कोंड्यापासून मिळू शकते कायमची सुटका; घरच्या घरी करा ‘हे’ पाच उपाय

जर तुम्ही सुद्धा कोंडा आणि कोरड्या टाळूमुळे हैराण असाल तर या उपायांचा वापर करून तुम्ही या समस्यांपासून सुटका मिळवू शकता.

बहुतेकदा थंडीच्या दिवसांमध्ये आपला टाळू कोरडा पडतो आणि त्यामुळे ही त्वचा निर्जीव दिसते. यामुळे कोंड्याची समस्या वाढते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, एकदा कोंडा झाला की त्यातून सुटका करणे खूप कठीण असते. जर तुम्ही सुद्धा कोंडा आणि कोरड्या टाळूमुळे हैराण असाल तर या उपायांचा वापर करून तुम्ही या समस्यांपासून सुटका मिळवू शकता.

कोंडा दूर करण्यासाठी ५ नैसर्गिक उपाय

नारळाच्या तेलाचा वापर

केसांसाठी नारळाचे तेल अत्यंत फायदेशीर आहे. खोबरेल तेल त्वचेचे हायड्रेशन सुधारते आणि टाळू कोरडे होत नाही, जे कोंडा होण्याचे मुख्य कारण आहे. रात्री झोपण्यापूर्वी केसांना खोबरेल तेल लावा आणि सकाळी शॅम्पूने केस धुवा.

Hair Oil Tips : तुम्हीही केसांना लावण्यासाठी गरम तेलाचा वापर करता का? जाणून घ्या याचे फायदे-तोटे

टी ट्री ऑइलचा वापर

नारळाच्या तेलाप्रमाणेच टी ट्री ऑइलसुद्धा केसांसाठी अतिशय उपयुक्त मानले जाते. यामध्ये दाहक-विरोधी आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आहेत जे कोंड्यापासून सुटका करून देण्यास मदत करतात. खोबरेल तेलात टी ट्री ऑइलचे २ ते ३ थेंब टाका त्यानंतर हे तेल टाळूला लावा.

हेही वाचा :  माझी कहाणी : बायकोला परपुरुषासोबत नको त्या अवस्थेत पाहिले अन् माझ्या पायाखालची जमीनच सरकली

कोरफड

कोरफडचा गर केसांना लावून आपण केसांची काळजी घेऊ शकतो. यामध्ये अँटी बॅक्टेरियल गुण असतात जे कोंड्यापासून सुटका करून देण्यास मदत करतात. यासाठी कोरफडचा गर काढावा आणि जवळपास ३० मिनिटे टाळूवर लावून ठेवावा. त्यानंतर सौम्य शॅम्पूचा वापर करून केस धुवा. उत्तम परिणामांसाठी, आठवड्यातून दोनदा केसांना कोरफड लावावी.

मासिक पाळीच्या काळात सॅनिटरी पॅडपेक्षा मेन्स्ट्रुअल कप अधिक उपयुक्त ? जाणून घ्या अधिक तपशील

बेकिंग सोडा

बेकिंग सोडामध्ये अँटी फंगल गुणधर्म असतात, ज्यामुळे कोंडा दूर होण्यास मदत होते. ओल्या केसांना बेकिंग सोडा लावून टाळूवर २ ते ३ मिनिटे मसाज करा. काही वेळाने सौम्य शॅम्पूचा वापर करून केस धुवा. आठवड्यातून दोनदा असे केल्याने कोंडा दूर होऊ शकतो.

लिंबाचा रस

लिंबाचा रस आम्लयुक्त असतो. यामुळे कोंडा दूर होतो. यासाठी एका भांड्यात पाणी आणि लिंबाचा रस मिसळून केसांची टाळू धुवावी आणि नंतर सौम्य शॅम्पूने केस धुवावे. तुम्ही हे आठवड्यातून दोनदा करू शकता.

(येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया हे उपाय वापरण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या.)

हेही वाचा :  माझं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे पण आई वडिलांचं मन दुखावू नये म्हणून लग्न करतोय दुसऱ्याच मुलीशी, कशी हाताळू परिस्थिती

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …