लग्न नाही प्रेमावर विश्वास ठेवला अन् श्रद्धाच्या शरीराचे झाले 35 तुकडे, प्रेमात बुडालेल्यांनो जागे व्हा कारण..

तुम्ही देखील मान्य करालच की प्रेम ही एक अतिशय सुंदर भावना आहे, जी दोन वेगळ्या विचारांच्या वा वेगळ्या स्वभावाच्या व्यक्तींना एकत्र आणते. मात्र, हे प्रेम पुढे नेण्यासाठी जोडप्यांना एकमेकांसोबत अधिकाधिक वेळ घालवण्याची गरज असते. जेव्हा एक कपल एकत्र राहते तेव्हाच त्यांना एकमेकांवर असलेले प्रेम कळते. शिवाय एकमेकांसोबत वेळ व्यतीत केल्यावरच कळते की तुम्ही ज्या व्यक्तीची निवड केली आहे तो तुमच्यासाठी योग्य आहे की नाही. हेच जाणून घेण्यासाठी अनेक कपल्स एकत्र एकाच घरात लग्न न करता नवरा-बायकोसारखे राहू लागतात आणि यालाच Live In Relationship म्हणतात. 2023 हे वर्ष म्हणजे आजचा आधुनिक काळ आहे आणि जोडप्यांकडे लग्न किंवा लिव्ह-इन दोन्ही पर्याय खुले आहेत.

पण लिव्ह इन रिलेशनशिप ही एक आधुनिक संकल्पना असून आजही आपल्या समाजात ती स्वीकारली जात नाही आहे हे देखील एक वास्तव आहे. जे लोक लग्नापूर्वी पती-पत्नीसारखे एकत्र राहतात, त्यांच्याकडे समाज नेहमीच वाईट नजरेने पाहतो. अशा परिस्थितीत लिव्ह-इन रिलेशनशिप आणि लग्न यामध्ये नक्की चांगले काय हा एक गहन प्रश्न आहे. 6 महिन्यांपुर्वीच ह्र्दय पिळवटून टाकणारी घटना लिव्ह इन रिलेशनशिपमधून समोर आली ती म्हणजे श्रद्धा वालकर आणि आफताब पुनावालाची. आफताबने श्रद्धाच्या शरीराचे 35 तुकडे करून तिची निर्घृण हत्या केली होती. अशा परिस्थितीत भविष्यात असा निर्णय घेणा-या जोडप्यांनी सावध होणं आवश्यक आहे. (फोटो सौजन्य :- iStock)

हेही वाचा :  Benefits of Hug : बिनधास्त मारा जादू की झप्पी! मिठी मारणे आरोग्यासाठी जबरदस्त फायदेशीर

लग्न हे समाजाने स्विकारलेले रूप

लग्न हे समाजाने स्विकारलेले रूप

लग्नापूर्वी जोडीदारासोबत राहणे भारतात अजूनही निषिद्ध आहे. लग्नाशिवाय जोडपे म्हणून एकत्र राहणाऱ्या लोकांना नेहमीच अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. दुसरीकडे, जर तुम्ही लग्न केले तर ते केवळ सामाजिकच नाही तर कायदेशीररित्या देखील स्वीकारले जाते. मात्र, आपल्या समाजात लग्न हे एक बंधन आहे, जे इच्छा असूनही तोडता येत नाही. आपण आपल्या आजूबाजूलाच कित्येक अशी विवाहित जोडपी पाहतो जी एकाच घरात राहत असतात पण वेगवेगळे आयुष्य जगत असतात. इच्छा असूनही ते एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाहीत. कारण त्यांच्या वेगळे होण्याचा दोन कुटुंबांवरही परिणाम होईल असे त्यांना वाटते. जुन्या काळात स्त्रियांना असा त्रास सहन करावा लागत असे. या सर्व त्रासांपासून दूर राहण्यासाठी आजच्या युगातील जोडप्यांनी लिव्ह-इनचा विचार सुरू करण्यामागे हे देखील एक कारण आहे. एकत्र राहत असताना ते आधी एकमेकांना समजून घेतात आणि मग लग्न करण्याचा विचार करतात.

(वाचा :- आमिर खान, सामंथा, मानसी नाईक मोठमोठ्या कलाकारांचे लग्न ठरले फेल, यातून धडा घेऊन या 5 चुकांकडे करू नका दुर्लक्ष)​

नाते कायदेशीर करा

नाते कायदेशीर करा

जुन्या पिढीतील लोकांच्या मतानुसार जर तुम्ही लग्नाआधी एखाद्यासोबत राहत असाल आणि लग्नानंतरही तेच करत असाल तर त्याला नाव का देऊ नये. कागदावर सही करून कायदेशीर जोडपे का होऊ नये. पण नव्या पिढीच्या मते, लग्न म्हणजे केवळ लैंगिक संबंध ठेवणे आणि मुले होणे एवढेच सीमित नाही. जुन्या काळातील लोकांच्या मते, लग्न म्हणजे प्रेम आणि दोन कुटुंबांचे मिलन. तर आजची पिढी समजते की ते लिव्ह-इनमध्ये बांधील नसतात. त्यात कुटुंबाचा समावेश नसतो आणि म्हणून त्या नात्यातून कधीही बाहेर पडणे सोप्पे असते. पाश्चात्य संस्कृतीत लिव्ह-इन संबंध खूप नॉर्मल समजले जातात. तिथे लग्न न करता मुलं झालं तरी कोणी नावं ठेवत नाही.. पण आपल्या भारतीय समाजात बघितले असे करणे एखाद्या गुन्ह्यापेक्षा कमी नाही.

हेही वाचा :  पाकिस्तानी मुलीने पीएम मोदींचे का मानले 'आभार'... पाहा काय आहे कारण?

(वाचा :- फेसबुकवर मैत्री अन् त्याने केलं थेट प्रपोजच, मी नाही म्हटलं..पण पुढे जे घडलं ते स्वप्नातही विचार न करण्यासारखं)​

नाते टिकवणे महत्त्वाचे आहे

नाते टिकवणे महत्त्वाचे आहे

लग्नासारखे नाते टिकवणे हे दिसते तेवढे सोप्पे नाही, ती एक मोठी प्रक्रियाच आहे. त्यामुळे अनेक तरुण त्यातून माघार घेतात व लग्न न करण्याचा निर्णय घेतात किंवा लग्न करायला घाबरत असतात. शिवाय पालकांची देखील अट असते की काहीही झाले तरी घटस्फोट घ्यायचा नाही. त्यांच्या मते काहीही झाले तरी लग्न मरेपर्यंत टिकवावे. समाजाच्या रीतींचे पालन करावे. पण लिव्ह इन मध्ये असे काही नसते. इथे कोणाचा दबाव नसतो आणि जर नाहीच पटले तरी जोडपी विभक्त होऊ शकतात.

(वाचा :- या 5 प्रकारच्या मुलांवर अक्षरश: वेड्यासारखं प्रेम करते बायको,नवरा म्हणेल तिच त्यांच्यासाठी पूर्व व पश्चिम दिशा)​

असुरक्षिततेची भावना

असुरक्षिततेची भावना

जर दोन लोक लिव्ह-इन मध्ये राहण्यास तयार असतील तर त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते. तो दिले वचन पाळेल का? जर त्याला दुसरी व्यक्ती आवडू लागली तर? किंवा ती दुसऱ्या पुरुषासोबत राहू लागली तर? आमचे लग्न झाले नाही म्हणून मग आम्हाला भाड्याने घर मिळेल का? असे कैक प्रश्न असतात जे लिव्ह इन दरम्यान असुरक्षिततेची भावना निर्माण करू शकतात. याशिवाय जर योग्य काळजी घेतली नाही तर लिव्ह इन दरम्यान गर्भधारणा होण्याची शक्यता देखील असतेच.

हेही वाचा :  हातावर कियाराच्या नावाची मेहेंदी अन् डोळ्यात प्रेम, लव्हबर्ड्सचा लग्नानंतरचा First Look

(वाचा :- नणंदेवर प्रेम जडलं म्हणून जगाला दाखवण्यापुरतं केलं नव-याशी लग्न, पण पुढे जे झालं ते अक्षरश: हादरवून सोडणारं..!)​

तुम्हाला करायचा आहे योग्य विचार

तुम्हाला करायचा आहे योग्य विचार

लग्न आणि लिव्ह इन रिलेशनशिपबाबत प्रत्येकाची आपापली वेगळी मते आहेत. कुणाला लग्नानंतर आयुष्य घालवणं योग्य वाटतं, तर कुणी लिव्ह-इन रिलेशनशिप वर विश्वास ठेवतं. कोणाचा निर्णय कोणताही असो, पण त्यावर आपण टीका करू शकत नाही. स्वत:साठी योग्य काय आहे ते तुमचं तुम्हाला ठरवायचं आहे.

(वाचा :- माझ्या गुरूने घरात गुप्तपणे एक स्त्री लपवून ठेवली होती,ज्यामागील भयंकर सत्य समोर आलं अन् पायाखालची जमीनच सरकली)​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Central Railway: मुंबईला मिळणार आणखी चार मेगा टर्मिनस, रेल्वे प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय

Railway Terminals News in Marathi: रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी अन् लोकलवर येणारा ताण, याचा विचार …

मैत्रिणींसोबत ट्रिपला गेली, हॉटेलमध्ये झालं असं काही की घरी येताच महिलेने नवऱ्याला दिला घटस्फोट

Trending News In Marathi: पती-पत्नी यांच्यात अनेक कारणांवरुन वाद होत असतात. कधी कधी याच वादातून …