मी सप्तपदी चालत होती व बॉयफ्रेंड रडत कोप-यात उभा होता, याच हळव्या झालेल्या मुलाने पुढे जे केलं ते ऐकून हादराल

लग्नासाठी दोन व्यक्तींमध्ये चांगला समजूतदारपणा आणि प्रेम असणं केवळ पुरेसं नसून हे नातं सुरू ठेवण्यासाठी अनेक छोट्या-छोट्या गोष्टींचीही जाणीव असावी लागते. तेव्हाच खऱ्या अर्थाने नातं हे आयुष्यभर जपलं जातं. माझी त्याच्याशी तेव्हा ओळख झाली जेव्हा मी सुद्धा अनेक रिलेशनशिप्सचा अनुभव घेतला होता आणि त्याने सुद्धा! आम्ही दोघांनी एकमेकांचे जुने अनुभव एकमेकांसोबत शेअर केले. पण हे करता करता आम्ही कधी रिलेशनशिपमध्ये आलो ते आम्हालाच कळले नाही. फक्त एक माहित होतं की आजवरच्या रिलेशनशिपपेक्षा हे नातं वेगळं होतं.

आम्हाला वाटत होतं की आम्ही एकमेकांसाठी परफेक्ट आहोत. पण असं असून सुद्धा आम्हाला दोघांनाही दुसऱ्या पार्टनरची गरज भासू लागली होती. आमचं एकमेकांवर प्रेम तर होतं पण लग्नासाठी मात्र दुसरी व्यक्ती हवी होती. शेवटी, मी अशा व्यक्तीला भेटले ज्याला माझ्या कुटुंबानेच पसंत केले होते. आम्ही दोघांनी वेगवेगळ्या व्यक्तींशी लग्न देखील केले. मला वाटले की याच व्यक्तीवर माझा शोध संपला पण असे झाले नाही. (गोपनीयतेच्या कारणामुळे आम्ही व्यक्तीची ओळख उघड करत नाही.)

मी त्याला रडताना पाहिले

मी त्याला रडताना पाहिले

पण लग्नाआधी मी ज्याच्या सोबत रिलेशनशिप मध्ये होते आणि आमचं सगळं मस्त जुळलं होतं त्याला मात्र मी माझ्या लग्नात हळूच रडताना पाहिले. पण माझा नाईलाज होता. शेवटी त्याने सुद्धा लवकरच स्वत:साठी चांगली मुलगी शोधून तिच्याशी लग्न केले आणि संसार सुरु केला. पण असे असूनही आमचा संपर्क काही थांबला नाही. आम्ही एकमेकांच्या कायम संपर्कात राहिलो. व एकमेकांना भेटत देखील राहिलो. कुठेतरी आजही आम्हाला एकमेकांचा सहवास हवाहवासा वाटत होता.

हेही वाचा :  मनोज जरांगेंनी ज्यासाठी आंदोलन केलं त्या 'सगेसोयरे' शब्दाचा सरकारी भाषेत अर्थ काय?

(वाचा :- मलायका अरोराचा समस्त पुरूष जातीला प्रेमळ सल्ला, अरबाजसोबत 19 वर्षांचा संसार तोडल्यानंतर हळवी होत म्हणाली की..!)​

आपल्या बायकोबद्दल तो मला सांगायचा

आपल्या बायकोबद्दल तो मला सांगायचा

लग्नानंतर मी माझ्या संसारात खूप जास्त बिझी झाली. मात्र, या काळात त्याला खूप अस्वस्थ आणि असुरक्षित वाटू लागले. यानंतरही तो अनेकदा मला फोन करून त्याची बायको त्याच्याशी कशी वागते हे सांगायचा. ती त्याला हवा असलेला आदर द्यायची नाही. त्याच्याशी नीट वागायची नाह आणि त्याला समजून देखील घ्यायची नाही. सुरुवातीला त्याचे हे बोलणे ऐकून मला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटू लागली. पण खरे सांगायचे तर तो त्याच्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी होता.

(वाचा :- Sleep Divorce: घटस्फोट घेण्याचा काळ गेला आताचे कपल्स घेतात थेट स्लीप डिवोर्स, संकल्पना ऐकून हलेल डोक्याची नस.!)​

त्याचा प्रश्न एकून मी गोंधळली

त्याचा प्रश्न एकून मी गोंधळली

तो खूप मनमौजी व्यक्ती होता आणि त्याचे माझ्यावर खूप प्रेम होते, इतकेच की त्याने मला कधीच बोलून दाखवले नाही. त्याच्या मनात माझ्याबद्दल खूप काळजी होती. एक दिवस त्याने मला विचारले की माझे माझ्या पतीवर त्याच्या पेक्षा प्रेम आहे का? त्याचा हा प्रश्न ऐकून काही क्षण तर मी गोंधळली कारण यावर काय उत्तर द्यावे हेच मला कळेना. कारण तो सरळ सरळ माझे त्याच्यावर अजून प्रेम आहे का असे विचारत होता. मी त्याला उत्तर दिले की, “मी दोघांवर समान प्रेम करते.” पण त्याला हे उत्तर पटले नाही. त्याला मी समजावले की तू पण माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा व्यक्ती आहेस.

हेही वाचा :  सतत डोकं दुखतंय वेळीच व्हा सावध, असू शकतात मायग्रेनची लक्षणं

(वाचा :- मी बहिणीच्या लग्नात अप्सरेसारखी सजून पोहचली अन् समोर बघते तर काय..! ज्यामुळे आम्हा दोघींचं आयुष्य झालं बेचिराख)​

त्याला वाटले मी विश्वासघातकी आहे

त्याला वाटले मी विश्वासघातकी आहे

माझे त्याच्यावर जास्त प्रेम आहे आणि तो माझ्या पतीपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे असे उत्तर मी त्याला द्यावे अशी त्याची अपेक्षा होती. पण माझ्या मनात असे काहीच नव्हते. त्याला मात्र हे उत्तर पटले नाही. त्याला असे वाटत होते की मी त्याला फसवले आहे. त्याने मला अशी वागणूक दिली जसे की मी त्यचा विश्वासघात केला आहे. त्याच्या या वागण्यामुळे मी सुद्धा अनकम्फटेर्बल झाली.

(वाचा :- जमिनीवर नको त्या अवस्थेत पडलेल्या पतीला बघून मी घाबरले व अ‍ॅम्ब्युलन्स बोलावली,नंतर जे सत्य समजलं ते हादरवणारं)​

मी त्याला सरप्राईज दिले

मी त्याला सरप्राईज दिले

त्याच्या अशा वागण्यानंतर मी त्याला फेसबुक वरून ब्लॉक केले आणि काही काळ माझ्या आयुष्यात व्यस्त झाली. पण तरी मी जे घडले ते पूर्ण विसरू शकली नाही. मी त्याला आचका सरप्राईज देण्याचे ठरवले आणि त्याला फेसबुक वरून अनब्लॉक केले. मला वाटले की हे पाहून तो खुश होईल. पण त्याला सरप्राईज देण्याच्या नादात मलाच एक मोठे सरप्राईज मिळाले. जे पाहून मला धक्काच बसला.

हेही वाचा :  पुरूषहो, 40 वर्षांचे होण्याआधीच उरकून घ्या ही 5 कामे, नाहीतर...!

(वाचा :- लाखो हृदयांची क्रश Kiaraचं sidharth कडून पर्मनंट बुकिंग, ज्योतिषांकडून वैवाहिक जीवनाची उत्कंठावर्धक भविष्यवाणी)​

त्याने पत्नीप्रती प्रेम व्यक्त केले होते

त्याने पत्नीप्रती प्रेम व्यक्त केले होते

मी जेव्हा त्याला अनब्लॉक केले तेव्हा पाहिले की त्याने त्याच्या वॉल वर आपल्या बायकोसाठी खूप प्रेम मेसेज शेअर केले होते. ते पाहून मला सुद्धा खूप हसू आले आणि आनंद वाटला. कारण त्याने ज्या पद्धतीने आपल्या बायको प्रती प्रेम व्यक्त केले होते ते पाहून मी समजून चुकले की त्याचे सुद्धा त्याच्या बायकोवर माझ्या पेक्षा जास्त प्रेम आहे.

(वाचा :- फेसबुकवर मैत्री अन् त्याने केलं थेट प्रपोजच, मी नाही म्हटलं..पण पुढे जे घडलं ते स्वप्नातही विचार न करण्यासारखं)​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ईव्हीएमवर कमळ चिन्ह न दिसल्यामुळे पुणेकर आजोबांचा संताप; म्हणाले, मतदान करायचंय पण…

Lok Sabha Election 2024:  राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. बारामती मतदारसंघ गेल्या काही …

‘बारामतीत पोलीस बंदोबस्तात पैशांचा पाऊस’, ‘मध्यरात्रीनंतरही बँक सुरु’; कारमध्ये 500 च्या नोटा

Loksabha Election 2024 Baramati Constituency: बारामती मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मतदारांना पोलीस संरक्षणामध्ये पैसे वाटप झाल्याचा गंभीर …