या 5 प्रकारच्या मुलांवर अक्षरश: वेड्यासारखं प्रेम करते बायको,नवरा म्हणेल तिच त्यांच्यासाठी पूर्व व पश्चिम दिशा

लग्न हे अतिशय पवित्र बंधन आहे. या नात्यात प्रेमासोबतच तडजोड, समजूतदारपणा आणि उत्तम संवादही खूप महत्त्वाचा आहे. कारण कोणत्याही एका अभावामुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच पती-पत्नीने त्यांच्या नात्याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक असते. जर दुर्लक्ष झाले तर सुखी वैवाहिक जीवन कधी दुःखी होते हे कळत सुद्धा नाही. मात्र, पती-पत्नीचे नाते हे कधीच अचानक कमकुवत होत नाही, त्याला अनेक गोष्टी कारणीभूत असतात.

त्याचा परिणाम पुढे घटस्फोटापर्यंत जाऊ शकतो. याशिवाय पुरुषांनाही अशा काही सवयी असतात, ज्यामुळे त्यांच्या पत्नीचे मन त्यांच्यापासून दूर जाऊ लागते. याच अनुषंगाने काही गोष्टी सांगताना, एका घटस्फोटित पुरुषाने आमच्याशी काही टिप्स शेअर केल्या आहेत, ज्यातून कळते की लग्न वाचवण्यासाठी आणि ते आयुष्यभर टिकण्यासाठी काय करणे आवश्यक आहे. (गोपनीयतेच्या कारणामुळे आम्ही व्यक्तीची ओळख उघड करत नाही.) (फोटो सौजन्य :- iStock)

बायकोची साथ कधी सोडू नका

बायकोची साथ कधी सोडू नका

संकटात पत्नीची बाजू कधीही सोडू नका. भलेही तुम्ही तिची समस्या सोडवू शकत नसाल, पण सर्व काही ठीक होईल इतके म्हणणे सुद्धा बायकांना पुरेसे असते. अशा परिस्थितीत त्यांच्या सोबत उभे रहा. त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करा. कठीण काळात केवळ सल्ले देण्यापेक्षा त्यांच्या पाठीशी उभे राहायला शिका. ती नाराज असल्यास, तिला त्याच स्थितीत सोडण्याऐवजी तिच्यासोबत रहा. माझ्यावर विश्वास ठेव, मी सोबत आहे एवढे तुमचे शब्द देखील अशावेळी लाखमोलाचे ठरतात.

हेही वाचा :  प्रोस्टेट कॅन्सर नक्की काय असतो आणि कोणाला याचा धोका अधिक आहे?

(वाचा :- नणंदेवर प्रेम जडलं म्हणून जगाला दाखवण्यापुरतं केलं नव-याशी लग्न, पण पुढे जे झालं ते अक्षरश: हादरवून सोडणारं..!)​

तुमचा आनंद तिची जबाबदारी नाही

तुमचा आनंद तिची जबाबदारी नाही

आपले वैवाहिक नाते आनंदी ठेवण्यासाठी पती-पत्नीने एकमेकांची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेतले पाहिजे. याचे कारण म्हणजे पत्नी आपल्या पतीच्या आनंदासाठी सर्व काही करते. पण तुम्हाला सदैव आनंदी ठेवणे ही तिची जबाबदारी नाही. ही एखादी चावी नाही जी तुम्ही सुरु कराल आणि ती तुम्हाला संतुष्ट करेल, वा आनंद देईल. नात्यात असताना तिचा आनंदही खूप महत्त्वाचा असतो. तिला केव्हा काय करायचे आहे? तिच्या तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत? त्याची काळजी घेणेही एक नवरा म्हणून तुमचे कर्तव्य आहे.

(वाचा :- माझ्या गुरूने घरात गुप्तपणे एक स्त्री लपवून ठेवली होती,ज्यामागील भयंकर सत्य समोर आलं अन् पायाखालची जमीनच सरकली)​

तिला बदलण्याचा प्रयत्न करू नका

तिला बदलण्याचा प्रयत्न करू नका

लग्नानंतर अनेकजण आपल्या पत्नीला त्यांच्या इच्छेनुसार बदलण्याचा प्रयत्न करतात. हीच एक चूक अनेकांचे वैवाहिक जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त कर्ते. जरा कल्पना करा की ती व्यक्ती जर बदलली तर लग्नाआधी तुम्ही तिच्यावर जसे प्रेम करायचा तसेच प्रेम करणे सुरु ठेवाल का? जर तुम्ही तुमचा पार्टनर बदलण्याचा प्रयत्न करत असाल तर लक्षात ठेवा की ही गोष्ट त्यांना काही काळानंतर निराशेच्या ग्र्देत ढकलू शकते. कधी कधी अशा कृत्यांमुळे, समजूतदारपणाचा अभाव असल्याने नात्यात दुरावाही निर्माण होतो.

हेही वाचा :  नवऱ्याचा घाणेरडा स्वभाव बदलायचाय? मग सुधा मूर्तींनी सांगितलेला हा गुरूमंत्र वाचाच

(वाचा :- हनीमूनच्याच दिवशी होईल नात्याचा कायमचा THE END, तुमच्या या 5 सवयी देतात आधीच धोक्याचा इशारा, वेळीच व्हा सावध.!)​

प्रेम कमी होऊ देऊ नका

प्रेम कमी होऊ देऊ नका

तुमच्या लग्नाला कितीही वर्षे झाली असली तरी बायकोला कधीही गृहीत धरू नका. तिच्यावर सतत प्रेम करत राहणे आवश्यक आहे. कारण ततिने आपले घर आणि कुटुंब तुमच्यासाठी सोडलेले असते. तुम्ही तिचे पतीपरमेश्वर असता. म्हणूनच तिने केलेल्या या त्यागाची नेहमी जाण ठेवा. तिला कधी डेटवर तर कधी फिरायला घेऊन जा. पत्नीला सरप्राईज करणारे पती नेहमी उत्तम संसार करतात. कारण ही गोष्ट बायकांना देखील खूप आवडते. त्यात जर पती सरप्राईज देत असेल तर बायकांचे प्रेम देखील वाढते.

(वाचा :- एकाचवेळी एक नाही तर अनेक मुली माझी पत्नी बनण्यास तयार झाल्या, अचानक एक भयंकर प्रसंग ओढावला व सा-याची माती झाली)​

पैशांची चिंता करू नका

पैशांची चिंता करू नका

माणसाला पैसे कसे वाचवायचे हे माहित असले पाहिजे, परंतु याचा अर्थ असा नाही की त्याने आपल्या पत्नीवर खर्च करणे थांबवावे. याचे कारण असे की कधी कधी पैशामुळे जोडप्यांमध्ये खूप अंतर निर्माण होते. तथापि, असे अजिबात नाही की बचत करणे चुकीचे आहे, परंतु आपण जेथे बचत कराल तेथे बचत करा आणि जेथे खर्च करणे आवश्यक आहे तेथे खर्च करण्यास घाबरू नका.

हेही वाचा :  कोविड होऊन गेलेल्यांना दिवाळीदरम्यान श्वसन विकाराचा धोका दुप्पट; फटाक्यांपासून दूर राहा!

(वाचा :- आयुष्यात सर्वच वाईट व निगेटिव्ह लोक भेटतात म्हणून आहात चिंतीत? मग असं होण्यामागची ही कारणं तुम्हाला माहितच हवी)​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

PM साठी फुटपाथ मोकळे करता मग सामान्यांसाठी का नाही? हायकोर्टाचा सवाल; म्हणाले, ‘चालण्याची जागा मूलभूत अधिकार’

Bombay High Court On Footpaths Streets: मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी एका प्रकरणासंदर्भात भाष्य करताना पंतप्रधान आणि …

Maharashtra Weather News : किनारपट्टीसह पश्चिम घाटात सरीवर सरी; मुंबईत मात्र काळ्या ढगांचा चकवा, पाऊस गेला तरी कुठं?

Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्येराज्याच्या कोकण किनारपट्टी भागांमध्ये पावसाची हजेरी …