VIRAL VIDEO : चंदन टीका लावणाऱ्याची कमाई ऐकून नेटकरी शॉक, म्हणतो- ‘डॉक्टर से कम समझे क्या!’

Viral Video : देशातील कुठल्याही मंदिरात जा तिथे तुम्हाला आजी आजोबासह अनेक चिमुकले पोरं चंदन टीका लावताना दिसतात. मग ते अक्कोलकोटचं श्री स्वामी समर्थ यांचं मंदिर असो किंवा त्र्यंबकेश्वरचं महादेवाचं मंदिर…इथे तुम्हाला हमखास ही चिमुकली हाक मारताना दिसतात. चंदन तिलक लावण्यासाठी खरं तर ही मंडळी आपल्याकडून फार पैसे घेत नाहीत. पण तुम्ही यांची कमाई ऐकल्यास हैराण होईल. 

सोशल मीडियावर अयोध्यातील राम मंदिरमधील एका गोलू नावाचा मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तुम्ही म्हणाल असं काय आहे या व्हिडीओत…तर आम्ही सांगतो नेमकं काय झालं ते…या चिमुकल्याला एक व्यक्तीने विचारलं की, तू चंदन तिलक लावून किती कमाई करतो? तेव्हा तो मुलगा काही बोलला नाही. (viral Netkari shocked to hear the earnings of the Chandan commenter boy golu from ayodhya Video trending now)

त्याला बोलतं करायला पुढे त्याने विचारलं, सकाळी किती वाजता उठतो? तेव्हा तो चिमुकला म्हणाला की, सकाळी 6 वाजता उठतो. त्यानंतर सकाळी 10 वाजेपासून रात्री 8 वाजेपर्यंत चंदन तिलक लावण्याचं काम करतो. यानंतर मात्र त्याने दिवसभरात तो किती कमाई करतो हे सांगतो. त्याची कमाई ऐकून नेटकरीही हैराण झाले आहेत. 

हेही वाचा :  ऑनलाइन गेमच्या नादात लाखोंचे कर्ज, हफ्ते फेडण्यासाठी मुंबई पोलिस दलातील कर्मचाऱ्याचे भयंकर कृत्य

कारण तो व्यक्ती म्हणतो माझी सॅलरी डॉक्टरांच्या बरोबरीची आहे. त्यावर चो चिमुकला हसला आणि म्हणाला, डॉक्टर से कम समझे हो क्या?

हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलंय की, अयोध्यातील गोलू हा भारतातील अनेक क्षेत्रातील लोकांपेक्षा जास्त कमाई करतो. पण यापेक्षाही या मुलाचा आत्मविश्वास, स्वॅग आणि स्वतंत्रताचा भाव जबरदस्त आहे.

या रस्त्यावर आत्मविश्वासाने वावरणाऱ्या गोलूकडे जी चतुराई आहे, ती मिळवण्यासाठी भारतीतील तरुण मोठ्या मोठ्या कंपनियांमध्ये IIM सारखा बिजनेस स्कूलमध्ये जातात. भारताच्या गल्लीबोळ्यात असे अनेक गोलू फिरतात, ज्यांमध्ये आपल्यापेक्षा जास्त आत्मविश्वास दिसून येतो. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील guardians_of_the_crypto या अकाऊंटवर शेअर करण्यात आलाय. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ निर्णयाने माविआचा प्रयोग फसला’, शरद पवारांचा गौप्यस्फोट

Sharad Pawar Statement : 2004 मध्ये राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रीपद का नाकारलं? याबाबत शरद पवारांनी एका मुलाखतीत …

Maharastra Politics : शरद पवारांच्या भावनिक वक्तव्यानंतर प्रफुल्ल पटेलांचा खुलासा, म्हणाले ‘होय, मी 2004 पासून मी भाजपशी…’

Praful Patel Statement On Sharad Pawar Interview : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल …