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत लिहिलं ‘जय श्री राम’, शिक्षकाने केलं पास.. विद्यापिठाकडून कारवाई

Trending News : उत्तर प्रदेशमधल्या जौनपूर इथल्या वीर बहाद्दूर सिंह पूर्वांचल युनिव्हर्सिटीतल्या उत्तर पत्रिका तपासणीतल्या …