नवरा व सासूमध्ये रोज मरण माझं होतंय, नवरा प्रत्येक गोष्टीत रडगाणं गात बसतो

प्रश्न: मी एक विवाहित स्त्री आहे. मी माझ्या पतीला खरंच कंटाळले आहे. खरं तर माझ्या वैवाहिक जीवनात कशाचीही कमतरता नाही. पण माझी अडचण अशी आहे की माझे पती कधीही कोणत्याही गोष्टीवर खूश नसतात. त्यांना प्रत्येक गोष्टीत अडचण आहे. मग ती माणसे असोत, नाती असोत, खाणंपिणं असो, कपडे असोत किंवा अजून काहीही असो. ते प्रत्येक गोष्टीवर रडत असतात आणि असा रडका जोडीदार मिळाला आहे हे पाहून मला अजून जास्त त्रास होतो.

एखाद्या गोष्टीचा थोडा फार त्रास होणे मी समजू शकते. जेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा त्रास होतो तेव्हा तो स्वभावामुळे असतो. माझ्या पतीच्या बाबत सुद्धा हेच झाले आहे. सासू आणि नवरा या दोघांमध्ये रोजचं मरण मात्र माझं होतंय. लग्न करून पश्चाताप होतोय. काय करू? (गोपनीयतेच्या कारणामुळे आम्ही व्यक्तीची ओळख उघड करत नाही.)

काय करावे हेच कळत नाही

मला त्यांच्या वागण्याचा खूप राग येतो. कारण त्यांच्या या वृत्तीमुळे आजूबाजूच्या लोकांचा मूडच खराब होत नाही तर त्यांच्या सोबत पूर्वी सारखे नाते सुद्धा राहत नाही. या सगळ्यात माझ्या सासूबाईंचा खूप मोठा दोष आहे. ती माझ्या पतीला अजूनही लहान मुलासारखं वागवते. जर माझ्या पतीला एखादी गोष्ट आवडत नसेल तर ती लगेच ती गोष्ट बदलून टाकते.या सगळ्याला कसे सामोरे जावे हेच समजत नाही.

हेही वाचा :  सतत एक विचित्र प्रश्न विचारून सासरच्यांनी केलाय अक्षरश: जीव नकोसा, अट पूर्ण न केल्यामुळे लावतायत घाणेरडे आरोप

(वाचा :- ट्विंकल खन्नाने तब्बल 2 वेळा तोडलं अक्षयसोबतचं लग्न, कारण ठरलं समस्त पुरूष जातीला लाजवेल असा एक भयंकर आरोप..!)

जाणकारांचे उत्तर

समर्थ काउंसेलिंगचे रिलेशनशिप कौन्सिलर आणि क्लिनिकल सायकोलॉजिस्ट डॉक्टर संजीव त्रिपाठी सांगतात की, “जर तुमचा नवरा प्रत्येक गोष्टीबद्दल तक्रार करत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की त्याला कुठेतरी खूप असुरक्षित वाटत आहे. अशा परिस्थितीत बसून त्यांच्याशी बोलणे हेच उत्तम. त्यांना समजावून सांगा की सर्व काही ठीक आहे. त्यांना कशाचीही काळजी करण्याची गरज नाही. यामुळे त्यांचे मन मोकळे होईल. त्याचबरोबर त्यांचा आत्मविश्वासही वाढेल. त्यांना योग्य वागणूक दिली जात आहे असे वाटेल. त्यांचा यामुळे तुमच्यावरचा विश्वास वाढेल.”

(वाचा :- माझ्या बायकोची ही 1 घाणेरडी सवय मला व माझ्या आई-बाबांना सहन करणं महाकठीण झालंय, मी घटस्फोट घेणं योग्य ठरेल का?)

त्यांना एकदा घट्ट मिठी मारा

ते पुढे सांगतात की, “तुमचे सर्व बोलणे ऐकून घेतल्यानंतर मी तुम्हाला एकच सल्ला देऊ इच्छितो की तुम्ही तुमच्या पतीसोबत बसून त्यांच्या समस्यांवर विचारमंथन करा. जर गोष्टी वाईटाकडून वाईटाकडे जात असतील तर त्यांना घट्ट मिठी मारण्याचा प्रयत्न करा. त्यांच्यावर प्रेम करा त्यांना सांगा की ते तुमच्यासाठी किती खास आहेत. एवढेच नाही तर त्यांना त्यांच्या समस्यांबद्दल बोलू द्या ज्या त्यांना त्रास देत आहेत. कारण असे केल्याने त्यांना सुरक्षित वाटेल.”

हेही वाचा :  Video: बाबा, माझी स्तृती करु नका! असं अमित ठाकरे जाहीर भाषणात राज ठाकरेंना का म्हणाले?

(वाचा :- कोणालाच नाही अशी घाणेरडी सवय नव-याला आहे, त्या एका सवयीने केलंय माझ्या आयुष्याचं वाटोळं, ऐकून येईल अंगावर काटा))

त्यांना तुम्हाला होणारा त्रास सांगा

या विषयावर लव्ह कोच जिज्ञासा उनियाल सांगतात की, तुमच्या पतीला स्पष्टपणे सांगा की, त्याची प्रत्येक गोष्टीबद्दल कुरकुर करण्याची सवय तुम्हाला खूप त्रास देते. इतकेच नाही तर त्याचा परिणाम तुमच्या नात्यावरही होत आहे. तसेच त्यांना समजावून सांगा की यामुळे व्यक्तिमत्वही बिघडवत आहे. एकंदर तुम्ही तुमच्या नवऱ्याला होणाऱ्या त्रासाबद्दल जाणीव करून दिलीच पाहिजे. जेव्हा तुम्ही ही जाणीव करून द्याल तेव्हाच खऱ्या अर्थाने फरक पडेल.”

(वाचा :- मोहम्मद रफींच्या बायकोचा चुकूनही होत नाही कुठेच उल्लेख, आकंठ प्रेम असतानाही का पुसलं गेलं नशिबातून बायकोचं नाव)

सकारात्मक राहा

या पुढे म्हणतात की “मला तुम्हाला हे देखील सांगायचे आहे की तुमचा पती तुमचा जीवनसाथी आहे. या सवयीपासून मुक्त होण्यासाठी तुम्हाला त्यांना मदत करावी लागेल. त्यांच्याशी वागताना खूप संयम बाळगण्याचा प्रयत्न करा. त्यांना थोडा वेळ द्या, तुमच्या नात्याला वेळ द्या. घाई घाईत किंवा राग रागाने कोणताही निर्णय घेण्याची चूक करू नका. कोणातच माणूस जन्मत: वाईट नसतो. तुमचा पती सुद्धा नाही आहे हे लक्षात घ्या आणि सकारात्मक राहून मनात अशा बाळगा की एक न एक दिवस त्यांच्या स्वभावात फरक पडेल.

हेही वाचा :  तणावामुळे निर्माण होतोय हृदयविकार, वेळीच व्हा सावध अन्यथा गमवाल जीव

(वाचा :- माझी कहाणी : मी बायकोची फसवणुक करतोय, एकाच घरात राहून बायकोच्या मोठ्या बहिणीसोबत मी असं काही केलं की….!!)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले ‘आता पुढील शिक्षण…’

Shrirang Barane Passed SSC Exam : शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, माणूस आयुष्यभर विद्यार्थी दशेतच …